Alfred Nobel information Biography in Marathi language
अल्फ्रेड नोबेल माहिती जीवन परीचाय निबंध मराठी
नोबेल पुरस्कारचे जनक आल्फ्रेड नोबेल यांचा डायनामाईट निर्माता ते शांतीदूत हा प्रवास
“My dynamite will sooner lead to peace than a thousand world conventions. As soon as men will find that in one instant, whole armies can be utterly destroyed, they surely will abide by golden peace.”

शांतिदूत अल्फ्रेड नोबेल. आता ज्यांना माहीत आहे की डायनामाईट चा शोध अल्फ्रेड नोबेल यांनीच लावला तर ते कसले शांतिदूत.
पण त्यांच्या आयुष्यात नंतर असे काय घडले की त्यांनी कष्टाने कमविलेली संपत्ति ट्रस्ट च्या स्वाधीन केली आणि त्यातून पुरस्कार द्यावे अस सांगितले याचाच आपण आज शोध घेणार आहोत.
विश्वाचे सर्वांत प्रतिष्ठित पुरस्कार, ज्यांची उत्कंठा जगात सर्वांनाच लागलेली असते. ते पुरस्कार म्हणजे नोबेल पुरस्कार. हे पुरस्कार ज्यांच्या प्रेरणेतून आणि संपत्तीतून स्थापन झालेल्या ट्रस्टद्वारे दिले जातात, ती व्यक्ति म्हणजे अल्फ्रेड बर्नाड नोबेल होय.
डायनामाइटचा शोध लावून जगाला क्षणात उध्वस्त करू शकेल, अशा विस्फोटकांसह ३५५ शोधांचे पेटंट ज्याच्या नावावर आहेत, अशा अल्फ्रेड नोबेलने आपल्या आयुष्याच्या शेवटी शांतीचा मार्ग धरला. विध्वंसक विस्फोटकाचा जनक शांतिदूत झाला. विश्वशांतीचा प्रणेता झाला. त्यांनी आयुष्यभर राबराब राबून जमवलेल्या संपत्तीचा २७ नोव्हेंबर १८९५ ला एक ट्रस्ट तयार करून त्यातून नोबेल पुरस्कार देण्याचे स्वप्न पाहिले आणि १० डिसेंबर १८९६ मध्ये त्याचे निधन झाले. अल्फ्रेडचं या अंतिम इच्छेनुसार १९०१ पासून या पुरस्कारांची सुरवात झाली. नोबेलचा जन्म ऑक्टोबर २१, १८३३ रोजी स्वीडनमधील स्टॉकहोम येथे झाला. नोबेलचे वडील औषधांचे उद्योजक होते व आल्फ्रेडने स्वतः शालेय शिक्षण खाजगी शिक्षकांकडून घेतले. यांत्रिकी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असले तरी आल्फ्रेडला रासायनिक संशोधनात रस होता. भरीस वडील बंधुचा स्फोटकांच्या अपघातात मृत्यू ओढवल्यावर आल्फ्रेडने स्वतःला सुरक्षित स्फोटके शोधण्यासाठीच्या संशोधनाला वाहून घेतले व पुढे डायनामायटाचा शोध लावला.
३ सप्टेंबर १८८८ रोजी स्वीडनच्या वृत्तपत्रात ठळक बातम्या झळकल्या. ‘खतरनाक विस्फोटक बनवणाऱ्या अल्फ्रेड नोबेल यांचा त्यांच्या कारखान्यात विस्फोटात मृत्यू!’ ‘मृत्यूचा व्यापारी स्वतः मृत्यूच्या दाढेत.’ भल्या पहाटे या बातम्या स्वतः अल्फ्रेड वाचत होता. आपल्या मृत्यूचं वृत्त वाचून तो नखशिखांत हादरला. खरं तर बातमीत चुकून अल्फ्रेडच्या भावाच्या जागी म्हणजे एमिलच्या जागी त्याचे नाव छापून आले होते. एक वर्षापूर्वीच म्हणजे १८६३ मध्ये त्याने संशोधन केलेल्या ‘ब्लास्टिंग ऑइल’ला म्हणजेच नायट्रोग्लिसरीनला पेटंट मिळाले होते. यातूनच पुढे डायनामाइटचा शोध लागला होता. वृत्तपत्रातील बातमीने अल्फ्रेड विषण्ण झाला. या बातमीने त्याच्या जीवनाला कलाटणी मिळाली. त्याच्या मनात विचारांचे वादळ थैमान घालू लागले. आपण आपल्या मृत्यूनंतर ‘मृत्यूचा व्यापारी’ म्हणून ओळखलं जाऊ, या कल्पनेने आणि चिंतेने त्याच्या मनावर खोल आघात केला. आपल्या भावाचा विस्फोटात झालेला मृत्यूही त्याला विचलित करून गेला आणि येथूनच त्याच्या मनात परिवर्तनाचे वारे वाहू लागले. त्याचे हृदयपरिवर्तन झाले. आपली अफाट धनसंपत्ती आपल्या मृत्यूनंतर काय कामाची, ही चिंता त्याला भेडसावू लागली. त्याने ती (५६ करोड अमेरिकी डॉलर) मानवी कल्याणासाठी लावण्याचा संकल्प केला. या घटनेतूनच नोबेल पुरस्कारांचं बीज रोवलं गेलं, जे २७ नोव्हेंबर १८९५ रोजी त्याच्या वयाच्या ६३ व्या वर्षी मृत्युपत्र म्हणून प्रत्यक्षात आकाराला आलं. मात्र, दुर्दैवाने १० डिसेंबर १८९६ मध्ये इटलीत त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला.
Alfred Nobel information Biography in Marathi language
अल्फ्रेड नोबेल माहिती जीवन परीचाय निबंध मराठी
विस्फोट तंत्रात क्रांती घडवणारा हा महान संशोधक अल्फ्रेड नोबेल व्यक्तिगत जीवनात खरं तर स्वतःला फार सामान्य समजत असे. त्याचा जन्म २१ ऑगस्ट १८३३ मध्ये स्वीडनच्या स्टॉकहोम येथील एका इंजिनीअरच्या कुटुंबात झाला. त्याचे वडील मोठमोठे पूल बनवण्याचे ठेके घेत. कुटुंबात त्याचा जन्म झाला आणि दुर्दैवाचे फेरे सुरू झाले. त्याच्या वडिलांचे दिवाळे निघाले. त्यांचं जीवन खडतर, संघर्षमय झालं. त्याच्या आईने कुटुंबाला मदत व्हावी म्हणून घरातच दुकान सुरू केलं. घराचा डोलारा सांभाळत मुलाला शिक्षण देणं शक्य नसल्याने तिने मुलांना घरीच शिकवणं सुरू केलं. अल्फ्रेडवर कष्टाचे, जीवनमूल्यांचे आणि प्रामाणिकपणाचे संस्कार तिनेच बालवयात रुजवले. प्रतिभा व कार्यक्षमता तर त्याला बापाकडूनच मिळाली होती. मोठा झाल्यावर पुढे तो कामानिमित्त देशोदेशी फिरला. मात्र, आई त्याच्या हृदयात बसली होती. कामानिमित्त जगात कुठेही असला तरी आईसाठी जन्मदिनी तो कायम स्विडनमध्ये परतायचा. हा नेम त्याने आयुष्यभर पाळला. अल्फ्रेडचं जीवन म्हणजे एक चमत्कारच होता. नवव्या वर्षी शिक्षणासाठी तो रशियातील सेंट पिट्सबर्ग येथे होता. तेथून तो पॅरिसला गेला. वयाच्या १७ व्या वर्षी त्याला जगातल्या पाच भाषा बोलता येत होत्या. पुढे त्याने केमिकल इंजिनीअरिंगची पदवी मिळवली. येथेच त्याचा विस्फोटकांशी परिचय झाला. नायट्रोग्लिसरिनचा सुरक्षित उपयोग या विषयावर तो सखोल संशोधन करीत होता. त्याचे तीन भाऊ पिट्सबर्ग येथे व्यवसायात गुंतले होते. शेवटी १९६३ मध्ये त्याला ते पेटंट मिळाले. हेच ते ‘ब्लास्टिंग ऑइल.’ यातूनच पुढे डायनामाइटचा जन्म झाला. नायट्रोग्लिसरिन व सिलिका एकत्र करून अल्फ्रेडने डायनामाइट तयार झाले. यामुळे ते सिलिंडरमध्ये भरणे सुलभ झाले. त्यावर होणारा तापमान व दाबाचा परिणाम नियंत्रणात आला. धोके टाळून ते हाताळणे सुकर झाले. या शोधामुळे विस्फोटाची शक्ती वाढली. पूर्वीच्या गनपावडरपेक्षा ती पाच पट अधिक शक्तिशाली झाली. खाणकामात व मोठ्या प्रमाणावरील बांधकाम क्षेत्रात यामुळे क्रांती आली. डायनामाइटची मागणी प्रचंड वाढली. या उत्पादनामुळे अल्फ्रेडचं जगभर नाव गेलं आणि हीच त्याची पुढे ओळख झाली.
अल्फ्रेड हा फक्त शोधकर्ता किंवा वैज्ञानिकच नव्हता, तर तो एक कुशल व्यापारी, उद्योजकही होता. विविध कंपन्या उघडून त्याने आपला व्यापार वाढवला. स्थिरस्थावर होऊन एखाद्या उद्योगात गुंतून न पडता त्याने आपले संशोधन सतत सुरूच ठेवले. डायनामाइटमुळे होणाऱ्या स्फोटातून जिवांचे व साधनसंपत्तीचे नुकसान होऊ नये यासाठी सुरक्षित उपाय शोधण्यासाठी तो सतत प्रयत्नशील होता. या समर्पणातून त्याने अनेक शोध लावले. त्याच्या नावावर एकूण ३५५ पेटंट रजिस्टर आहेत. अल्फ्रेड हा बहुविध गुणांचा धनी होता. त्याचं व्यक्तिमत्त्व बहुआयामी होतं. ‘डायनामाइटचा जनक’ या व्यतिरिक्त तो रसायनशास्त्रातील इंजिनीअर, शस्त्रनिर्माता, उद्योगपती, तत्त्वज्ञ, लेखक, कवी, थोर शांतिवादी म्हणूनही जगाला परिचित आहे. त्याने आयुष्यभर लेखन करून १५० पुस्तकांचं लेखन केलं आहे.
स्वतः कोणताही स्वार्थ नसताना, कोणतेही लौकिक सुख उपभोगत नसतानाही त्याने कठोर परिश्रमाने सारी सुखं पायाशी आणली होती. मृत्यूच्या वेळी मात्र तो एकाकी, एकटाच होता. आपल्या शेवटच्या काळात तो भावूक, उदार आणि दयाळू झाला होता. यातूनच त्याच्या मनात वैराग्य निर्माण झाले. त्याला मानवतावादाने आपल्याकडे खेचून घेतले. अंतिमसमयी तो खूप भावूक झाला होता. त्याने आयुष्यभर जमलेल्या सर्व संपत्तीचा एक ट्रस्ट तयार केला. त्यात ३१ मिलियन सेक म्हणजे २६५ मिलियन डॉलर्सचा निधी जमा केला. यातून जगाची शांती वाढावी व जगाचा विकास व्हावा, विश्वाचे कल्याण व्हावे अशी त्याची कल्पना होती. आपल्या या अलौकिक कार्यामुळे अल्फ्रेड विश्वशांतीचा दूत झाला. जमा रकमेच्या व्याजातूनच आजतागायत नोबेल पुरस्कार दिले जात आहेत. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकीयशास्त्र, साहित्य, शांती आणि अर्थशास्त्र या विषयांसाठी दरवर्षी पुरस्कारांची घोषणा केली जाते. यासाठी जगात खूप मोठी स्पर्धा असते.
नोबेल पुरस्कार म्हणून सन्मानपत्र, सुवर्णपदक (१७५ ग्रॅम), रोख रक्कम ९ मिलियन स्विडिश क्राऊड म्हणजे १४ लाख अमेरिकन डॉलर अर्थात भारतीय ७ कोटी ७० लाख रुपये एवढी आहे. सुवर्णपदकाचे मूल्य लावले तर ते ५० लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. काही पुरस्कारार्थींनी त्याची बोली लावून विक्री केली होती. त्यातून त्यांना कोट्यवधी रुपयांची प्राप्ती झाली होती.
एखादी गोष्ट माणसाच्या आयुष्यात किती परिवर्तन घडवू शकते हे आपल्याला नोबेल यांच्या जीवनाकडे बघितल्यावर कळते. महान संशोधक तर होतेच पण जग आज त्यांना शांतिचा दूत म्हणून ही ओळखत आहे.
“It is my express wish that in awarding the [Nobel Prizes] no consideration be given to the nationality of the candidates, but that the most worthy shall receive the prize, whether he be Scandinavian or not.”
अक्षय जाधव
कडूस राजगुरुनगर.
मित्रांनो, ही महत्वपूर्ण माहिती कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा. अशा पद्धतीची माहिती वाचण्यासाठी कॉलेज कट्टाला सबस्क्राईब करा. कॉलेज कट्टा म्हणजे माहिती आणि मनोरंजनाचे व्यासपीठ!
Alfred Nobel information Biography in Marathi language
अल्फ्रेड नोबेल माहिती जीवन परीचाय निबंध मराठी
dynamite inventor information in marathi
डायनामाइटचा शोध कोणी लावला
नोबेल पुरस्कारचे जनक आल्फ्रेड नोबेल
नोबेल पुरस्कार माहिती मराठी
नोबेल पुरस्कार कोणता देश देतो
Scientist information in marathi language
वैज्ञानिक शास्त्रज्ञ माहिती मराठी
Leave a Reply