Ahilyabai Holkar Information in Marathi Ahilyabai Holkar History in Marathi language Ahilyabai Holkar Information in Marathi language
Ahilyabai Holkar Information in Marathi Ahilyabai Holkar History in Marathi language Ahilyabai Holkar Story in Marathi Ahilyabai Holkar Biography in Marathi अहिल्याबाई होळकर यांची मराठी माहिती आहिल्याबाई होळकर माहिती मराठी अहिल्याबाई होलकर इतिहास मराठी
दया ,क्षमा, शांती,तेथे देवाची वस्ती असं आपल्या मराठी भाषेत बोललं जातं. असच अहिल्याबाई होळकर यांचं व्यक्तिमत्व. एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण आणि कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. अहिल्यादेवींचा जन्म ३१ मे इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या गावात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे गावचे पाटील होते. या काळात स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित न्हवते. त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्यावाचण्यास शिकवले. मराठय़ांच्या इतिहासात अनेक पराक्रमी सरदार होऊन गेले. त्यामधील होळकर घराण्यातील अहिल्याबाईंचे नाव आजही अनेकांच्या तोंडावर आहे. अहिल्याबाईंना ‘पुण्यश्लोक’ असेही म्हणतात. कारण त्यांनी केलेले सामाजिक कार्य आजही अनेकांसाठी आदर्शवत असेच ठरले आहे. घरचा आणि राज्याचा कारभार पाहण्यात अहिल्या हुशार होत्या. तसेच राज्यकर्त्यांना आवश्यक असणारे सर्व गुण तिच्याजवळ लहानपणापासूनच होते.
एकदा चोंडी गावात थोरले बाजीराव पेशवे यांच्या सैन्याचा तळ पडला होता. सीना नदीच्या काठी असलेल्या एका देवालयात दर्शनासाठी म्हणून छोटी अहिल्या आपल्या आईबरोबर गेली होती. तेथे नदीच्या वाळूत खेळताना अहिल्येने वाळूचे एक शिवलिंग बनविले. तेवढय़ात सैन्यदलातील एकाचा घोडा उधळला. उधळलेला घोडा आपल्याच दिशेने येत असल्याचे पाहून अहिल्याबरोबरच्या मैत्रिणी भिऊन पळून गेल्या. मात्र अहिल्या मुळीच डगमगली नाही. तिने आपण तयार केलेल्या शिवलिंगावर पालथे पडून त्या शिवलिंगाचे रक्षण केले. तेवढय़ात पाठीमागून आलेल्या श्रीमंतांनी थोडय़ाशा जरबेच्या आवाजातच अहिल्येला म्हटले की, पोरी तुला घोडय़ाने तुडवले असते तर? त्यावर अहिल्याबाई आपले डोळे श्रीमंतावर रोखत म्हणाली की, हे शिवलिंग मी घडविले आहे व आपण जे घडविले आहे त्याचे प्राणपणाने रक्षण करावे असे थोरली माणसे सांगतात. मी तेच केले आहे. तिचे बाणेदार उत्तर ऐकूण श्रीमंत तर खूष झालेच परंतु त्यांच्याबरोबर असलेले सरदार मल्हारराव होळकर यांनी छोटय़ा अहिल्येला आपली सून करून घेण्याचे ठरविले. त्याप्रमाणे मल्हाररावांनी तिला आपली सून करून घेतली आणि अहिल्याबाईंनी देखील नंतर मल्हाररावांचा निर्णय सार्थ ठरविला व होळकर घराण्याची कीर्ती सर्वदूर पोहोचविली. अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर यांचे इ.स. १७५४ मध्ये, कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यांच्या मृत्यूनंतर सासरे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही. १२ वर्षांनंतर, मल्हारराव होळकर हेही मृत्यू पावले. त्यानंतर अहिल्याबाई मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. अहिल्याबाईंनी आपल्या राज्याला तुंगांपासून?? वाचवले. त्या लढाईत अहिल्यादेवी स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली.
अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. राणी अहिल्यादेवी यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदी, घाट, बांधले, त्यांचा जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथयांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महंमदाने ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचे एक देऊळ बांधले. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात अहिल्याबाईना प्रजेस कल्याणकारी असे काम करण्यास आवड होती.
मल्हारराव होळकर यांचा मृत्युनंतर अहिल्याबाई होळकर यांना राजकारभार चालवू देण्यास काहींनी विरोध केला होता पण अहिल्याबाईनी हा विरोध मोडून काढला. अहिल्याबाई या शूर, न्याय देणाऱ्या राणी होत्या. अश्या पुण्यश्लोक अहिल्याबाईचा मृत्यू वयाचा ७० व्या वर्षी १३ ऑगष्ट १७९५ साली झाला. अहिल्याबाईचे कर्तुत्व, कार्य, विकास कामे, (इंदूरचा कायापालट) आजही जिवंत आहे. त्यांचा कार्याचा सन्मानार्थ सन १९९६ मध्ये, इंदुर शहरातील नागरिकांनी त्यांचा नावाने एक पुरस्कार सुरू केला. हा पुरस्कार दरवर्षी, जनसेवेचे विशेष काम करणाऱ्यास दिला जातो. भारताचे पंतप्रधानांनी पहिल्या वर्षी हा पुरस्कार नानाजी देशमुखांना दिला होतं. अहिल्याबाई होळकर यांचा स्मरणार्थ, इंदूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर असे नाव दिले गेले. अशा पराक्रमी कर्तुत्ववान मराठा राज्यकर्त्या अहिल्याबाई होळकर यांना मानाचा मुजरा. आहिल्याबाई होळकर माहिती मराठी
-प्रियांका पुंड.
Leave a Reply