Acidity Upay Marathi Acidity Home Remedies in Marathi
सध्याचा धावपळीच्या, स्पर्धेच्या जगामध्ये आपल्या आरोग्याकडे सगळ्यांचे दुर्लक्ष होत आहे. अपुरी झोप, वाढता ताण-तणाव, असंतुलित आहार, फास्ट फूड, जन्क फूडचे आती प्रमाणात सेवन, खाण्या-पिण्याच्या सवईबाबत निष्काळजीपणा. उशिरा उठणे, रात्री जागरण करणे, अवेळी जेवण, दिनचर्येत व्यायामाचा आभाव. या सर्व कारणांमुळे आपल्या सर्वांची प्रकृती खराब होत आहे. या बिघडलेल्या लाईफ स्टाईलमुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढत आहे. पित्त, आम्लपित्त होणे, पोटाचे आजार यासारख्या समस्या उद्भवतात. म्हणायला या समस्या छोट्या वाटतात पण खूप चिवट व त्रासदायक आहेत. चला मित्रानो आज आपण तुमच्या आवडत्या कॉलेज कट्टावर पित्त, आम्लपित्त या समस्यावर उपाय जाणुन घेऊयात.
पित्त या आजारावर सर्वात मोठा उपाय म्हणजे पथ्य पाळणे. यामध्ये खाण्यापिण्याचा सवई, दिनचर्येचे, वेळेवर जेवण, झोप, व्यायाम या सर्वांचे नियमित पालन कारावेच लागते हाच सर्वात मोठा रामबाण उपाय आहे.
आम्लपित्त किंवा पित्ताची कारणे.
विरुद्ध आहार घेणे.
अती आम्ल पदार्थांचे सेवन.
नासलेल्या पदार्थांचे सेवन.
आंबट ताक खाणे. जास्त उपवास करणे.
जेवल्यानंतर लगेच झोपणे.
जेवताना वरचेवर पाणी पिणे.
शिळे अन्न खाणे.
जास्त चहा पिणे.
भराभरा जेवण करणे.
Amlapitta आम्लपित्ताची लक्षणे.
अन्न पचन न होणे, आंबट कडू उलटी होणे.
छातीत जळजळ होणे. तिखट कडू ढेकर येणे.
आरुची, उदर गौरव, उदरशूल, शिरशूल,
Acidity Upay in Marathi आम्लपीत्तावर उपाय
तेलकट, जळलेल्या, मसाल्याचा पदार्थांचे सेवन टाळावे.
कोकम सरबत, आवळा सरबत, डाळिंब सरबत यासारख्या द्रव पदार्थांचे सेवन लाभदायक ठरते.
शतावरी कल्पाचा वापर करावा.
मुस्ता, उशीर, पर्पटी चंदन यांनी सिद्ध केलेल्या पाण्याचे सेवन करावे.
आवळा कँन्डी, गुलकंद यांचे सेवन गुणकारी असते.
सर्व पालेभाज्यांचे सेवन करावे. मेथी सोडून.
काळे द्राक्षे, काळे मनुके हे देखील लाभदायक ठरतात. हे pitta var upay in Marathi
Acidity Upay Marathi Acidity Solution At Home in Marathi आम्लपीत्तावर घरगुती उपाय.
आले, विलायची, तूप, दुध हे पित्त नाशक आहे. याचे सेवन तुम्ही करू शकता.
आरोग्यदायी तुळसीची पाने.
आपल्या सर्वाचा अंगणात तुळस असतेच, रोज २-३ तुळसीची पाने खाल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुळशीमधील एन्टी अल्सर घटक पित्तामुळे तयार झालेल्या विषारी द्रव्यांचा नाश करतात.
बडीशेप
बडीशेप हि पित्तनाशक आहे. जेवण केल्यानंतर बडीशेप खाण्याची आपल्याकडे प्रथा आहे.
वेलची
वेलची ही वात, कफ व पित्त यांमध्ये समतोल राखण्याचे काम करते. वेलचीचे सेवन लाभदायक आहे.
जिरे, लवंग, पुदिना, आलं, गुळ यांचे सेवन पित्तावर गुणकारी आहे. pitta var upay आहेत
Ayurvedic Medicine for Acidity in Marathi आम्लपीत्तावर आयुर्वेदिक उपाय.
आविपात्तिकर चूर्ण + त्रिफळा चूर्ण हे चमचाभर पाण्यासोबत रात्री झोपताना घ्यावे. अशाप्रकारचे acidity वर ayurvedic upchar आहेत. Acidity Upay Marathi
-डॉ मयुरी हजारे.
Leave a Reply