राज्याचा राज्यकारभार आणि राजकारण कसे असावे हे आचार्य चाणक्य यांच्या चाणक्य नीती प्रमाणे आजही लागू केले तर प्रजा सुखी राहू शकते जाणून घ्या काय आहे चाणक्य नीती. Acharya Chanakya information Biography in Marathi चाणक्य नीती मराठी

आचार्य चाणक्य
राज्यशास्त्राचे रणनीतीकार आचार्य चाणक्य लहानपणापासूनच रागीट गंभीर आणि शिस्तप्रिय तार्किक होते त्याच्याविषयी गूढ इतिहास जाणून घ्या.
आजकालच्या राजकारणात आपण ऐकतोय अमित शाह चाणक्य आहेत, शरद पवार, प्रशांत भूषण, संजय राऊत अशी अनेक नावे चाणक्य म्हणून आपण ऐकत आहोत. पण खरे आचार्य चाणक्य कोण आणि कसे होते त्यांची चाणक्य नीतिजाणून घेऊयात.
त्यांनी जवळजवळ २००० वर्षांपूर्वी लिहिलेला “अर्थशास्त्र” हा ग्रंथ आजही राजकारणात महत्वाचा आहे. सिविल सर्विसची तयारी करणारा प्रत्येक विद्यार्थी आजही अर्थशास्त्राचा अभ्यास करतो राज्याची, राजाची आणि मंत्रिमंडळाची कर्तव्ये यांचे त्यात यथार्तित वर्णन केले आहे.
एका छोट्या मुलाला शिक्षण देऊन मगध साम्राज्याचा सम्राट बनवणाऱ्या आचार्य चाणक्य याविषयी आज माहिती घेऊया.
चाणक्य विचार मराठी
इतिहासपूर्व काळात राजनीतिक विज्ञान आणि अर्थशास्त्र या सारख्या क्षेत्रांचा केलेला विकास आणि त्यासाठी दिलेलं आपलं महत्वपूर्ण योगदान याकरता आचार्य चाणक्य यांना आजसुद्धा या क्षेत्रातील विद्वान आणि आग्रणी मानलं जाते. आचार्य चाणक्य यांनी आपल्या बुद्धिमान आणि कुशल विचारांनी मुत्सद्देगिरी आणि राजकारनाची सरळ साधी व्याख्या केली आहे.
भारतवर्षामध्ये आचर्य चाणक्य यांना एक थोर रणनीतीकार, अभ्यासक आणि समाजसेवक मानलं जाते. आचार्य चाणक्य यांच्या रणनीतीचा वापर करून अनेक विशाल साम्राज्यांची स्थापना करण्यात आली आहे. चला तर जाणून घेऊया अश्या या महान विद्वान आणि अर्थशास्त्रज्ञ असणारे आचार्य चाणक्य यांच्या जीवनाविषयी, त्यांचे महान विचार आणि त्यांच्या महानते बद्दल. कश्या प्रकारे त्यांनी स्वत:ला गरिबीतून सावरून एक महान विद्वान बनले.
आचार्य चाणक्य यांचे बालपण
“भाग्य पण त्यांचीच साथ देते जे कितीही कठीण परिस्थिती असली तरी आपल्या ध्येयांवर ठाम राहतात.” या प्रकारचे थोर विचार असणारे महान विद्वान आचार्य चाणक्य यांच्या जन्मा बद्दल काही सप्ष्ट उल्लेख नाही आहे. तरी सुद्धा त्यांचा जन्म बुद्ध धर्मानुसार ईसा पूर्व ३५० मध्ये तक्षशीला मधील कुटील नावाच्या एका ब्राह्मण कुटुंबात जन्म झाला. असं असलं तरी, आचार्य चाणक्य यांच्या जन्मा बद्दल विद्वानांमध्ये बरेच मतभेद आहेत. काही विद्वानांच्या मते त्यांचा जन्म कुटील घरात झाला आहे. म्हणूनच त्यांना कौटिल्य म्हणून ओळखले जाते. तर काही विद्वानांच असं मत आहे की, ते आपल्या उग्र आणि मूळ स्वभावामुळे “कौटिल्य” म्हणून ओळखले जातात. तसेच काही विद्वानांच्या विचारानुसार या थोर आणि बुद्धिमान अर्थशास्त्रज्ञांचा जन्म नेपाळच्या “तराई” मध्ये झाला होता. तर जैन धर्मानुसार त्याचं जन्मस्थळ “मैसूर” (बंगळूर) मधील श्रावणबेलगोला मानल जाते. याचं प्रमाणे त्यांच्या जन्म ठिकाणा बद्दल “मुद्राराक्षस” ग्रंथाची रचना करणारे विशाखा दत्त यांच्या मतानुसार त्यांच्या वडिलांना चमक म्हटलं जात असे. याच कारणामुळे त्यांच्या वडिलांच्या नावाच्या आधारे त्यांना चाणक्य म्हटलं जाऊ लागलं.
गरिबीमुळे त्यांना पोटभर जेवण पण मिळत नव्हतं, कधी कधी तर उपाशीच झोपावं लागत असे. आचार्य चाणक्य लहान पणा पासूनच खूप रागीट आणि जिद्दी स्वभावाचे व्यक्ती होते. त्यांच्या उग्रवादी स्वभावाच्या वृत्तीमुळे त्यांनी नंद अंशाचा विनाश करण्याचा कठोर निर्णय घेतला. आचार्य चाणक्य यांना सुरवातीपासूनच साधे राहणीमान पसंद होते. काही इतिहासकारांच्या मतानुसार आचार्य चाणक्य महामंत्री सारख्या मोठ्या पदावर आणि मोठया प्रमाणात राजेशाही थाटात वावरत असतांना त्यांनी कधीच आपल्या पदाचा गैर वापर केला नाही. त्यांना धन आणि यशाचा कधीच लोभ नव्हता. आचार्य चाणक्य (कौटिल्य) यांनी आपल्या जीवनात अनेक चढ-उतार पहिले होते. शिवाय त्यांनी जीवनात केलेला संघर्ष आणि त्यांचे उच्च विचारांमुळे ते एक महान विद्वान बनले.
अलेक्झांडरचे भारतावरील आक्रमण चाणक्याच्या आयुष्यात मोठी उलाढाल करून गेले. अलेक्झांडरच्या आक्रमणाचा सामना फक्त भारतीय राज्यांची एकत्र सेनाच करू शकेल असा विश्वास विष्णुगुप्ताला होता, त्यामुळे चाणक्याने विविध राज्यांच्या राज्यकर्त्यांना एकत्र लढण्याचे आवाहन केले. परंतु सुरुवातीलाच तक्षशिलेचा राजकुमार आंभी याने अलेक्झांडरकडे मैत्रीचा हात पुढे केला. परंतु विविध राज्यांचे व जनपदांचे एकमेकांशी हेवेदावे व संघर्षांमध्ये अडकलेल्या राज्यांना एकत्र करून अलेक्झांडरविरुद्ध लढण्यासाठी प्रेरित करण्यात चाणक्यला अपयश आले. उलट आंभीने अलेक्झांडरबरोबर युती करून पोरसविरुद्ध लढण्यास मदत केली. अलेक्झांडरने पोरसचा झेलम नदीच्या किनारी झालेल्या लढाईत पराभव केला. चाणक्याने या काळात मगध साम्राज्यालाही अलेक्झांडरविरुद्ध इतर राज्याशी युती करून लढण्यास विनंती केली व भारताला पारतंत्र्यापासून वाचवण्याचा आग्रह धरला. परंतु चाणक्याचा अपमान करून त्याची विनंती धुडकावून लावण्यात आली. जोवर या अपमानाचा बदला घेणार नाही तोवर आपली शेंडी बांधणार नाही अशी चाणक्याने प्रतिज्ञा घेतली होती अशी कथा प्रसिद्ध आहे.
अलेक्झांडरच्या सैन्यामध्ये इतर भारतीय राज्यांच्या सामर्थ्याबद्दलच्या कहाण्या ऐकून त्याच्या सैन्यामध्ये दुफळी माजली व परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी त्याने मसेडोनियला परतण्याचा निर्णय घेतला व काही काळातच अलेक्झांडरने भारतातून माघार घेतली. माघार घेतली तरी जिंकलेला प्रदेश अलेक्झांडरच्या नियंत्रणात रहावा म्हणून या राज्यांवर क्षेत्रापालांची नेमणूक केली होती त्यामुळे पश्चिम व वायव्य भागावर ग्रीक सत्ताच होती.
तक्षशिलेला परतल्यावर चाणक्याने आपल्या शिष्यांना संघटित करून ग्रीकांविरुद्ध स्वातंत्र्ययुद्धासाठी प्रेरित केले व शिष्यांमार्फत जनजागृतीचे कार्य करून घेतले. चंद्रगुप्तने चाणक्याच्या नियोजनानुसार अनेक लहान सहान लढाऊ जमातींना एकत्र करून ग्रीक छावण्यांवर आक्रमणे करण्यास सुरुवात केली. जनजागृती व चंद्रगुप्तचे यश यामुळे ग्रीकांविरुद्धच्या मोहिमेला व्यापक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. चाणक्यच्या नियोजनानुसार चंद्रगुप्ताच्या सैनिकांद्वारे ग्रीक सैन्यातील फक्त ग्रीकांवर हल्ले करण्यात येत व भारतीयांना जीवदान देण्यात येत असे. यामुळे ग्रीक सैन्यातील भारतीयांची द्विधा मानसिकता झाली तसेच ग्रीक सैनिकांचाही विश्वास कमी झाला. यामुळे ग्रीकांसोबत लढणाऱ्या अनेक भारतीय तुकड्यांना सेवेतून डच्चू मिळाला व ते चंद्रगुप्ताला येऊन मिळाले. चाणक्याने तक्षशिलेला आपल्या विजयाचे लक्ष्य बनवले त्यामुळे आंभीची राजकीय नाचक्की झाली. चंद्रगुप्ताने अनेक प्रांतांमधून ग्रीकांना हुसकावून लावले व ते प्रांत स्वतंत्र घोषित केले. पोरस हा अलेक्झांडरचा अंकित असल्याने युद्धाची झळ त्यालाही बसत होती. परंतु चाणक्याने पोरसला इंद्रदत्तामार्फत या संघर्षात बघ्याची भूमिका घेण्यास प्रवृत्त केले त्यामुळे ग्रीकांची हतबलता अजून वाढली. चाणक्याच्याच कुशल नीतीमुळे सिंध प्रांत सहजपणे पोरसच्या राज्याला जोडला गेला त्यामुळे पोरसचा चाणक्यावर विश्वास वाढला. या वाढलेल्या विश्वासावर चाणक्याने पोरसच्या मदतीने मगधवर आक्रमण करण्याचे ठरवले.
आचार्य चाणक्य आणि चंद्रगुप्त यांचे घनिष्ट संबंध होते. चाणक्य हे चंद्रगुप्त यांच्या साम्राज्याचे महामंत्री (सरचिटणीस) होते. त्यांनीच चंद्रगुप्त यांना साम्राज्य स्थापण करण्यास मदत केली होती. मगध राज्याचे शासक धनानंद यांच्या कडून आचार्य चाणक्य यांचा अपमान करण्यात आला होता. यानंतर आपल्या अपमानाचा बदला घेण्याकरता त्यांनी नंद घराण्याचे साम्राज्य नष्ट करण्याचा संकल्प केला. आपला संकल्प तडीस नेण्याकरता चाणक्य यांनी आपला प्रवास सुरु केला. आचार्य चाणक्य यांनी सर्वप्रथम चंद्रगुप्त यांना आपले शिष्य बनविले. चंद्रगुप्त यांच्या प्रती असणाऱ्या प्रतिभेला चाणक्य यांनी आधीच ओळखून घेतलं होतं. आपला संकल्प पूर्ण करण्याकरता त्यांनी चंद्रगुप्त यांची निवड केली होती. आचार्य चाणक्य यांची जेंव्हा चंद्रगुप्त सोबत भेट झाली होती त्यावेळेला चंद्रगुप्त केवळ नऊ वर्षाचे होते. यानंतर चाणक्यांनी आपल्या विलक्षण ज्ञानाच्या साह्याने चंद्रगुप्त यांना अप्राविधिक विषय आणि व्यावहारिक, प्रविधिक कलेचे शिक्षण दिले. आचार्य चाणक्य यांनी आपला नंद साम्राज्य नष्ट करण्याचा संकल्प पूर्ण करण्याकरता चंद्रगुप्त यांची निवड करण्या मागील उद्देश असा होता की, त्या काळी शासकांच्या काही प्रमुख जाती होत्या ज्यात शाक्य व मोर्य घराण्यचा प्रभाव जास्त होता. चंद्रगुप्त हे मोर्य घराण्याच्या प्रमुखाचे पुत्र होते. हे आचार्य चाणक्य यांना चांगलेच माहित होतं. यानंतर आचार्य चाणक्य यांनी चंद्रगुप्त यांना आपले शिष्य बनविलं आणि त्यांच्या सोबत मिळून एक नविन साम्राज्याची स्थापना केली.
महान तत्वज्ञानी तसेच बुद्धिमान म्हणून प्रसिद्ध असणारे आचार्य चाणक्य यांनी विकसित राज्याची स्थापना करण्याकरता आपले विचार व्यक्त केले होते. त्यांच्या अवधारणे नुसार एका विकसित राज्याच्या निर्मितीकरिता “राजा आणि प्रजा यांच्यात वडिल आणि मुलाचे नाते असायला पाहिजे”.
कौटिल्य यांनी राज्याच्या निती बद्दल असं म्हटलं आहे की, राज्याची निर्मिती त्यावेळेस झाली होती ज्यावेळेला “मत्स न्याय” च्या कायद्याला कंटाळून लोकांनी मनु यांना आपले राजा म्हणून निवडले आणि राजाला आपल्या राज्यातील शेतीचा सहावा भाग आणि अलकारातील दहावा भाग राजाला देण्यास सांगितले. याबद्दल राजा आपल्या राज्यातील प्रजेची सुरक्षा करीत असे. तसेच त्यांनी समजाच्या कल्याणाचे दायित्व स्वीकारली होते.
आचार्य चाणक्य यांनी आपल्या महान बुद्धी आणि विचारांच्या जोरावर सांगत की, प्रजेच्या सुखातच राजाचे सुख असायला पाहिजे आणि प्रजेच्या हितातच राजाचे हित असायला पाहिजे. याकरिता पहिले राज्यातील राजांना प्रशिक्षित करायला पाहिजे जेणेकरून ते चांगल्या राज्याची निर्मिती करू शकतील आणि त्याचा विकास करू शकतील. चाणक्य यांची शासक पदाबद्दल अशी धारणा होती की, एक चांगला शासक बनायचं असेल तर त्याची सुरवात सर्वप्रथम मुंडण संस्कृतीने करायला पाहीजे. शासकाने सर्वप्रथम वर्णमाला आणि अंकमाला याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. या विषयाचे ज्ञान आल्यानंतर त्यांनी दंडनीतीचे शिक्षण घ्यायला पाहिजे. तेंव्हाच ते एक कुशल शासक बनू शकतील. आचार्य चाणक्य यांनी आपल्या याच रणनीतीचा वापर करून चंद्रगुप्त मोर्य यांना बालपणापासून एका चांगल्या शासका प्रमाणे शिक्षित केलं.
आचार्य चाणक्य यांच्या मते, राज्याचा शासक हा कुळातील असायला पाहिजे, तेंव्हाच तो एका चांगल्या राज्याची निर्मिती करण्यात यशस्वी होऊ शकेल. चांगल्या शासका शिवाय चांगल्या राज्यची निर्मिती होऊ शकणार नाही. राज्याचा शासक हा शारीरिक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. जर राज्याचा शासक शारीरिकदृष्ट्या स्वस्थ असेल तरच तो आपल्या राज्यातील प्रजेकडे चांगल्याप्रकारे लक्ष ठेऊ शकेल. चाणक्य यांच्या मतानुसार राज्याच्या शासकाने नेहमीच आपल्या राज्यातील प्रजेच्या हिताकडे लक्ष दयायला पाहिजे. तसेच वेळ पाडली तर त्यांच्यासाठी युद्ध केलं पाहिजे. राज्याच्या शासकाने काम, क्रोध, लोभ, मोह आणि माया यापासून दूर राहायला पाहिजे. राज्याच्या शासकाने निडर आणि बलवान असायला पाहिजे.
आतिशय प्रतीभावशाली शैलीचे धनी, बुद्धिमान तसेच भारतीय अर्थशास्त्र ग्रंथाचे रचना करणारे महान अर्थशास्त्रज्ञ आचार्य चाणक्य यांचा मृत्यू ईसा पूर्व २७५ मध्ये झाला. त्यांच्या जन्मा प्रमाणे त्यांचा मृत्यू देखील अनेक प्रकारच्या रहस्यांनी वेढलेला आहे. आचार्य चाणक्य यांनी आपले आयुष्य दीर्घकाळापर्यंत जगले. परंतु, त्यांच्या मृत्यू बद्दल काहीच स्पष्ट सांगता येणार नाही, की त्यांचा मृत्यू हा झाला कसा? एका पुराणिक कथेनुसार त्यांचा मृत्यू त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केला होता आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तसेच, इतरकाही पुराणिक कथेनुसार, चंद्रगुप्त मोर्य यांचे पुत्र बिंदुसार यांच्या शासन काळात आपल्या राजनीतिक षडयंत्रामुळे त्यांचा मृत्यू झाला.
अक्षय जाधव.
कॉलेज कट्टा.
Acharya Chanakya information Biography in Marathi
चाणक्य नीती मराठी
Leave a Reply