या पाच भारतीय शास्त्रज्ञांनी भारत मातेसाठी केलेले कार्य पाहून तुम्हाला त्यांचा अभिमान वाटेल. या शास्त्रज्ञांकडून आपणही देशासाठी काहीतरी करून दाखवावे ही प्रेरणा मिळते. जिद्द, चिकाटी, कठोर मेहनत आणि यश मिळेपर्यंत प्रयत्न करत राहणे या गोष्टी आपण या शास्त्रज्ञांकडून शिकायला हव्यात. चला तर या “5 Indian Scientist Information in Marathi Language” वाचूयात. Studymode Indian Scientist Essay in Marathi language
5 Indian Scientist Information in Marathi Language
Aryabhatta Information In Marathi language
Cv Raman Scientist Information in Marathi language
Dr Homi Bhabha Information in Marathi language
Dr Vijay Bhatkar Information in Marathi language
Dr Jayant Vishnu Narlikar Information in Marathi
भारतीय शास्त्रज्ञ व त्यांनी लावलेले शोध माहिती मराठी भारतीय संशोधकांची नावे व त्यांनी लावलेले शोध यांची माहिती
Aryabhatta Information In Marathi language
आर्यभट्ट गणितज्ञ माहिती मराठी
जन्म – इ.स. ४७६
मृत्यू- इ.स. ५५०
उल्लेखनीय कार्य– जगाला दिलेली शून्याची देणगी.
शून्य ही भारताने जगाला दिलेली सर्वात मोठी अमूल्य देणगी आहे असे आपण म्हणतो पण याच शून्याचा शोध कुणी लावला हा प्रश्न जर आपणास विचारला तर लगेच उत्तर येते आर्यभट्ट. याच आर्यभट्टाचा जन्म शके ३९८ म्हणजेच इ.स. ४७६ मध्ये बिहारमधील पाटलीपुत्र येथे झाला. हा सामान्य आर्यभट्ट आपल्या असामान्य कर्तुत्वाने इतिहासात अजरामर झाला. आर्यभट्टांचे बालपण तसेच त्यांचे उर्वरित आयुष्य पाटलीपुत्र मध्येच गेले. त्यांनी लिहिलेल्या खगोलशास्रीय ग्रंथात प्रथम ‘आर्यभटिय’ किंवा आर्यसिद्धांत हा सर्वात प्राचीन ग्रंथ आहे. या ग्रंथास आर्यभटिय हे नाव स्वतः आर्यभटानीच दिले आहे. त्यास त्यांचे शिष्य आर्यासिद्धांत असे म्हणत असत. याच आर्यभटीय ग्रंथात दशगीतिका व आर्यष्ठशत असे दोन भाग आहेत. काही तज्ज्ञांच्या मते हे दोन भाग नाहीत तर ते दोन वेगवेगळे भाग आहेत. या दोन्हीही ग्रंथ हे एकमेकांवर अवलंबून असल्याने यास एकच ग्रंथ मानता येईल. त्यास पद असून फक्त एकशे एकवीस श्लोक आहेत.
आर्यभट्ट यांच्या दशगीतिका भागातील तेरा श्लोकापैकी दहा श्लोकात हे ग्रहभगणासंबंधी विवेचन केले आहे (भगण म्हणजे ग्रहांची नक्षत्रमंडळातून एक प्रदक्षिणा) तर इतर तीन श्लोक हे प्रार्थनेवर आधारित आहेत. त्यांनी लिहिलेल्या चार पदे –
१) गीतिका पाद
२) गणितपाद
३) कालक्रियापाद
४) गोलपाद.
त्यासोबतच बीजगणित, भूमिती, अंकगणित या गणिती शाखांचा त्यांचा प्रचंड अभ्यास होता. त्यांनी बीजगणित व ज्योतिषशास्रावर वयाच्या तेविसाव्या वर्षी ग्रंथ लिहिला. त्यामुळे त्यांना बीजगणिताचे जनक असेही म्हणतात. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते म्हणजेच तिला स्वताची दैनंदिन गती आहे हे सांगणारे आर्यभट्ट हे पहिले शास्रज्ञ होते. आर्यभट्टने वर्षातील ३६५ दिवस, १५ घटी, ३९ पळे व १५ विपळे इतक्या सूक्ष्म भागापर्यंत कालमापन नोंदवून ठेवले आहे. त्यांनी पाय नावाच्या संकल्पनेची ६३,८३२/२०००० आहे असेही नोंदवले आहे. त्याने सूर्य सिद्धांतावर लिहिलेला टीका ग्रंथ सूर्य सिद्धांत प्रकाश या नावाने प्रसिध्द आहे. आर्यभट्ट यांनी खगोलीय निरीक्षणात ११ ऑगस्ट इ.स. ५१९ रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण पाहिल्याबद्दल त्यांना समाजाच्या रोषास सामोरे जावे लागले होते. त्यांना समाजाने बहिष्कृत केले होते. पण शेवटी त्यांनी सिद्ध केले की अंधश्रद्धेच्या पगड्यातून बाहेर पडून जगाचा, ग्रहाच, तार्यांचे निरीक्षण करायला हवं. आज त्यांच्यामुळेच कितीही मोठी आकडेमोड क्षणात होते. त्यामुळे त्यांना He is Good Mathematician असे गौरवल गेल. त्यांचा मृत्यू इ.स.५५० मध्ये झाला.
भारत सरकारने त्यांच्या गौरवार्थ १९ एप्रिल १९७५ मध्ये आर्यभट्ट नावाचा कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित केला.
Cv Raman Scientist Information in Marathi language
सी व्ही रामन माहिती मराठी
सर सी व्ही रामन
पूर्ण नाव- चंद्रशेखर व्यंकट रामन
जन्म- ७ नोव्हेंबर १८८८ (तिरुचिरापल्ली, तामिळनाडू)
मृत्यू- २१ नोव्हेंबर १९७० ( बंगरूळ, कर्नाटक)
विशेष कार्य– सी. व्हि. रामन यांनी भौतीकशास्र या विषयात केलेल्या संशोधनातून प्रकाशाचे मॉलीक्युलर स्कॅटरिंग म्हणजेच रामन इफेक्ट हा सिद्धांत मांडला. त्याबद्दल त्यांना भौतीकशास्र या विषयातील नोबेल पारितोषिक मिळाले.
आपण ज्यांच्या सन्मानार्थ २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो त्या सर चंद्रशेखर व्यंकट रामन यांचा जन्म तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली या गावी ७ नोव्हेंबर १८८८ रोजी झाला. त्यांचे वडील चंद्रशेखर अय्यर हे एस. पी. जी कॉलेज मध्ये भौतिक शास्राचे प्राध्यापक होते. त्यामुळे त्यांना घरात भौतीकशास्राच वातावरण मिळालं. त्यांनी आपल्या चाणाक्ष बुद्धिमत्तेच्या जोरावर वयाच्या बाराव्या वर्षीच अत्यंत कठीण मानली जाणारी मेट्रिक्स परीक्षा उत्तीर्ण केली. त्यावेळी त्यांना डॉ. अॅनि बेझंट याचं भाषण ऐकण्याची संधी मिळाली. त्यांच्या विचारांचा प्रचंड पगडा सी.व्ही. रामन यांच्यावर पडला. त्या दरम्यान त्यांच्या वडिलांनी त्यांना परदेशात शिक्षणासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यांच्या प्रकृतीचा विचार करता एका डॉक्टरांच्या सांगण्यावरून त्यांना विदेशात न पाठवण्याचे ठरले. त्यामुळे त्यांना आपल्या देशात राहूनच शिक्षण घेण गरजेच होत. त्यांनी १९०३ मध्ये चेन्नई येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पुढे चालून त्यांनी प्रकाशाचे मॉलीक्युलर स्कॅटेरिंग हा शोधनिबंध प्रकाशित केला. ज्या दिवशी त्यांनी नेचर या मासिकात शोधनिबंध प्रकाशित करण्यासाठी पाठवला होता. त्या दिवसच स्मरण रहाव म्हणून भारत सरकारने हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. त्यांनी आपला देश घडावा म्हणून इंडियन इंस्टिट्युत ऑफ सायन्स, बंगरूळ येथे त्यांनी ज्ञानदानाच कामही केल. त्यांच्या आयुष्यात त्यांना अनेक पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्यांनी भौतीकशास्रात केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना १९३० सालचा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. त्यासोबतच लेनिन शांतता पुरस्कार, भारतातील सर्वोच्च मानला जाणारा भारतरत्न या पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. या महान शास्राज्ञाच्या नावाने रॅन्चो नावाची संस्था २०११ सालापासून दरवर्षी डिसेंबर मध्ये पुरस्कार देत असते. या महान शास्रज्ञाचा देहांत २१ नोव्हेंबर १९७० मध्ये बंगरूळ येथे झाला.
Dr Homi Bhabha Information in Marathi language
डॉ होमी भाभा अणुसंशोधन मराठी माहिती
डॉ. होमी जहांगीर भाभा
जन्म- ३० ऑक्टोबर १९०६ ( मुंबई)
मृत्यू- २४ जानेवारी १९६६ (माँत, ब्यांको, इटली.)
विशेष कार्य-
डॉ.होमी भाभा हे भारतीय अणुशास्रज्ञ होते. त्यांनी भारतात अणुउर्जा विकास कार्यक्रमाचा पाया रचला म्हणून त्यांना भारताच्या अणुउर्जा व अण्वस्र विकासकार्याचे प्रणेते मानले जातात.
भारताला जगाच्या पंक्तीत नेऊन बसवणारे डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा जन्म मुंबईतील एका सधन पारशी कुटुंबात झाला. वडील पेशाने बॅरीस्टर असल्याने घरात पुस्तकांची रेलचेल असायची. त्यात विज्ञानाची खूप पुस्तके होती. त्यामुळे लहानपणापसूनच त्यांची पुस्तकांशी मैत्री जमली. त्यासोबतच त्यांना चित्रकला, कविता व वक्तृत्व करण्याचाही छंद होता. त्यांचे प्राथमिक ते पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईमध्येच झाले. त्यानंतर त्यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी इंजिनियरिंग करावी. पण भाभांनी वडिलांना स्पष्टपणे सांगितले कि मला भौतीकशस्र व गणित या विषयांची आवड आहे. वडिलांनी त्यांना आधी इंजिनियरिंग व मग तुला काय करायचे आहे ते कर असे सांगितले. तेव्हा वडिलांच्या परवानगीनंतर भाभांनी केम्ब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला व १९३० साली ते प्रथम श्रेणीत इंजिनियर झाले. त्यावेळी ते पॉल डिरॅक यांच्या मार्गदर्शनाखाली गणिताचाही अभ्यास करत होते. त्यासोबतच कॅव्हेंडीश लॅबोरटरीत न्युक्लीयर फिजिक्सचाही अभ्यास करून त्यांनी इ.स.१९३३ मध्ये डॉक्टरेट मिळवली. त्या काळात त्यांनी अनेक शिष्यवृत्या व बक्षिसेही मिळवली होती.
इ.स.१९४० साली परदेशातून परत आल्यावर त्यांनी भारतीय विज्ञान संस्था, बंगरूळ येथे काही काळ प्रोफेसर म्हणूनही काम केले. तसेच १९४५ मध्ये त्यांनी टाटा मुलभूत संशोधन संस्थेची स्थापना करण्यास मदत केली. डॉ. होमी जहांगीर भाभा आपले संशोधन कार्य संभाळून टाटा मुलभूत संशोधन संस्थेचे संचालक झाले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९४८ मध्ये त्यांनी पुढाकार घेऊन अणुउर्जा आयोगाची स्थापना केली. या आयोगाचे संचालक म्हणून ते स्वताच काम पाहू लागले. त्यांनी केलेल्या अपार कष्टाच फळ म्हणूनच भारत देशात अणुभट्ट्याची स्थापना होऊ शकली. ज्यावेळी पश्चिमी देशातील शास्रज्ञ अल्पविकसित देशांच्या अणु कार्याक्रमाच्या विरोधात होते तेव्हा अणूचा वापर शांततेच्या मार्गानेच औद्योगिक विकासासाठी व्हावा अस स्पष्ट मत त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या सभेत मांडले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अणुभट्ट्या सुरु करून त्याचा उपयोग वीजनिर्मितीसाठी केला जाऊ लागला. सर की.व्ही. डॉ. होमी जहांगीर भाभा विषयी बोलतांना म्हटले होते कि भाभा हा भारताचा लिओनार्डो द विन्ची आहे. त्यांनी आपल्या आयुष्यात अत्यंत कमी संशोधकांच्या साथीने भारतीय अवकाश संशोधनाच्या कार्यात महत्वाची भूमिका बजावली. त्यांना पद्मभूषण पुरस्कारानेही गौरवण्यात आल होते. त्यांना भारतीय संशोधनातील पूर्ण पुरुष असाही म्हटलं जत असे. त्यांचा मृत्यू संयुक्त राष्ट्र सभेच्या बैठकीला जात असतांन २४ जानेवारी १९६६ रोजी फ्रांसच्या सरहद्दीजवळ विमान अपघातात झाला आणि भारतीय संशोधनातला हिरा हरवला.
5 Indian Scientist Information in Marathi Language
Scientist Information in Marathi pdf
Indian Scientists and Their Inventions in Marathi language
डॉ विजय भटकर माहिती
विजय पांडुरंग भटकर
जन्म- ११ ऑक्टोबर १९४६
विशेष कार्य-
महासंगणकाची निर्मिती करून भारताला तंत्रज्ञानाच्या जगात मजबूत अस्तित्व निर्माण करून दिले.
डॉ विजय पांडुरंग भटकर यांचा जीवनप्रवास
अमेरिकेने घातलेल्या तंत्रज्ञानाच्या अटी नाकारून भारताला तंत्रज्ञानाच्या जगात मजबूत अस्तिव निर्माण करून देणारे सुपरकम्पुटरचे जनक विजय भटकर यांचा जन्म ११ ऑक्टोबर १९४६ रोजी अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर तालुक्यातील मुरंबा या अडीचशे ते तीनशे लोकवस्तीच्या गावात झाला. महान महत्वाकांक्षा आणि चाणाक्ष बुद्धीमत्ता यांमुळे ते सर्वांचे प्रिय होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुरंबा येथे तर शालेय शिक्षण करजागाव या ठिकाणी झाले. त्यापुढील इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग ते पी.एच.डी. पर्यंतचे शिक्षण मुर्तीजापूर, अमरावती, नागपूर, वडोदरा तसेच दिल्ली या ठिकाणावरून पूर्ण केले. त्यावेळी त्यांना परदेशी नोकर्यांची अनेक आमंत्रणे येत असतांना त्यांनी भारत मातेची सेवा करण्यासाठी देशातच राहायचं ठरवलं.
त्यावेळी विक्रम साराभाईंच्या अध्यक्षतेखाली १९६८ साली इलेक्ट्रोनिक्स कमिशनची स्थापना झाली. तेव्हा भटकरांना त्या कमिशनवर तब्बल दहा वर्षे काम करण्याची संधी मिळाली. त्यासोबतच भटकर हे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी इलेक्ट्रोनिक्स आणि दूरसंचारसाठी १९७२ मध्ये नेमलेल्या महत्वाच्या समितीचे सदस्य होते. त्यांनी त्रिवेंद्रममध्ये इलेक्ट्रोनिक्स रिसर्च अॅँड डेव्हलपमेंट हि भारतातील सर्वात मोठ्या प्रयोगशाळेची स्थापना केली. तसेच त्यांनी १९८०-१९८७ या काळात या संस्थेचे संचालक पदही भूषवले. विजय भटकरांनी अनेक उपकरणे व प्रणाल्या विकसित केल्या. सुरक्षिततेच्या आणि उत्पादन क्षमतेच्या बाबतीत त्यांनी भिलाई प्लांट मध्ये सुधारणा करून दिल्या. वाहतूक नियंत्रण प्रणाली, उद्योगातील स्वयंचलित यंत्रणा, कलकत्ता येथील भुयारी रेल्वेची संगणकीय प्रणाली डॉ विजय भटकरांनी विकसित केली. केरळमध्ये आठरा कारखाने उभारण्यासाठी मार्गदर्शन केले. ते १९८७ मध्ये टाटा कन्सलटीत उपाध्याक्षाही झाले.
अमेरिकेने भारताला संगणक विक्रीसाठी घातलेल्या अटी नाकारून कोणताही अनुभव पाठीशी नसतांना डॉ. विजय भटकर यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या शब्दाखातर त्यांनी स्थापन केलेल्या पुणे विद्यापीठातील सी.डॅक या संस्थेत काम करण्यासाठी आले. त्यांनी महासंगणक परम-८०० हा संगणक अमेरिकेने देऊ केलेल्या किमतीच्या अगदीच निम्म्या किमतीत व निम्म्या वेळेत बनवला. त्यानंतर त्यांची झेप उंचच राहिली. त्यांनी १९९८ मध्ये परम-१००० हे संगणक बनवले. परम हा संगणक सर्वश्रेष्ठ आहे. हा संगणक प्रती सेकंद अब्ज गणिते सोडवू शकतो. अंतराळातील संशोधन, भूगर्भातील हालचाली, तेलसाठे संशोधन, वैद्यकिय हवामान, अभियांत्रिकी, लष्करी अशा अनेक क्षेत्रांसाठी परम संगणक उपयोगी पडत आहे. एवढ्या मोठ्या क्षमतेचा संगणक अमेरिका व जपान वगळता फक्त भारतात आहे. त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना संगणकाच प्रशिक्षण दिले व संगणक साक्षर बनवले. आज भारत जागतिक स्तरावर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सेवांचा सर्वात मोठा निर्यातदार आहे त्यामागे डॉ विजय भटकर यांचे प्रचंड परिश्रम आहेत.
त्यांना त्यांच्या आजपर्यंतच्या आयुष्यात अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल आहे. त्यापैकी महाराष्ट्र भूषण, पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार मिळाले आहेत.
5 Indian Scientist Information in Marathi Language
Dr Jayant Vishnu Narlikar Information in Marathi
डॉ जयंत विष्णू नारळीकर मराठी माहिती
नाव- जयंत विष्णू नारळीकर
जन्म- १९ जुलै १९३८ (कोल्हापूर)
विशेष कार्य-
डॉ जयंत नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल यांच्या सोबत कान्फोर्माल ग्रॅविटी थियरी मांडली.
जीवनप्रवास-
डॉ. जयंत नारळीकर यांचा जन्म १९ जुलै 1938 रोजी कोल्हापूर येथे रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर या सुप्रसिध्द गणितज्ज्ञाच्या घरी झाला. जयंत नारळीकरांचे वडील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते. त्यांचे शालेय शिक्षण बनारस येथेच झाले. त्यांनी इ.स.१९५७ साली विज्ञानात पदवी संपादन केली. या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. त्यानंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी ब्रिटन मधील केम्ब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. तेथे त्यांनी बीए, एमए, पीएचडी च्या पदव्या संपादन केल्या. त्यांनी अत्यंत कठोर परिश्रम करून रँगलर ही पदवी संपादन केली. त्यांनी अत्यंत मानाचे असणारे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक पुरस्कार व बक्षिसे पटकावली.
त्यांचा विवाह १९६६ साली मंगला राजवाडे यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत. गीता, गिरीजा व लीलावती. ते १९७२ साली पुन्हा भारतात परतले. त्यानंतर त्यांनी मुंबई येथील टाटा संशोधन संस्थेच्या खगोलशास्र या विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. त्यानंतर पुणे येथील १९८८ साली आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
डॉ. नारळीकरांनी स्थिर स्थिती सिद्धांत मांडला. तसेच चार दशकाहून अधिक काळापासून त्यांनी खगोलीय क्षेत्रात संशोधन सुरु आहे. माणसाला खगोलशास्र समजण्यासाठी त्यांनी अनेक पुस्तक लिहिली आहेत. त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी नभात हासते तारे या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत. तसेच चार नगरांतील माझे विश्व हे डॉ नारळीकर यांचे आत्मचरित्र आहे.
त्यासोबतच त्यांना १९६५ व २००४ साली पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. तर २०१० मध्ये महाराष्ट्रभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे.
मित्रांनो वरील “5 Indian Scientist Information in Marathi Language” भारतीय शास्त्रज्ञांची माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा आणि मराठी निबंध, चरित्र, माहिती वाचण्यासाठी आपल्या आवडत्या कॉलेज कट्टा ‘college Catta’ या संकेतस्थळाला पुन्हा नक्की भेट द्या.
5 Indian Scientist Information in Marathi Language Scientist Information in Marathi pdf Indian Scientists and Their Inventions in Marathi language भारतीय थोर विज्ञान शास्त्रज्ञ मराठी माहिती भारतीय शास्त्रज्ञ निबंध भारतीय शास्त्रज्ञ व त्यांनी लावलेले शोध माहिती मराठी भारतीय संशोधकांची नावे व त्यांनी लावलेले शोध यांची माहिती Studymode Indian Scientist Essay in Marathi language.
Good work
Thank you very much . This is very helpful in my project👍👍
Thanks It’s really useful for my son’s project.
Very very much thanks. It is very important and useful.
Thanks for giving me this information
Thank you.. it’s very useful for my nephew’s project
Thanks a Lord this is very helpful for me and my homework
Very useful information for my son’s school project
Very useful for my project thank you