चेहरा सुंदर कसा ठेवावा सुंदर दिसण्यासाठी घरगुती उपाय
10 Homemade Gharguti Beauty Tips Natural Beauty Tips Face Marathi Language
चेहरा तेलकट झालाय, डाग पडलेत, निस्तेज झालाय, पिंपल्स आलेत काळजी करू नका महागड्या क्रीम वापरून चेहरा खराब करण्यापेक्षा हे घरगुती आयुर्वेदिक उपाय करून बघा.
10 Homemade Gharguti Beauty Tips Natural Beauty Tips Face Marathi Language
माणसाचा चेहरा हाच त्याच्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख असतो आणि हाच चेहरा सदैव टवटवीत ताजातवाना ठेवण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतो. सौंदर्य हे त्वचेच्या पलीकडे असते. तरी पण आपली त्वचा आपले सौंदर्य अभिव्यक्त करते. सद्य स्थितीत सौंदर्याची व्याख्या करणे म्हणजे खूप किचकट संकल्पना आहे. आपण सूंदर असावं यापेक्षा सुंदर दिसावं या कडे तरुणाईचा कल आहे. मुलगी असो अथवा मुलगा आपण इतरांपेक्षा सुंदर कसे दिसू यादृष्टीने सर्वजण प्रयत्न करत असतात.
सुंदर दिसणे ही प्रत्येकाची आशा बनली आहे. सुंदर दिसण्यासाठी आवश्यक नाही की आपण अति महागड्या उत्पादनांची खरेदी करायला हवी अथवा ब्युटी पार्लर मध्ये जाऊन विविध ट्रीटमेन्ट घेणं आणि वेगवेगळी उत्पादने वापरलीच पाहिजे. घरगुती उपायांनी देखील आपण आपलं सौंदर्य उत्कृष्ट रित्या खुलवू शकतो.
वाढत्या वयाबरोबर आपली त्वचा निस्तेज होत जाते. ताण, त्वचेकडे दुर्लक्ष आणि सुरकुत्या, काळी वर्तुळे, शुष्क चट्टे, पिटीका, थकवा आणि निस्तेजपणा चेह-यावर दिसू लागतो. पण घरघुती उपाय तसेच त्वचेची निट काळजी घेतल्यास उतारवयात ही तारुण्याचा अनुभव घेता येऊ शकतो. आपल्या चेहऱ्याच सौंदर्य टिकविण्यासाठी त्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचे आहे.
चेहऱ्याचे सौंदर्य टिकविण्यासाठी खालील घरगुती उपाय तुम्हाला नक्की फायद्याचे ठरतील.
10 Homemade Gharguti Beauty Tips Natural Beauty Tips Face Marathi Language
चेहऱ्याचे सौंदर्य टिकविण्यासाठी खालील घरगुती उपाय तुम्हाला नक्की फायद्याचे ठरतील.
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी
चेहऱ्यावरील सुरकुत्या घालविण्यासाठी एक चमचाभर मधामध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळवून चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या नष्ट होण्यास मदत होईल.
चेहऱ्यावरील चमक परत मिळावा
Ayurvedic Homemade Beauty Tips for Glowing Skin in Marathi
एक चमचा गुलाबजल आणि एक चमचा दुधामध्ये तीन थेंब लिंबाचा रस मिसळवून चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्याची कोमलता आणि चेहऱ्यावरील चमक टिकविण्यासाठी मदत होते.
गुणकारी कोरफड चेहऱ्याला लावण्याचे फायदे
- आयुर्वेदानुसार कोरफड ही वेगवेगळ्या आजारावर गुणकारी आहे. यात पोट, केस आणि त्वचा.
- कोरफडचा रस किंवा गर चेहऱ्यावर लावावा आणि थोड्या वेळानंतर चेहरा पाण्याने दुहून काढावा. याने चेहरा सतेज आणि चेहऱ्यावरचे पिंपल कमी होतात.
निस्तेज त्वचेसाठी चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय
नारळाच्या तेलामध्ये मध आणि संत्र्याचा रस मिसळून हे मिश्रण निस्तेज झालेल्या आणि फाटलेल्या त्वचेच्या ठिकाणी लावावे. हे मिश्रण सुकल्यानंतर पाण्याने त्वचा धुवावी. हलक्या हातांने पुसून घावे,त्यानंतर नारळाचे तेल अथवा एखादे मॉइश्चराइर वापरावे. चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय करून बघा.
स्क्रबिंग करण्याचे फायदे
टोमॅटोच्या फोडी चेहऱ्याला लावून हलक्या हाताने मसाज केल्यास चेहऱ्यावरील घाण साफ होण्यास मदत होणे. त्वचा उजळण्याकरिता स्क्रब करणे अत्यंत आवश्यक आहे. स्क्रब केल्याने चेहऱ्यावरील बंद पडलेली रोमच्छीद्रे आणि कोशिका पुन्हा पूर्ववत होण्यास मदत होते.
तेलकट चेहरा घरगुती उपाय तेलकट त्वचेवर घरगुती उपाय
Oily Skin Care Tips in Marathi Language
एक चमचा लिंबाच्या रसात एक चमचा गुलाबजल आणि बारीक केलेला पुदिना मिसळवून मिश्रम एक तास ठेवावे. नंतर चेहऱ्याला लावून 20 मिनिटांनी धुवून टाकावे. असे केल्यास चेहऱ्याचा तेलकटपणा दूर होण्यास मदत होईल. हे तेलकट चेहरा घरगुती उपाय करून बघा.
डोळ्याखालील काळे व्रण कसे घालवाल ?
डोळ्याखालील काळे सर्कल आणि सुरकुत्या घालविण्यासाठी बदाम तेलामध्ये मध मिसळवून डोळ्याखालील भागाला हलक्या हाताने लावून हळुहळू मसाज करावा आणि त्यानंतर ते धुवावे.
क्लिंजिंग
चेहऱ्यावरील मेकअप हटविण्यासाठी आणि धुळीपासून त्वचेचं रक्षण करण्यासाठी क्लिंजिंग अत्यंत महत्वाचे आहे. याकरिता तांदळाच्या पिठामध्ये दही मिसळवून त्याची पेस्ट करावी, त्यानंतर ती चेहरा अथवा मानेच्या भागाला लावून थोडा वेळ ठेऊन मान अथवा चेहरा धुवून घ्यावा.
चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी उपाय ?
Blackheads on Nose Removal Tips Home Remedies in Marathi Language
चेहऱ्यावरील काळे डाग हटविण्यासाठी टोमॅटोच्या रसामध्ये रुई भिजवून त्याचे मिश्रण डाग पडलेल्या ठिकाणी लावावे यामुळे चेहऱ्यावरील डाग हटविण्यास मदत होते. चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी उपाय करून बघा.
चेहऱ्यावरील पिंपल्स कसे घालवाल ? पिंपल्स वर उपाय मराठी
Beauty Tips in Marathi for Pimples on Face Removal Tips in Marathi
Pimples Var Upay in Marathi Pimpal Problem Solution in Marathi
जर तुमच्या चेहऱ्यावर खूप सारे पिंपल्स आले असतील तर कच्या दुधामध्ये मोहरीचे तेल आणि मोहरीची पेस्ट बनवून घ्यावी आणि चेहऱयावर लावावी यामुळे चेहऱ्यावर येणाऱ्या फोडांपासून मुक्ती मिळवता येईल. पिंपल्स वर उपाय मराठी.
त्वचेची मुलायमता टिकवण्यासाठी
हल्ली कैऱ्या बाजारात दिसायला लागल्या आहेत. आता त्या थोड्या महाग असल्या तरी त्या तुमची त्वचा मुलायम आणि कांतिमान बनवण्यास मदत करनाऱ्या आहेत. एक कैरी उकळवून त्याचा गर चेहरा, गळा, मानेवर चोळा आणि वाळल्यावर धुवा. काही दिवसातच आपली त्वचेतला फरक अपल्याला जाणवून येईल.
हे ’10 Homemade Gharguti Beauty Tips Natural Beauty Tips Face Marathi Language’ चेहरा सुंदर कसा ठेवावा सुंदर दिसण्यासाठी घरगुती उपाय तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा. तसेच College Catta College Katta या आपल्या आवडत्या संकेतस्थळाला नवनवीन महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी पुन्हा भेट द्या.
-प्रियंका पुंड.
Beauty Tips in Marathi for Pimples on Face Removal Tips in Marathi Beauty Tips for Pimples and Blackheads in Marathi Pimples Var Upay in Marathi Pimpal Problem Solution in Marathi Oily Skin Care Tips in Marathi Language Ayurvedic Homemade Beauty Tips for Glowing Skin in Marathi Blackheads on Nose Removal Tips Home Remedies in Marathi Language तेलकट चेहरा घरगुती उपाय तेलकट त्वचेवर घरगुती उपाय
Hi mazya chehryavar murum and murmache khadde ,and telkat chehra hoto.hya sathi kahi upay