लवंग खाण्याचे फायदे lavang benefits in Marathi Clove benefits in Marathi lavang information in Marathi. lavang benefits in Marathi.
रूग्णालयांमध्ये आजमितीस अव्वाच्या सव्वा खर्च होतोच त्याबद्दल काही दुमत नाहीच. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना आपल्या गोष्टी करत असतानाच आपल्याच आयुर्वेदातील अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतो. पुर्वी डॉक्टर कमी आणि वैद्य जास्त असायचे. ते सर्वाधिक आयुर्वेदावर विश्वास करायचे. विशेष म्हणजे आयुर्वेदिक औषधीमुळे कुठलेही दुष्परिणाम होण्याची शक्यता नसते.
आज आपण आपल्या घरामध्ये सर्रास वापरली जाणारी परंतू त्याबद्दल आपल्याला माहित नसणार्या एका मसाल्याच्या पदार्थाबद्दल जाणून घेवूयात, त्याचे सेवन केल्याने होणारे फायदे कोणकोणत्या व्याधींपासून त्यानिमित्ताने सुटकारा मिळवून आपले आयुष्य हसते खेळते बनवू शकतो याबद्दल जरासे जवळून जाणून घेवूयात. लवंग ला इंग्रजीत clove म्हणतात.
लवंग खाण्याचे फायदे Clove Benefits in Marathi Lavang Information in Marathi Lavang benefits in Marathi
लवंग आपल्या प्रत्येकाच्या घरात पहायला मिळते, तो एक मसाल्याचा पदार्थ आहे. परंतू त्याचा आयुर्वेदामध्ये देखील वापर केला जात होता याबद्दल आपल्यापैकी बर्याच मित्रांना माहिती नसेल. आयुर्वेदामध्ये या मसाल्याचा उपयोग अनेक रोगांना दूर ठेवण्यासाठी केला जातो. लवंग या पदार्थास आयुर्वेदामध्ये औषधींचा गुरू मानले जाते. एवढीशी दिसणारी आणि असणारी लवंग असे काही कामे करून जाते की, आपला त्यावर विश्वास देखील बसणार नाही. लवंग हा पदार्थ मसाल्यामध्ये असल्यामुळे त्यासाठी खूप वेगळा असा खर्च करण्याची किंवा त्याला शोधण्याची, तो न मिळण्याचे कारणच येत नाही ते आपल्याकडे तरी सर्रास कुठेही उपलब्ध होतात.
लवंग खाण्याचे फायदे lawang fayde Marathi
- कोणी आपल्याला तोंडाचा वास येतोय असे म्हटल्यााचे कोणालाच आवडत नाही त्यासाठी एक अत्यंत सोपी युक्ती आहे. ती म्हणजे, एक लवंग तोंडात ठेवून जास्तीत जास्त वेळ चावल्याने तोंडातून येणारा दुर्गंध एका पटकन् दूर होऊ शकतो आणि मोकळा आणि फ्रेश श्वास बनतो.
- लवंग तेलाचे फायदे. थंडीच्या दिवसांमध्ये प्रत्येकाला सर्दी खोकल्याचे त्रास होतात, त्यासाठी लवंगाच्या तेलाचा एक थेंब जर कपड्यात बांधून ठेवा, जेव्हा आपले नाक बंद होईल किंवा सर्दी झाल्यास एकदा वास घेतला तर आपले नाक पटकन मोकळे होते.
- आपल्या जेवणाच्या अनियमित वेळेमुळे त्याचा आपल्या शरिरावर विपरीत परिणाम होवून काहींना ती अॅसिडीटी जाणवते, त्यासाठी 100 ग्राम पाण्यामध्ये लवंगचा खिस करून चांगले मिसळून प्यावे. असे केल्यास आपली अॅसिडिटी लवकर बरी होते.
- आपल्या घरी आपले आजी आजोबा असतात. त्यांना अधिक वेळा सांधेदुखी गुडघेदूखी होत असते, त्यावर उपाय म्हणून आपण लवंगचे तेल त्या जॉईंटवर लावल्यास त्यांचा बर्यापैकी त्रास कमी होतो.
- आपल्या अवती भवती असणार्या आपल्या कुटूंबातील किंवा आपल्यापैकीच कोणाला खूप तहाण लागणे किंवा इतरांपेक्षा जास्त घाम येणे अशा समस्या जाणवत असतील तर त्यावर उपाय म्हणून गरम पाण्यामध्ये लवंग वाटून ती पाण्यात मिसळून पिल्यास या समस्येपासून सुटकारा मिळू शकतो.
- हैजा सारख्या भयंकर रोगावर देखील लवंग गुणकारी ठरते. त्यावर उपाय म्हणून लवंगचे तेल बताश्यामध्ये टाकून खावे. खूप लवकर तुम्हाला फरक जाणवतो.
- आपल्या पैकी कोणास रतोंधी रोग असेल तर त्यावर उपाय म्हणून बकरीच्या दुधामध्ये लवंग मिसळून ते मिश्रण डोळ्यांच्या खाली लावण्यास सुरू करावे. यामुळे लवकरच फरक जाणवेल. हे लवंग उपयोग, लवंग खाण्याचे फायदे तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला प्रतिक्रिये द्वारे नक्की कळवा. लवंग बद्दल अधिक वाचण्यासाठी क्लिक करा.
Clove benefits in Marathi. lavang information in Marathi. lavang benefits in Marathi. लवंग तेलाचे फायदे .
सागर गोरखे.
Leave a Reply