मराठी निबंध माला दान…
‘दान’ खरतर हां शब्द खुप व्यापक आहे. या शब्दाचा गर्भित अर्थच फार मोठा आहे.आपल्या भारतीय संस्कृती मध्ये अनेक धार्मिक ,पारंपरिक, ऐतिहासिक गोष्टी आपल्याला दान या शब्दाशी निगडित पाहायला मिळतात,नव्हे नव्हे तर त्या कथा आपण सर्वांनी आपल्या आजी अजोबांच्या मुखातून आवर्जून ऐकल्या आहेत..
दानाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दानशूर कर्ण.आपल्या याचकाला कोणत्याही परिस्थितीमध्ये मोकळ्या हाती न लावणारा कर्ण अभेद कवच कुंडले असणारा कर्ण दान पात्रामध्ये शरीर आवरण बेधडक टाकुन देतो हे वर्णन ऐकून आपल्या अंगावर शहारे न आले तर नवलच….! या सगळ्याच कथा आपण लहान असताना चविने ऐकायचो.
दानाची संकल्पना ही फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. या शब्दावर भाष्य करायचे असेल तर सर्वात अगोदर दान कशाला म्हणतात हे जाणून घेणे अतिउत्तम दान ही एक अशी कृती आहे ज्यामुळे माणसाचे विशाल मन सुस्वभाव समजतो. दान या शब्दाचा अर्थ फ़क्त देण्यापुरताच मर्यादित असूंच शकत नाही.दान देणे म्हणजे फ़क्त पैसे देणे किंवा नको असलेल्या गोष्टी देणे नव्हे तर चांगल्या कार्यासाठी आपला मौल्यवान वेळ देणे होय. वास्तवात दान म्हणजे दातृत्व दान म्हणजे एक कृति, एक विचार एक मानस जो प्रत्येकाने जोपासावा.
आपल्या चहुबाजुला दान हां शब्द वारंवार आपल्या सारखा कानी पडत असतो. दानाचे विविध प्रकार साध्य स्थितीत पाहायला मिळतात.नेत्रदान रक्तदान, कन्यादान,श्रमदान,सामाजिक योगदान,भूदान मतदान, स्वरदान,बलिदान, अन्नदान इत्यादी. दांनाचे प्रकार आहेत.
मित्रहो कोणतेही दान श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते उच्च किंवा कमी दर्जाचे नसते.म्हणून मी गरीब आहे म्हणून काय दान करू किंवा मग मी खुप श्रीमंत आहे म्हणून खुप उथळपने वागू असा आपला चुकीचा समाज आहे. आता मागच्या महिन्यात एबीपी न्यूज़ ने एका छोट्या मुलीची स्टोरी केली होती जीला हृदयाची अत्यंत गरज होती तिला एका डेड मेंदू असलेल्या छोट्या मुलाच् ह्रदय मिळाल. आपल्या पोटच्या गोळ्याच ह्रदय दान करताना कस वाटल असेल त्यावेळी त्या आईला पण तीने आपल् सगळ दुःख बाजूला सारत ते दान केल. कारण आपल्या एका त्यागामुळ एका नविन जीवाला जीवदान मिळणार होत याला म्हणाव दानाची खरी भूमिका बजावन .आज प्रत्येक स्तरावर आपल्या पद्धतीने ही संकल्पना निभावली जाते खुप वेगळ्या पद्धतीने दान देखील लोक करतात कारण कुठतरी मनाच समाधान या संकल्पनेला आचरणात आणल्याने होत असत.
कवी विं.दा करंदीकर म्हणतात.
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे. म्हणजे त्याच्या देण्याची वृत्ती आपणही आत्मसात करावी.
शब्दाची व्यापकता खुप मोठी आहे. त्यामुळे आता याची व्याप्ती शब्दामध्ये कुंठित करता येणार नाही.त्यामुळे नाहीच काही दान करायला जमल तर किमान आनंदाच् दान करायला शिका.
-प्रियंका पुंड.
Leave a Reply