तोंड आल्यावर तिखट, मसालेदार गरम, कडक, खाताना त्रास होतो. तोंड आल्यावर काय खावे हा प्रश्न सगळ्यांना पडतो हे तोंड येणे ओठावर तोंडाला जर येणे घरगुती आयुर्वेदिक उपाय औषध उपचार मराठी करून तोंड येण्यापासून आराम मिळवा.
Tond Yene Aalyavar Gharguti Ayurvedic Upay Upchar in Marathi Language
तोंड येणे म्हणजे नेमके काय? प्रत्येकाला तोंड आल्याचा अनुभव आलाच असेल. तोंड येणे म्हणजे आपल्या जिभेवर, तोंडातील आतील भागात लालसर चट्टे पडणे. छाले पडणे, जिभेवर ओठावर फोड येणे. तोंड येण्याला इंग्रजीमध्ये Mouth Toung Ulcer म्हणतात.
Tond Yene Karane
तोंड जर येण्याची कारणे तोंड कशामुळे येते???
तोंड येण्यावर इलाज तेव्हाच होऊ शकतो जेव्हा आपल्याला तोंड येण्याचे खरे कारण माहीत असेल. तोंड येण्यामागे अनेक कारणे आहेत.
- जीवनसत्व आणि पोषण तत्वांची कमतरता. यात सर्वात महत्वाचे विटामिन ब (Vitamin B) फाँलिक अँसिड आणि लोह (Iron) ची कमतरता हे कारण असू शकते.
- ज्यांचे पोट साफ होत नाही, पोटाचे आजार आहेत त्यांना सतत तोंड येण्याचा त्रास असू शकतो. पोट साफ न झाल्यामुळे शरीरातील उष्णता वाढते.
- ताण-तणाव असल्यामुळे शरीरात वेगवेगळे स्त्राव सोडले जातात यामुळे देखील तोंड येते.
- व्हायरल इन्फेक्शनमुळे.
- काही औषधांमुळेही तोंड येऊ शकते पण हे गोळ्या बंद केल्यावर बरे होते.
- जास्त वेळ ब्रश केल्यामुळे ही तोंडाला जखमा होऊ शकतात कारण टूथपेस्ट मधील केमिकल.
- चविष्ट मसालेदार पदार्थ, तेलकट पदार्थ जास्त खाणे. अति प्रमाणात चहा, कॉफीचं व्यसन त्याचबरोबर धूम्रपान किंवा तंबाखूचे सेवन ही देखील तोंड येण्याची कारणे आहेत.
Tond Yene Aalyavar Gharguti Ayurvedic Upay Upchar in Marathi Language
तोंड येणे ओठावर तोंडाला जर येणे घरगुती आयुर्वेदिक उपाय औषध उपचार मराठी
Jibhela Phod Yene tond yene home remedies in Marathi
- हळद दुधात घालून प्यावी. हळद कोमट पाण्यात टाकून गुळणा करावा.
- जेवणात तोंडलीची भाजी खावी .
- सकाळी उठल्यावर ब्रश करण्याआधी १ ग्लास कोमट पाणी करून त्यात अर्धा चमचा मीठ घालून किंवा तुरटी घालून थोडा वेळ गुळण्या केल्याने फरक पडतो.
- दोन-तीन तुलसीचे पाने चावून त्याचा रस गिळला तर तोंडाची आग कमी होते.
- तूप आणि मध हे तर विविध आजारांमध्ये हे दोन्ही घटक इतके गुणकारी आहेत की, ते घरात असलयलाच हवेत यामुळे तोंड येणेचा त्रास कमी होतो.
- लिंबाच्या रसात मध मिसळून त्याने गुळण्या केल्या की आपल्या तोंडाला आराम मिळतो.
- नारळ पाणी पिल्याने देखील तोंड येणे राहते. नाराळात-सुखे खोबरे, खोबऱ्याचे तेल तसेच नाराळाचे पाणी हे तीनही घटक तोंड येणे यासाठी उपयुक्त ठरतात.
- तोंडात बदामाचा कुचकारा करून त्याचा रस गिळून अन तो कुचकारा जिथे जिथे फोड आलेत त्या ठिकाणी ठेवावा जेणेकरून तोंड येणं कमी होत.
- तोंडात आलेले फोड बरे होण्यासाठी कोथिंबीरचा रस काढून आलेल्या फोडांना लावावा.
- वेलचीच चुर्ण करुन मधात मिसळून ते थोडा वेळ तोंडात धरून लाळ गळू द्यावी. जाईच्या आणि पेरूच्या झाडांची पाने चावल्याने, पेरू खाल्याने तोंड येणे बरे होते.
- त्याचबरोबर मसालेदार तिखट पदार्थ, अतिखारट व आंबवलेले पदार्थ टाळावेत.
- तंबाखू व स्त्रिया मिश्री लावतात त्याच सेवन ही कमी करावं.
तोंड आल्यावर काय खावे ?
- फळे, पालेभाज्या खाव्यात.
मित्रांनो वरीलपैकी कोणत्याही एका उपायाने तोंड येण्यापासून आराम मिळेल. तोंड साफ करतानाचा हलगर्जीपणा, ताण-तणावग्रस्त जीवन, पोषण मूल्याची कमतरता आणि पोट साफ न होणे या समस्यांचा तुम्ही तोडगा काढला तर तुमचे तोंड येणार नाही हे निट लक्षात घ्या.
तोंड येणे ओठावर तोंडाला जर येणे घरगुती आयुर्वेदिक उपाय औषध उपचार मराठी Tond Yene Aalyavar Gharguti Ayurvedic Upay Upchar in Marathi Language ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा आणि आपल्या College Catta Katta या संकेतस्थळाला पुन्हा भेट द्या कारण ‘College Catta म्हणजे माहितीचे व्यासपीठ!’ जिथे दैनंदिन जीवनात उपयोगाला येणारी महत्वपूर्ण माहिती सोप्या भाषेत सादर केली जाते.
-तेजल महाजन. धुळे.
Tond yene Karan जर येण्याची कारणे तोंड कशामुळे येते??? Tond Alyavar kay karave तोंड आल्यावर करायचे उपाय Jibhela Phod Yene tond yene home remedies in Marathi जिभेवर ओठावर फोड येणे तोंड आल्यावर काय खावे.
Leave a Reply