डोके दुखी हा त्रास सध्या वाढत आहे. यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत डोकेदुखी दिसून येते. मित्रांनो आपले डोके का दुखते याचे कारण सापडेपर्यंत आपण त्यावर रामबाण इलाज करूच शकत नाही. डोके दुखी कमी करण्यासाठी रामबाण घरगुती आयुर्वेदिक उपाय उपचार जाणून घ्या.
डोके दुखी कमी करण्यासाठी रामबाण घरगुती आयुर्वेदिक उपाय उपचार
Dokedukhi Gharguti Upay in Marathi Language Headache Upay in Marathi
मेडिकल मधून गोळ्या औषधे घेणे याने तात्पुरता फरक नक्की पडेल पण काही दिवसानंतर डोकेदुखी पुन्हा सुरु होईल. डोकेदुखीचे कारणे आणि डोके दुखी कमी करण्यासाठी रामबाण घरगुती आयुर्वेदिक उपाय उपचार जाणून घ्या.
जाणून घेऊयात डोकेदुखीची कारणे
Dokedukhi Chi Karne Dokedukhi Marathi upchar
- व्यायामाचा आभाव.
- जास्त मानसिक श्रम, ताण-तणाव.
- शारीरिक श्रम, खोकला, सर्दी होणे, तापेच्या लक्षणांची सुरुवात असणे,
- लैंगिक असमाधान.
- अपचन. पित्तप्रकोप, अतिझोप, चहाच्यावेळी चहा प्यायला न मिळणे.
- डोक्याला मार लागणे, टेंगूळ येणे.
- प्रवासात वगैरे डोक्याला जोराचा वारा लागणे. कर्णकर्कश्य आवाज गोंगाट या परिस्थितीत काम करावे लागणे.
- मद्यप्राशनानंतर दुसऱ्या दिवशी येणारी विषण्णता.
- मेंदूतील रक्तस्राव, मेंदूत असलेली गाठ.
- चष्म्याचा नंबर वाढलेला असणे आणि मज्जारज्जूंपासून निघालेली त्रिशाखी नस विकारग्रस्त असणे.
Dokedukhi Che Prakar
- अर्धशिशी.
- पूर्ण कपाळ दुखणे.
- कपाळाव्यतिरिक मस्तकाचा अन्य भाग दुखणे.
- थांबून थांबून डोके दुखणे.
यापैकी कुठलातरी एखाद्या प्रकाराला आपल्याला नेहमी सामोर जावं लागतं.
डोके दुखत असल्यास काय खावे
तांदूळ, तूर, गहू, मूग, साळीच्या लाह्या, दुधी, पडवळ, पालक, दोडका, चाकवत, घोसाळे, डाळिंब, द्राक्षे, खडी साखर इत्यादी पदार्थ जास्त प्रमाणात खावे.
डोके दुखी मध्ये काय खाऊ नये:
बाजरी, नाचणी, गवार, मटार, हरबरा, चवळी, शेवग्याच्या शेंगा, सिमला मिरची, अननस, कैरी, आंबट दही, मद्य इत्यादी पदार्थ टाळावे.
अर्धशिशी वर घरगुती उपाय
Ardha Dokedukhi Upay Ardha Shishi var Upay in Marathi
अर्धशिशी म्हणजे डोक्यातील एखाद्या भागात तीव्र वेदना होणे.
अर्धशिशी होण्याची कारणे
अपुरी झोप. ताण-ताणाव असणे. पित्त वाढणे यात मसाल्याचे तेलकट पदार्थांचे जास्त सेवन करणे.
जर खूपच त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ल्याने उपचार करा. स्वतः मेडिकल मधून पेन किलर घेऊन खाऊ नका.
डोके दुखी कमी करण्यासाठी रामबाण घरगुती आयुर्वेदिक उपाय उपचार
- जर तुमच डोकं दुखत असेल तर दोन किंवा तीन वेलदोडे कुटून त्यात पिंपळाचे दोन चिमूट चूर्ण घालावे. आणि मधासह घ्यावे. याने डोकं दुखायचे थांबते.
- सर्दी मूळे डोकं जड होऊन दुखत असल्यास सुंठ, मिरे, पिंपळी, व दालचिनी यांचे एकत्र अर्धा चमचा चूर्ण मधातून घ्यावे. याने सर्दी मुळे जड झालेलं डोकं मोकळं होत आणि डोके दुखी थांबते.
- अपचनामुळे पोट जड होऊन डोकं दुखत असल्यास चमचाभर आले लिंबाच्या रसात थोडी साखर टाकून घ्यावी. याने डोकं दुखी थांबेल.
- पाण्यात मूठभर मनुका भिजवून खाल्ल्यास छाती, पोटात होणारी जळजळ थांबून पोट साफ होऊन डोकं दुखणं थांबत.
- अतिशय मानसिक ताण व थकव्यामुळे डोके दुखत असल्यास दुधात उगाळलेल्या जायफळ मध्ये थोडी वेलची पूड टाकून कपाळावर लेप करावा.
- डोके जड होऊन दुखत असल्यास सुंठ व लवंग उगाळून कपाळावर लेप करावा.
- उन्हामुळे किंवा जगरणामुळे डोके दुखत असल्यास अथवा अर्धशिशीचा त्रास असल्यास नाकामध्ये सजून तूपाचे दोन थेंब टाकावे. याने डोकं दुखणे कमी होईल.
- घरी बनवलेले एक चमचा लोणी खडी साखरेसह नियमित घेतल्यास वारंवार डोके दुखायचा त्रास कमी होतो. वेळेवर झोपणे, वेळेवर जेवण केल्यास डोकेदुखीचा त्रास होत नाही.
डोकेदुखीला पळविण्यासाठी करायचे व्यायाम
स्ट्रेच करून पहा
अनेकदा नसांच्या किंवा स्नायूंच्या ताणामुळे डोकेदुखी होते. अनेकदा पाठीचा वरचा भाग, मान, खांद्यावर ताण पडल्यास डोकं दुखतं. त्यामुळेच साधेपणानं मानेचं स्ट्रेचिंग केल्यानं डोकेदुखीवर आराम मिळतो. मान डावीकडे-उजवीकडे, वर-खाली सावकाशपणे फिरवल्यास शरिरातील अनेक स्नायूंची हलचाल होऊन ते थोडे मोकळे होतात. मात्र अशाप्रकारे स्ट्रेचिंग करुन व्यायाम करताना मानेला लचका बसणार नाही याची काळजी घ्यावी.
अॅक्युप्रेशर करा
अॅक्युप्रेशर हा अनेक आजारांवरील उपाय आहे. अंगठा आणि तर्जनी म्हणजे पहिल्या बोटाच्या मधल्या भागात असलेल्या स्थायूंवर एक मिनिटापर्यंत दाब द्या. अशाप्रकारे स्नायूवर योग्य प्रमाणात दाब दिल्यामुळे डोकेदुखीपासून सुटका होईल.
दीर्घ श्वास घ्या आणि सोडा
ऑक्सिजनची कमतरता हेही डोकेदुखीचे एक कारण असू शकते. त्यामुळे डोके दुखत असल्यास जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळेल अशा भरपूर झाडं असलेल्या भागात एखादा फेरफटका मारावा. हा फेरफटका मारताना मोठ्याने श्वास घ्यावा आणि सोडावा. डोकेदुखी नक्कीच कमी होते.
पित्त वाढल्याने डोके दुखत असल्यास बडीशेप खाल्ल्याने देखील पित्त कमी होण्यास मदत होते.
डोके दुखी कमी करण्यासाठी रामबाण घरगुती आयुर्वेदिक उपाय उपचार Dokedukhi Gharguti Upay in Marathi Language हे उपाय कसे वाटले हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा.
कॉलेज कट्टा या आपल्या आवडत्या संकेतस्थळाला पुन्हा आवश्य भेट द्या. ‘कॉलेज कट्टा म्हणजे माहितीचे व्यासपीठ!’ जिथे दैनंदिन जीवनात उपयोगाला येणारी महत्वपूर्ण माहिती सोप्या भाषेत सादर केली जाते.
-प्रियांका पुंड.
Ardha Dokedukhi Gharguti Upay Ardha Shishi var Upay in Marathi Dokedukhi Che Prakar Chi Karne Marathi upchar Headache Upay in Marathi
Leave a Reply