



नगर- येथील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या सहज फाउंडेशन ने सलग तिसऱ्या वर्षी राज्यस्तरीय सुगम गीत गायन आणि देशभक्तीपर समुहगीत गायन स्पर्धेचे आयोजन केले आहे. नगर शहरातील माऊली सभागृह येथे या स्पर्धा शनिवार व रविवार दि. २४ व २५ जानेवारी २०२० रोजी संपन्न होणार आहे.
सुगम गीत गायन स्पर्धा ही लहान व मोठा अशा दोन गटात होणार आहे. स्पर्धक गायक या स्पर्धे अंतर्गत भक्तीगीत, भावगीत आणि नाट्य संगीत सादर करु शकतात. देशभक्तीपर समुहगीत गायन स्पर्धा ही खुल्या गटात होणार असुन शाळा, महाविद्यालय, गायन संस्थाआणि संगीत विद्यालय यात आपला सहभाग घेउ शकतात. समुहगीतासाठी कमीत कमी गायकांची संख्या पाच असावी आणि जास्तीत जास्त संख्या मर्यादा नाही. एका गायक स्पर्धकास फक्त एकाच समुहगीतात सहभाग नोंदविता येइल.अशी माहिती स्पर्धा प्रमुख जालिंदर शिंदे यांनी दिली.
अहमदनगर स्वरसंग्राम या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यभरातील अनेक गायकांनी विविध दुरचित्रवाहिनी वर होणाऱ्या रियालिटी शो मधुन घवघवीत यश संपादन केले आहे. नंदिनी गायकवाड, योगेश रजमले, स्वराली जाधव, प्रिती पंढरपूरकर, तय्यब शेख, सायली टाक आणि अनाहत देशमुख हे आणि असे अनेक मातब्बर गायक कलावंत स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने उदयास आले.अशी माहिती संस्था अध्यक्ष अशोक अकोलकर यांनी दिली.
अनुष्का मोशन पिक्चर्स प्रायोजित आणि सहज फाउंडेशन आयोजित अहमदनगर स्वरसंग्राम या स्पर्धेत राज्यातील गायक नवदित गायक यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन नरेंद्र फिरोदिया यांनी केले. स्पर्धा यशस्वितेसाठी सहज फाउंडेशनचे सागर मेहेत्रे आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत, अशी माहिती तुषार देशमुख यांनी दिली.
गायन स्पर्धा वार्ता
रितेश साळुंके
प्रतिनिधी-कॉलेज कट्टा
Leave a Reply