स्वामी विवेकानंद शिकागो भाषण Swami Vivekananda Marathi chicago speech
शिकागो मधील सर्वधर्म परिषदेसमोर दिलेले सुरुवातीचे भाषण.
धर्म महासभेचे अध्यक्ष कार्डिनल गिरबन्स यांच्या दोन्ही बाजूंना, पूर्वेकडील विविध धर्मांचे प्रतिनिधी आपापल्या आसनांवर बसले होते, त्यांचे निरनिराळ्या रंगांचे वेष उज्ज्वलतेत जणू कार्डिनल साहेबांच्या पोशाखाशी स्पर्षच करीत होते. हिंदू ,बौद्ध,आणि मुसलमान प्रतिनिधींच्या त्या समुदायात भारतातील श्रेष्ठ वक्ते श्रीमत स्वामी विवेकानंद आपल्या भगव्या वेशात सर्वात आकर्षक दिसत होते. डोक्याला बांधलेल्या भगव्या फेटयामुळे त्यांचे ते मुख फारच शोभिवंत दिसत होते. इतर काही प्रतिनिधींची भाषणे समाप्त झाल्यानंतर स्वामी विवेकानंदांना श्रोतेमंडळीसमोर बोलऊन त्यांचा परिचय करून देण्यात आला. मग आपल्या गुरुदेवांना मनाने वंदन करून स्वामी विवेकानंदांनी श्रोत्यांना,
“अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो “असे बोलताच टाळ्यांच्या कडकडाटाने आणि प्रशंसासुचक उच्च स्वरांनी ते विशाल सभागृह कित्येक क्षण सारखे दुमदुमत होते. सभागृहात स्तब्धता प्रस्थापित झाल्यानंतर,प्रतिनिधींना देण्यात आलेल्या स्वागत-सन्मानास उत्तरादाखल स्वामीजींनी छोटेसे भाषण केले.
अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज तुम्ही जे आमचे हृदयापासून आणि अगत्याने स्वागत केलेत त्यास उत्तर देण्यासाठी मी इथे उभा आहे.शब्द सुचत नाहीत, हृदय अवर्णनीय आनंदाने भरून येत आहे.जगातील सर्वात प्राचीन अशा सन्यासी समाजातर्फे मी तुम्हाला धन्यवाद देत आहे.आणि अधिक काय बोलू,अवघ्या पृथ्वी च्या पाठीवरील सर्व वर्णांच्या आणि संप्रदायांच्या कोटी कोटी हिंदू स्त्री-पुरुषांच्या वतीने मी तुम्हाला धन्यवाद देतो .
याच व्यासपीठावरून पूर्वेकडील प्रतिनिधींविषयी बोलताना सामान्य वक्त्यांनी असं मत मांडले आहे की, दूरदूरच्या देशांतून आलेले प्रतिनिधी, सगळीकडे सहिष्णुतेचा भाव पसरवणारे म्हणून अभिनंदनास पात्र होत यात काहीच शंका नाही. या वक्त्यांचेही मी आभार मानतो. जो धर्म संपूर्ण जगाला सहिष्णुता आणि सर्वच मातांना मानणे या दोहोंचीही शिकवण निरंतर देत आला आहे.त्या धर्मात जन्माला आल्याबद्दल मला अभिमान वाटतो. अन्यधर्मीयांविषयी आम्ही केवळ साहिष्णूताच बाळगत नसून, तर सर्वच धर्म सत्य आहेत असा आमचा दृढ विश्वास आहे. परकीयांच्या छळामुळे देशोधडीस लागलेल्या कोणत्याही जातीच्या आणि कोणत्याही धर्माच्या निराश्रितांना ज्या जातीने सर्वकाळ आश्रय दिला, त्या जातीत जन्माला आल्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे. आजदेखील लाखो स्त्री-पुरुष ज्या स्तोत्राचे पाठ प्रत्येक दिवशी करतात. जे मी लहानपणापासून म्हणत आलो आहे. पंथाभिमान, स्वमतांधता, तज्जन्य अनार्थकारी धर्मवेड या गोष्टींनी आपल्या वसुंधरेवर खूप कल अधिराज्य गाजवले, त्यांनी जगामध्ये अतिशय अत्याचार केले, अनेक वेळा पुरुषांच्या रक्ताने न्हाऊन काढली आहे. संस्कृतीचा विध्वंस करून कधी कधी राष्ट्राची राष्ट्र हताश करून सोडलंI होती. हे भयंकर राक्षस नसते तर मानव समाजाणे आज जी प्रगती केली त्यापेक्षा अधिक प्रगती केली असती.परंतु आता त्याची घटक भरली आहे.मला असे वाटते की या धर्म परिषदेच्या सन्मानार्थ आज सकाळी झालेला घंटानाद समूळ धर्मवेडाची, धर्माच्या नावाखाली हत्याराने किंव आपल्या लेखणीतून केल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या छळाची ,एकाच प्रकारच्या लक्षा आपापल्या मार्गांनी जात असलेल्यांमधील एकमेकांविषयी असलेल्या असहिष्णुतेच्या समस्त भावनांची मृत्यू घंटाच ठरेल……असे काहीसे भाषण त्यांनी केले होते.
” शिकागो येथील सर्वधर्म परिषदेतील अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो या शब्दांनीच सात समुद्रापलीकडे भारतीयांचे विचार पोहोचवले होते…!” स्वामी विवेकानंद शिकागो भाषण
-सागर गोरखे.
Leave a Reply