स्वातंत्र्यवीर लाला लजपत राय माहिती निबंध भाषण मराठी

Lala lajpat rai information Biography in Marathi language
आज आपण स्वतंत्र
भारतात
मोकळ्या हवेत श्वास घेत आहोत…!
पण ह्या मोकळ्या हवेतील श्वासासाठी किती महात्म्यानी आपले प्राण फुंकले ह्याची
गिनती करणेच अशक्य आहे; राष्ट्रनिर्माणाचा
अग्निकुंड सतत धगधगत राहावा म्हणून अनेकांनी ह्या अग्निकुंडात स्वतःला समर्पित केलेल आहे. आज आपण अश्याच एका
शूरवीराच चरीत्रावलोकन करणार
आहोत; ज्याचा ब्रिटिश सरकारवर विशेष दरारा
होता .
लाला लजपत राय….! होय तेच हे नाव.
दिनांक 28 जानेवारी 1865 रोजी
पंजाब येथील धुडिके येथे लाला लजपत राय यांचा जन्म झाला. त्यांचं पुर्ण नाव लाला
लजपत राधाकृष्ण राय असे होते. वडील पेशाने शिक्षक होते; याकारणाने वडील ज्या शाळेत काम करत होते त्याच शाळेत त्यांचे
शालेय शिक्षण पूर्ण झाले; शाळेतही
एक मेधावी व हुशार विद्यार्थी म्हणून लालाजींची प्रचिती होती. वडील शिक्षक असल्याने घरचे वातावरण
देखील अत्यंत शिस्तीचे असायचे. या
शिस्तीचा पुढे सामाजिक जीवन जगताना त्यांना खुप फायदा झाला. शालेय शिक्षण पुर्ण
झाल्यानंतर;
लालाजींनी कायद्याचे शिक्षण
घेतले. लाहोर येथील सरकारी महाविद्यायात त्यांनी वकिलीचे शिक्षण पुर्ण केले; काही वर्ष वकालात केली. पण त्यांच्या मनाचा रोख दुसरीकडेच होता. याच काळात ते स्वतंत्र भारताच चित्र मनी रंगवू लागले होते. देशबांधवांवर
होणारे अत्याचार सताड उघड्या डोळ्यांनी बघत बसणे त्यांना मान्य नव्हते. हरियाणा
येथे काही दिवस वकालत केल्यानंतर; त्यांनी वकालातीला
कायमचा राम राम ठोकला. इंडियन नॅशनल कॉंग्रेस पक्षात ते सामील झाले .काँग्रेस
पक्षात सामील झाल्यानंतर बाल गंगाधर टिळक व बिपिंचंद्र पाल या व्यक्तित्वांशी
त्यांचा संबंध आला. ह्या
तिघांची जोडी लाल – बाल – पाल ह्या नावाने सगळीकडे प्रचलित झाली.
प्रथम संपूर्ण स्वातंत्र्याची
हुंकार या तिघांनी केली; व नंतर
ती हुंकार अवघ्या भारताच्या आवाजात परिवर्तित झाली. लाला लजपत राय हे नाव ऐकताच ब्रिटिश सरकार मध्ये खळबळ होत
असे; अश्या ह्या परखड व्यक्तीत्वाला
देशवासीय “पंजाब केशरी” व “पंजाब का शेर” म्हणुन संबोधु लागले
होते.
ब्रिटिश राजवटीतील आर्थिक व्यवस्थेवर लाला लजपत रायांचा रोष होता. देशातील अर्थव्यवस्थेचा कणा मोडलाच आहे व ही अर्थव्यवस्थेचा पुन्हा उभी करणे गरजेचे आहे. ही बाब त्यांच्या ध्यानी आली होती. त्या काळी बँक व्यवस्था लोकांना अपरिचित होती किंवा लोकप्रिय नव्हती. पण त्याही संकटांवर मात करीत लाला लजपत रायांनी “पंजाब नॅशनल बँक” स्थापन केली व अर्थव्यवस्थेचा पाया मजबुत करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे ते काँग्रेस पक्षामार्फत स्वतंत्र भारत मिळवण्यासाठी जनतेचा आवाज बुलंद करत होते.
आर्य समाज आंदोलन:-
त्याकाळी आर्य समाज आंदोलन संपूर्ण भारतवर्षात पेटून उठली होते. स्वाभाविकपणे लाला लजपत रायांची नजर या आंदोलनावर पडली. या आंदोलनाचे नेते महर्षी दयानंद सरस्वती यांना सोबत घेऊन हे आंदोलन पुढे नेण्याचे कार्य लालाजींनी केले. “देश जर शांत राहिला तर ब्रिटिशांना कारभार चालवणे सोपे होते.” ही बाब लालाजींना चांगलीच ठावुक होती. म्हणून विविध आंदोलनातून देशातील वातावरण पेटवणे व ब्रिटिशांच्या तंबूत खळबळ माजवने…..!हे लालाजी आवर्जून करायचे.
शिक्षण क्षेत्र:-
शिक्षण क्षेत्रातही लाला लजपत रायांनी खुप कार्य केलेले आहे. त्याकाळी युरोपीय शिक्षण शैलीचा पगडा वाढत चालला होता. भारतातील पवित्र संस्कृत व हिंदी भाषेला दुजाभाव दिला जायचा. ही बाब लालाजींच्या नजरेतून सुटली नाही. महर्षी दयानंद सरस्वती यांना सोबत घेऊन त्यांनी अनेक वैदिक महाविद्यालये उभारले. ह्या विद्यालयांत संस्कृत व हिंदी भाषेला न्याय मिळाला. लालाजींचे हे कार्य अविस्मणीय आहे.
काँग्रेस व लालाजी:-
लाल लजपराय हे काँग्रेसच्या पंजाब प्रांतातील सर्वमान्य नेतृत्व बनले होते. “हा व्यक्ती भविष्यात रस्त्यातील मोठा काटा आहे…” ही गोष्ट ब्रिटिशांना चांगलीच ठावूक होती. अनेक डावपेच रचून त्यांना काँग्रेस पक्षातून बाहेर काढण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न ब्रिटिशांनी केले. १९०७ च्या दरम्यान भारतात “किसान आंदोलन” चांगलेच पेटले होते. ह्या आंदोलनाचे नेतृत्व लालाजी करत होते…! ह्या बाबीचा फायदा घेवुन ब्रिटिश सरकारने त्यांना अटक करून बरमाच्या जेल मध्ये ठेवले. पण ब्रिटिशांचा हा प्रयत्न देखील फसला. अवघ्या भारतभर प्रचंड जनता लालाजींचे समर्थन करण्यासाठी रस्त्यावर उतरली. परिणामी ब्रिटिशांनी लालाजींना मुक्त केले.
लाला लजपत रायांचा राष्ट्रीय स्तरावर प्रचंड दबाव निर्माण झाला होता. त्यांचबरोबर त्यांच्या अनोख्या कार्यशैलीने पक्षातील अनेक कार्यकर्त्यावर प्रभाव टाकला होता. या कारणास्तव १९२० मध्ये लालाजी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्ष पदी रुजू झाले. अध्यक्ष पदाची धुरा सांभाळल्यानंतर….काही कारणास्तव लालाजी पक्षांतर्गत राजकारणाला बळी पडले ….! काँग्रेस पार्टीच्या अनेक नेत्यांशी त्यांचे मतभेद झाले. व परिणामी त्यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.
याच दरम्यान महात्मा गांधी यांनी काँग्रेस पक्षाची धुरा जवळ जवळ हातात घेतलीच होती. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर गांधींचा दबाव निर्माण झाला होता. काँग्रेस पक्षात लालाजींना दूजाभाव मिळत होता… पण त्यांनी मनी कोणताही रोष धरला नाही. त्यांचे एकमेव लक्ष्य होते ते म्हणजे ‘स्वराज्य’.
Lala lajpat rai Essay Speech in marathi language
“काँग्रस पक्षाचा नेता कोणीही असो…पण
पक्षाची दिशा बदलता कामा नये,” असे
त्यांचे म्हणणे होते.
ब्रिटिश सरकार विरोधात त्यांचा
लढा चालूच होता, १९२० साली
गांधींनी असहकार आंदोलन सुरू केले व त्यातही लालाजींनी विशेष भूमिका बजावली. या
आंदोलनादरम्यान त्यांना अटक करण्यात आली; पण
त्यांचे स्वास्थ्य बिघडल्याने त्यांना सोडून देण्यात आले.
इकडे काँग्रेस पक्षाशी त्यांचे
मतभेद वाढतच चालले होते. याकारणाने त्यांनी काँग्रेस पक्ष अखेर सोडला, व स्वराज पार्टीत सामील झाले.पण इथेही मतभेद झाल्याने
त्यांनी स्वतःची Nationalist Party निर्माण केली. लालाजींचे संपुर्ण जीवन हे राष्ट्रासाठी समर्पित
होते. व्यक्तिगत स्वार्थी जीवन जगण्याकडे त्यांचा कल नव्हताच. गांधीजिंप्रमाणे
लालाजी देखील खादी व स्वदेशी वस्तुंचे पुरस्कर्ते होते.
लालाजींचे शेवटचे आंदोलन:-
“सायमन गो
बॅक…! ” हा नारा तर तुम्ही कधी ना कधी ऐकलाच असेल. तर चला यामागील इतिहास
जाणून घेऊ या.
खर तर १९२८ साली
ब्रिटिशांनी एका कमीशनची स्थापना केली होती. ह्या कमीशनला “सायमन कमिशन” असे नाव देण्यात
आले होते. पण त्या कमीशनच्या सदस्यांत एकही भारतीय नागरिक सामील केलेला नव्हता.
याकारणाने गांधींनी आंदोलन सुरू केले व ठिकठिकाणी सभा घेऊन “सायमन गो बॅक”
असा नारा देण्यात आला. लाला लजपत रायांनी ह्या कार्यक्रमात मुख्य भुमिका बजावली.
काँग्रेसशी मतभेद असतानाही त्यांनी गांधींना साथ दिली. व ठिकठिकाणी सभा घेऊन सायमन कमीशन
विरोधात आंदोलन तीव्र केले.
अशाच एका ठिकाणी सभा घेत
असताना…त्या सभेवर ब्रिटिशांनी
लाठीचार्ज केला. व त्यात लालाजी प्रचंड जखमी झाले. लालाजींच्या जीवनातील ते शेवटचे
आंदोलन होते,
कारण ह्या घटनेत जखमी
झाल्यानंतर त्यांचे स्वास्थ्य पूर्णपणे खालावले व दि. १७ नोव्हेंबर १९२८ रोजी
लालाजींनी देह सोडला. स्वराज्याचा
निष्ठावंत उपासक काळाच्या आड गेला.
पण त्यांच्या मृत्युनंतर अवघा
भारत देश पेटून उठला…! भगतसिंग, सुखदेव, राजगुरू
यांनी ब्रिटिश अधिकारी ‘ सांडर्स ‘ ची हत्या करून लालाजींच्या मृत्यूचा बदला घेतला.
लालाजींची
सरस्वती उपासना :-
सामाजिक जीवन जगात असताना लाला
लजपत रायांनी लिखाणही केले आहे.
त्यांचे काही ग्रंथ खालील
प्रमाणे
१) रोमांचक ब्रम्हा
२) भगवद्गीतेचा संदेश
३) हिस्टरी ऑफ आर्य समाज
४) युगपुरुष भगवान श्री कृष्ण
मित्रांनो, स्वातंत्र्यवीर लाला लजपत राय यांच्याबद्दल माहिती निबंध भाषण मराठी Lala lajpat rai information Biography in Marathi language Lala lajpat rai Essay Speech in marathi language
ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन आवश्य कळवा आणि आपल्या आवडत्या कॉलेज कट्टा या संकेतस्थळाला पुन्हा आवश्य भेट द्या.
कॉलेज कट्टा म्हणजे माहितीचे व्यासपीठ! जिथे दैनंदिन जीवनात उपयोगाला येणारी महत्वपूर्ण माहिती सोप्या भाषेत सादर केली जाते.
लाल लजपत राय यांची वाचनीय पुस्तके
Leave a Reply