संत समाजाच्या श्रुंखलेत सर्वात उच्च श्रेणीत चमकणारे हे नाव! महाराष्ट्राची अस्मिता जपण्यास हाती एक काठी व झाडु घेऊन, फक्त बोलण्यातुनच नाही तर स्वतःच्या करणीतुन जगाला स्वच्छतेचा संदेश देणारे हे व्यक्तित्व…! गाडगे बाबांचे नाव काढताक्षणी स्वच्छता हा दुसरा शब्द स्वाभाविकरित्या ओठांवर येतोच. गाडगे बाबा हे फक्त एक व्यक्तित्व नसुन तो एक सिद्धांत आहे. जो वाट चुकलेल्याना आजही दिशा दाखवतोय…! स्वच्छतेचे पुजारी संत गाडगे बाबा माहिती कविता भाषण निबंध मराठी
स्वच्छतेचे पुजारी संत गाडगे बाबा माहिती कविता भाषण निबंध मराठी
अमरावतीच्या धरतीवर २३ फेब्रुवारी १८७६ रोजी पिता झिंगराजी व माता सखुबाई या दांपत्याच्या पोटी ह्या महात्म्याने जन्म घेतला. ‘ डेबूजी ‘ म्हणुन अख्या गावात ओळखले जाणारे हे व्यक्तित्व पुढे जाऊन ‘ गाडगे बाबा ‘ ह्या नावाने अवघ्या महाराष्ट्रात ख्यातनाम झाले.
‘गाडगे बाबा’ ह्या नावामध्ये देखील एक रंजक कथा दडलेली आहे. असाही प्रश्न कित्येकदा विचारला जातो की बाबांना ‘ गाडगे बाबा ‘ म्हणुनच का ओळखले जाते. तर तुमच्या जिज्ञासेचे उत्तर पुढील कथेत दडलेले आहे “
Sant Gadge Maharaj Information Biography in Marathi Language
आपल्या बालवयात बाबांच्या हाती नेहमी एक गाडगे असायचे त्यात खमंग चटणी भाकरी व तोंडीलावणे ठेवलेले असायचे, रानावनात फिरताना जर भुक लागली तर एखाद्या हिरव्यागार डेरेदार झाडाखाली बसुन बाबा आपल्या गाडग्यातील चटणी भाकरीचा स्वाद घ्यायचे. बाबांविषयीची ही कथा सगळ्या चिरपरिचित लोकांना माहीत होती. म्हणुन अजाणताच बाबांना गाडगे बाबा म्हणुन संबोधन मिळाले.” पुढे जाऊन याच नावाने ते सामाजिक जीवनात प्रसिद्ध झाले.
स्वच्छतेचे पुजारी संत गाडगे बाबा माहिती कविता भाषण निबंध मराठी
तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी- गाडगे महाराजांची कविता.सामाजिक जीवनात कार्य करताना बाबांनी किर्तन हे एक दांडगे साधन निवडले. किर्तनाच्या बाबतीत बाबांचा हात खंडा होता. आपल्या गोड वाणीने व मंत्रमुग्ध करणाऱ्या वचनांतुन ते समाजाच्या उत्थानास घातक ठरणाऱ्या विकृतींवर नेहमी वज्रप्रहार करत. बाबा नेहमी म्हणायचे “मंदिरात दिवा लावण्यापेक्षा गरिबाच्या झोपडीतील अंधार दुर करा”. “अन्नाच्या दोन घासासाठी अक्षरशः अक्रांत करणाऱ्या जीवांची भुक भागवा” त्याने परमेश्वर अधिक प्रसन्न होईल. गाडगे बाबा दिवसभर नाले, गटारे साफ करत व सायंकाळी कीर्तनाच्या माध्यमातुन अंधश्रध्देचा गंज लागलेल्या लोकांची मने साफ करीत. बाबांच्या बुद्धीचातुर्याला तर तोडच नाही असे माझे मत आहे कारण आजही बाबांच्या कविता वाचल्यावर मन आश्र्चर्यचकित होत. औपचारिक शिक्षणापासुन वंचित असणाऱ्या व्यक्तीची लेखणी इतकी धारधार कशी असु शकते हाच एक प्रश्न मनाला कायम पोखरत असतो.
लोकनिधी गोळा करून बाबांनी अनेक सेवाभावी संस्था उभारल्या. बाबांच्या कार्यातुन समाज उत्थानाची स्पृहा लोकांना आपोआप दिसुन यायची. बाबांच्या आत्म्याची ही तळमळ काही विवेकी लोकांच्या नजरेतून सुटली नाही आणि यातुनच बाबांच्या या कार्यात अनेक लोक सामील होत गेले. हिंदी मध्ये म्हणतात ना “लोग जुडते गये और कारवा बनता गया”
किंबहुना स्वच्छतेची ही मोहीम बाबांनी सीमित न ठेवता त्यास एका जनआंदोलनाचे रूप दिले. गल्लोगल्ली हाती झाडु घेऊन साफसफाई करणाऱ्या बाबांना बघताच काही लोकं हाती झाडु घेऊन त्या कार्यास हातभार भार लावत.
अश्या प्रकारे स्वच्छता हे आपलेच कर्तव्य आहे ही जाणीव बाबांनी समाजाला कृतीतुन करून दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा गाडगे बाबांच्या ह्या कार्याची सराहणा केली. अर्थात आंबेडकर व गाडगे बाबा हे समकालीन आहेत पण बाबांच्या मनाचा मोठे पणा बघा, ते म्हणायचे “आंबेडकरांचे व्यक्तित्व हे असाधारण आहे, त्यांचे बुद्धीचातुर्य हे अवघ्या भारतास नवी दिशा देईल” आणि घडलेही असेच…पुढे जाऊन जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे संविधान बाबासाहेबांच्या लेखणीतुन उतरले.
गाडगे बाबा व आंबेडकर यांच्या दोघांत नेहमी प्रेमपूर्व संवाद होत असे. ह्या दोनिही व्यक्तिमत्वाना इतिहास नजरेआड घालुच शकत नाही. गाडगे बाबा व आंबेडकर हे दोन व्यक्तित्व म्हणजे महाराष्ट्राच्या धरतीने अवघ्या भारतास दिलेली पर्वणीच होय.
महाराष्ट्राच्या इतिहासातील तो काळा दिवस अखेर उगवला. २० डिसेंबर १९५६ , त्या दिवशी सुर्याचा पहिला किरण अवघ्या महराष्ट्राच हृदय हलवुन ठेवणारी खबर घेऊनच धरतीवर येऊन धडकला. आंबेडकरांचा स्वर्गवास होऊन १४ दिवसच झाले होते. आत्ताच कुठे अवघा भारत शोककळेतून बाहेर पडला होता. तोच गाडगे बाबांच्या निधनाची खबर येऊन धडकली. अवघं जीवन भारतमातेच्या चरणांशी अर्पण करणारे बाबा अनंताच्या वाटेवर निघाले होते. अखेर प्रकृतीच्या विरोधात कुणीही जाऊ शकत नाही. ज्या गोष्टीस आदी आहे त्या गोष्टीस अंत देखील आहे.
आजही गाडगे बाबांच्या अमुल्य विचारांचा झरा वाहतोच आहे. त्याचे अमृत मंथन करून आपल्या जीवनधारेत उतरवु या …!
लेखक – गौरव वर्पे
संगमनेर
मो. 8830144011
Reference
Wikipedia
Book – कर्मयोगी
वाणी प्रकाशन
मित्रांनो, Sant Gadge Maharaj Information Biography in Marathi Language स्वच्छतेचे पुजारी संत गाडगे बाबा माहिती कविता भाषण निबंध मराठी
ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन आवश्य कळवा आणि आपल्या आवडत्या कॉलेज कट्टा या संकेतस्थळाला पुन्हा आवश्य भेट द्या.
कॉलेज कट्टा म्हणजे माहितीचे व्यासपीठ! जिथे दैनंदिन जीवनात उपयोगाला येणारी महत्वपूर्ण माहिती सोप्या भाषेत सादर केली जाते.
खूप छान माहिती आहे.
छान