सावधान! चेंजिंग रूम मध्ये जाताय स्पाय कॅमेरा असू शकतो?
सध्या जग वेगाने प्रगती करत आहे. बाजारात वेगवेगळे नवनवीन प्रकारचे छुपे कॅमेरे येत आहेत. खरतर त्यांचा
बनवण्यामागचा उद्धेश हा जरी सुरक्षा हा असला तरी जसं नाण्याला दोन बाजू असतात. तसाच चांगल्या गोष्टींचा देखील
चुकीच्या कामांसाठी वापर होऊ शकतो नव्हे काही लोक करतात. कित्तेकदा तुम्ही मोठमोठ्या कपड्यांच्या दुकानांमध्ये
चेंजिंग रूमध्ये छुपे कॅमेरे सापडल्याच्या बातम्या वाचल्या असतीलच. पारदर्शक आर्श्यामागे लावलेले कॅमेरे शोटे छुपे
कॅमेरे आणि आता यात भर म्हणून कपडे लटकवण्यासाठी वापरले जाणारे छोटे हूक यामध्ये देखील कॅमेरे आलेले आहेत.
त्याचबरोबर घरात वापरल्या जाणाऱ्या लाईट स्वीच मध्ये ही हे एचडी कॅमेरे H D camera बाजारात स्वस्त दरात एक
हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. हूक आणि स्वीच मधेही हे कॅमेरे असल्यामुळे लोकांना शंका येत नाही.
फ्लोरिडा मधील पोलिसांनी तेथील महिलांना अश्या छुप्या कॅमेरा बद्दल सतर्क केले होते आणि त्यानंतर महिलांनी
तक्रारी ही केल्या. त्यामुळे चेंजिंग रूम मध्ये महिलांनी काळजी घ्यावी.
Leave a Reply