
सकार-सळसळतं रक्त…
काही वर्षापूर्वी एक चित्रपट आला होता. अँक्शन पॅक्ड चित्रपट. चित्रपटातील नायक डॅशिंग. हॉकी स्टिक, सायकलच्या चैनेने गुंडाना मारणारा नायक. तरुणाईवर परिणाम झालाच. ३ ते ६ चा शो तरुण मुलं पाहून आले कि रात्री कुठेतरी हाणामारी झाली असं ऐकायला मिळायचं. अशीच मारहाण दोन गल्ल्यामधील तरुणांमध्ये झाली. प्रकरण अगदी पोलिसांपर्यंत जाण्याची वेळ आली. माझ्या वडिलांनी मध्यस्थी केली. मुलांना आपली बाजी मांडायला सांगितली. दोन्ही बाजू कडील मुलं बोलली. उपस्थितांनी शांतपणे ऐकूण घेतले. सळसळत रक्त अद्यापही तापलेलचं, हाणामारीची तयारी असणारच. वडील म्हणाले की तो चित्रपट मी माझ्या मुलाला सोबत घेउन पहिला. तरुणांनो, नेमकं नको तेच तुम्ही त्यातलं घेतलं. तो हिरो, अन्यायाच्या विरोधात लढतो, अगदी एकटा असूनही कारण अन्याय सहन करायचा नाही ही त्याच्या वडलांची शिकवण. तुमच्या भांडणच कारण काय तर अमुक ऐकाने तमुक एकाकडे रागाने पहिले, गाडीचा धक्का लागला. काही कृती ह्या अनावधानाने होतात. असं समजूया की त्याने मुद्दाम गाडीचा धक्का मारला. काय विशेष घडलं? अश्या वेळी एकाने समजून घ्यायचं. भान्न, मारामारी हा त्यावरचा उपाय असू शकत नाही. ज्याला धक्का लागला त्यानं समजून घेऊन, ज्याने धक्का मारला, त्याला व्यवस्थित रित्या अगदी शांतपणे, संयमाने समजवायचे. सळसळत रक्त अविचारी असतं असं काही जन समजतात. मंग अश्या घटना पहिल्या की त्या विधानांचा प्रत्येय येतो. मुळात आपण एकाच गावात राहतो मग वाद कश्यासाठी? यातून काय सध्या होणारय? आज तुम्ही मारहाण करणार उद्या ते तुम्हाला मारहाण करणार परवा परत तुम्ही पुन्हा त्यांना मारहाण करणार हे चक्र न थांबणारं होणार. तुमच्या भविष्याचं काय? तुमची आई वडिलांना तुमची काळजी असणार, त्याचं काय? मुंलानो शत्रुत्व हा असा खेळ आहे जो खेळ कायमच चालू राहतो. आणि खेळाडू संपतात, आयुष्यातून उठतात. जो क्षण भांडण्याचा असतो. तोच क्षण स्वतःला सावरण्याचा असतो. हे लक्षात घ्या. तो चित्रपट माझ्याही मुलाने पहिला म्हणून तो काय मारामारी करतो का? नाही. त्यातलं चांगलं काय आहे हे मी त्याला सांगितलं, त्यानं स्वतःहून समजून घेतलं. तुम्ही गप्प बसा असं मी म्हणणार नाही पण अन्यायाविरुद्ध लढा. तुम्ही रस्त्याने चाललेले आहात आणि एखाद्याने एखाद्या मुलीची किंवा महिलेची छेड काढली? तर तुमचं सळसळत रक्त त्या ठिकाणी उपयोगात आणा. त्याच्या दोन कानाखाली हाना, त्याला योग्य ती समाज द्या… हा खऱ्या अर्थाने आपल्यातल्या ताकतीचा उपयोग. आता नेमकं काय करायचं तुम्ही ठरवा. पण ठरवण्यापूर्वी एकदा स्वतःचं परीक्षण कराच. खूप वेळ शांतता. भांडण झालं ते दोघ उठले. एकमेकांची माफी मागून त्यांनी गळाभेट घेतली. मुलांचे पालक वडिलांना भेटले. आभार मानत म्हणाले शब्दांनी माणसं घडतात हे तुम्ही दाखऊन दिलं. फारच चांगल्या प्रकारे मुलांना समजावलत तुम्ही वडील म्हणाले की, नेमकं काय पहायचं आणि जे पहिलं त्यामधून काय घ्यायचं हे फक्त आपणच ठरऊ शकतो. आपलं चांगलं अथवा वाईट व्हायला फक्त आणि फक्त आपण स्वतःच जबाबदार असतो. दोन्ही गल्लीतल्या मुलांनीही माझ्या वडिलांचे आभार मानले. भांडणारे दोघेही म्हणाले की आम्ही शत्रुत्वाला थारा देणार नाही. मित्र म्हणून एकमेकांवर प्रेम करू. स्वतःसह इतरांनाही सहकार्य करूच. शत्रुत्व वाईटच.
-लेखक श्री सुनील वनाजी राउत. माळीगल्ली, भिंगार अहमदनगर. मो. ९८२२७५८३८३
कॉलज कट्टा.
Leave a Reply