
समाज सुधारक भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर माहिती निबंध भाषण मराठी
बाबासाहेबांचा प्रवास खडतर होता, ते ज्यांच्यासाठी लढत होते त्या समाजाला शिक्षण घ्येण्याचा अधिकार नव्हता, समाजात आदराचे स्थान नव्हते… समाज सुधारक भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर माहिती निबंध भाषण मराठी मध्ये…
एक दहा वर्षांचा बालक रस्त्यानं अनवाणी पायाने चालला होता; अजून मैलभर अंतर पार करायचं होत. साथीला कुणी नव्हत; सुर्य माथ्यावर चढत होता. त्याच रस्त्याने एक व्यक्ती बैलगाडीने येत होता. अनवाणी पायाने चालणाऱ्या त्या बालकावर त्या व्यक्तीची नजर पडली; त्यास बैलगाडीत घेतले. अर्ध्या मैलाचे अंतर पार केल्यावर त्या व्यक्तीला कळाले की तो बालक एक दलीत आहे…! आणि हे कळताक्षणीच त्याने बालकास पायाने लाथाळून एखाद्या चेंडूप्रमाने गाडीच्या बाहेर फेकले.
एवढा मोठा अपमान तो बालक सहन करू शकला नाही. रागाने त्याचा चेहरा लालबुंद झाला; पण लहान असल्याने दलितांना हिन भावनेने वागवणाऱ्या समाजाविरुद्ध लढा देणे त्याला शक्य नव्हते. तो बालक दुसरा तिसरा कुणी नसून डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते.
उच्च, नीच, शूद्र, क्षत्रिय या भावनेचा स्पर्शही नसणाऱ्या निरागस बालकास गाडीच्या बाहेर फेकणाऱ्या व्यक्तीची वैचारिक पातळी किती खालावलेली असेल याची कल्पनाच न केलेली बरी.
हाच मुलगा पुढे जाऊन सामाजिक घाव सोसणाऱ्या असंख्य दलीत बांधवांचा त्राता बनला. चला तर मग या महामानवाच्या जीवनगाथेवर एक नजर टाकुया…!
Dr Babasaheb Ambedkar Information Biography speech in Marathi Language
१४ एप्रिल १८९१ साली मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील महू या गावी रामजी व भीमाबाई या दांपत्याच्या पोटी बाबासाहेबांचा जन्म झाला. पण हे कुटुंब मुळचे महाराष्टातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या अंबडवे गावाचे होते. बाबासाहेबांचे बालपणीचे नाव भीमा होते; बाल भीमा हा इतर समवयीन मुलांपेक्षा खुप वेगळा होता. खेळण्यापेक्षा पुस्तकांच्या पानांत दंग राहणे त्याला अधिक आवडायचे; अभ्यासाचं तर प्रचंड वेड होत म्हणून कमी वयातच त्याला अक्षरओळख झाली होती. भीमा पाच वर्षाचा असताना आई भीमाबाई हे जग सोडून गेली. पण कोवळ्या वयात हा आघातही भीमाने सोसला; भीमा अजून लहान होता त्याच्या पालनपोषणाच्या काळजीने वडिलांनी दुसरा विवाह केला व ते कुटुंब मुंबई येथे स्थायिक झाले.
भीमाची शिकण्याची इच्छा खुप होती पण प्रत्येक वेळी जात अडथळा बनायची; शाळेत टाकण्याचं वय झाल्यानंतर वडिलांनी भीमाचा दाखला जवळील शाळेत करण्याचा निर्णय घेतला. पण शाळेच्या मास्तरांनी साफ शब्दात नकार दिला. एका दलीत मुलाने उच्च जातीच्या मुलांमध्ये बसुन विद्यार्जन करावे; हे मास्तरांना मान्य नव्हते. सडेतोड करून दरवाजात बसुन विद्यार्जन करण्याची मास्तरांनी भीमाला परवानगी दिली. भीमा हा विचारशील व्यक्ती होता. समाजात आपल्याला प्रत्येक ठिकाणी दुय्यम स्थान दिले जाते; ही बाब त्याच्या मनाला बोचत होती. म्हणून या बाबत त्याने वडिलांना विचारणा केली. त्यावर वडिलांनी प्रत्युत्तर दिले की “आपण नीच जातीचे आहोत, आपलं अस्तित्व हा समाज कदापि मान्य करणार नाही” हे ऐकल्यावर भीमाच्या मनात प्रचंड आग पेटली आपल्या बांधवांना न्याय द्यायचाच ह्या एका उद्धीष्टाने त्याला झपाटून टाकले होते.
विद्यालयीन शिक्षण पूर्ण करत असताना बाबासाहेबांना खूप छोटे मोठे अनुभव आले; नीच म्हणून अनेक ठिकाणी हेटाळना केली जायची दूजाभावाने वागवले जायचे; उच्च शिक्षण घेणे या देशात तर शक्यच नाही ह्याची बाबासाहेबांना जाणीव होतीच. उच्च शिक्षणाची तीव्र इच्छा असल्याने ते परदेशाची वाट धुंडाळू लागले. कोलंबिया युनिवहर्सिटीमध्ये शिकण्याची बाबसाहेबांची इच्छा होती. त्यांनी बडोद्याचे महाराजांचे दार ठोठावले; समोरून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. महाराजांनी परदेशातील शिक्षणासाठी बाबासाहेबांना स्कॉलरशिप देऊ केली. महाराज विवेकी होते; जातीपातीचा भेद मुळात त्यांना मान्य नव्हता. पहिल्या भेटीतच महाराज बाबासाहेबांच्या असाधारण व्यक्तित्वाने प्रभावित झाले होते. याकारणास्तव त्यांनी निःसंकोचपणे बाबासाहेबांना मदत केली.
कोलंबिया युनव्हर्सिटीत असताना; तेथील ग्रंथालयाच बाबासाहेबांना विशेष
आकर्षण होते. आंबेडकर वेळेचे भान विसरून कित्येक तास ग्रंथांची पाने चाळत बसत.
तेथील प्राध्यापक
आवर्जून बाबासाहेबांची प्रशंसा करत असे. BA, MA , PHD चा अभ्यास पूर्ण
करुन त्यांनी भारताच्या इतिहासावर दीर्घ प्रबंध विद्यापीठात सादर केला…! आणि पुन्हा ते मायदेशी परतले. इथल्या मातीत पाय ठेवताच अन्याय, अत्याचाराखाली
रगडल्या जाणाऱ्या बांधवांच्या हृदयद्रावक किंचाळ्या त्यांच्या कानी पडल्या.
सरकारी नोकरी करून; पोटापाण्याचा प्रश्न सोडवून व्यक्तिगत स्वार्थ साधण्याची
बाबासाहेबांची वृत्ती नव्हती. म्हणून त्यांनी सामाजिक उत्थानासाठी जीवन अर्पित
करण्याचे योजिले. दलीत बांधवांच्या समस्येचा जेव्हा त्यांनी सखोल अभ्यास केला; तेव्हा त्यांना काही बाबी प्रकर्षाने
जाणवल्या. बाबासाहेबांच्या मते मनुस्मृती नामक पौराणिक ग्रंथाने मानव जातीचे चार
भागात विभाजन केलेले आहे.
क्षत्रिय, ब्राम्हण, वैश्य, शुद्र..! या
ग्रंथाने अखिल मानव जातीचे मन, मस्तिष्क व्यापुन
टाकलेले आहे. शूद्रांना अती कनिष्ठ जातीचे समजून, त्यांचा स्पर्शही
ब्राम्हण व क्षत्रिय लोकांना नर्काची वाट दाखवतो असा समज त्या काळी रूढ होता.
म्हणून दलितांचा मानव म्हणून जगण्याचा हक्क हिरावुन त्यांना जनावरांप्रमाणे वागवले
जाते; या निष्करषापर्यंत बाबासाहेब पोहचले व त्यांनी या मनुस्मृती
नामक ग्रंथाविरुद्ध जनआंदोलन उभारले. भर सभेत मनुस्मृती चा जाळ
करण्यात आला…!
अतएव बाबासाहेबांच्या मनात धर्मपरिवर्तनाची संकल्पना स्पष्ट झाली होती. जातीपातीच्या समिकरणातून मुक्त होऊन दुसऱ्या एखाद्या धर्माला शरण जाऊन या समस्येच निराकरण करता येईल. असे त्यांचे मत होते. धर्मपरिवर्तनाची संकल्पना दलीत बांधवांसमोर मांडताच सर्वांनी या संकल्पनेला एकमताने स्वीकारले. धर्मपरिवर्तनासंबंधी घोषण केल्या नंतर; सर्वच धर्माचे धर्मगुरू बाबासाहेबांच्या घराची उंबरठे झिजवु लागले. ख्रिश्चन, इस्लाम सारख्या अनेक धर्मांनी आपापल्या धर्माची महती सांगून.” आमच्या धर्मात या ” असा प्रस्ताव बाबासाहेबांसमोर ठेवला…! पण बाबासाहेबांनी अत्यंत हुशारीने व अभ्यासपूर्वक बौद्ध धर्माची निवड केली, लहानपणापासुन भगवान बुद्धांचा प्रभाव त्यांच्या मनावर होता. म्हणून स्वाभाविक रित्या त्यांची नजर बौद्ध धर्मावर पडली.
दि.१४ ऑक्टोबर १९५६ रोजी बाबासाहेबांनी आपल्या पत्नीसोबत पाच लाख अनुयायांना बौद्ध धर्माची धम्मदीक्षा दिली. त्यानंतर अनेक ठिकाणी सभा घेऊन त्यांनी लाखो अनुयायांना धम्मदीक्षा दिली. या घटनेनंतर भारतातील बौद्ध धर्म पुनर्जीवित झाला…!
सामाजिक जीवनात कार्य करताना बाबासाहेबांची म.गांधींशी भेट झाली. त्यातूनच त्यांचा काँग्रेसशी संबंध आला. गांधीच्या वैचारिक धारेचा बाबासाहेबांवर विशेष प्रभाव होता खरा, पण काही बाबतीत ह्या दोघांत मतभेद होते हेही तितकेच खरे होय. पण गांधींना आंबेडकरांच्या तल्लख बुद्धीची चुणूक नक्कीच होती. हा माणूस भविष्यात स्वतंत्र होणाऱ्या भारताला एकसुत्रात गुंफण्यास विशेष कार्य करेल ही बाब गांधींना ठावूक होती.
जेव्हा ब्रिटिश राजवटीतून भारत मुक्त झाला. तेव्हा देशात प्रचंड राजनीतिक अस्थिरता निर्माण झाली. प्रचंड लोकसंख्या असणाऱ्या भूभागावर नियंत्रण आणणे गरजेचे असल्याने सरकार स्थापनेची लगबग सुरू झाली. अश्यातच संविधान हा एक महत्वाचा मुद्दा होता. संविधान निर्मितीसाठी मसुदा समितीची स्थापना केली गेली व समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेबांची निवड केली गेली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य इतिहास मराठी
मसुदा समितीत खालील
व्यक्तींचा समावेश होता..!
१) डॉ.बाबासाहेब
आंबेडकर
२) अल्लादी
कृष्णस्वामी अय्यर
३) एन .गोपालस्वामी
अय्यंगार
४) के . एम. मुंशी
५) सय्यद मोहमद
सदुल्लाह
६) बी.एल. मित्तर
७) डी.पी. खैतान
दिग्गज्यांचा या समिती समावेश होता. पण काहींना हे काम
अशक्यकोटीतील वाटल्याने त्यांनी ह्यासमितीला राम राम ठोकला.
अध्यक्ष ह्या
नात्याने हे कार्य पार पाडणे बाबासाहेबांचे कर्तव्य होते. आंबेडकरांनी अखंडितपणे
दिवसरात्र मेहनत केली. समाज व्यवस्थेत खोलवर घुसून अभ्यासपूर्वक लिखाण
केलं. २ वर्ष ११ महिने व १७ दिवसांच्या मेहनतीने जगातील सर्वात न्यायिक संविधान
बाबासाहेबांनी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसादांना सुपूर्त केले. २६ जानेवारी १९५०
रोजी अखिल भारतवर्षावर हे संविधान लागू झाले.
संविधान सुपूर्त करते वेळी बाबासाहेबांनी आपल्या ऐतिहासिक
भाषणात म्हंटले की “मी जगातील सर्वात न्यायिक संविधान बनवले आहे पण या
संविधानाची सफलता राज्यकर्त्यांवर अवलंबून आहे.”
‘रुपये की समस्या- उसका उद्भव व उपाय ‘ या आंबेडकर लिखित
ग्रंथावर ‘ रिझर्व बँक ऑफ इंडिया’
ची स्थापना केली
गेलेली आहे. अर्थात आजही भारताचे राजनीतिक व आर्थिक जगत बाबासाहेबांच्या
ज्ञानस्वरूप भिंतीच्या आधारेच पुढे चालते…! असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
जीवनाच्या संधेलाही त्यांची ज्ञानोपासणा थांबली नाही. मृत्यूच्या
ठिक दोन दिवस अगोदर बाबासाहेबांनी भगवान बुद्धांच्या उपासना मार्गावर प्रकाश
टाकणारा ग्रंथ लिहून पूर्ण केला. उत्तरार्धात ते डायबिटीस ह्या आजाराने ग्रस्त
होते. ६ डिसेंबर १९५६ चा तो दिवस ज्ञानसूर्य अस्ताला गेला. वयाच्या ६४ व्या वर्षी, दिल्लीच्या निवासस्थानी बाबसाहेबांनी देह
ठेवला. त्यांचे पार्थिव विमानाने मुंबईला आणण्यात आले. दादर वरून अंतयात्रा निघाली.
ज्ञानसूर्याचे अखेरचे दर्शन घेण्यास प्रचंड जनसागर उमडला होता. दादर चौपटीवरील
स्मशानभूमीत अखेरचे अंत्यसंस्कार झाले.
भारताचे भविष्य
सावरणाऱ्या ह्या महामानवास कोटी कोटी प्रणाम…!
-गौरव वर्पे
संगमनेर, अहमदनगर.
Reference links
https://en.m.wikipedia.org/wiki/B._R._Ambedkar
https://www.google.com/amp/s/www.bharatdarshan.co.nz/magazine/article/child-amp/170/ambedkar-biography.html
मित्रांनो, समाज सुधारक भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर माहिती निबंध भाषण मराठी Dr Babasaheb Ambedkar Information Biography in Marathi Language
ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन आवश्य कळवा आणि आपल्या आवडत्या कॉलेज कट्टा या संकेतस्थळाला पुन्हा आवश्य भेट द्या.
कॉलेज कट्टा म्हणजे माहितीचे व्यासपीठ! जिथे दैनंदिन जीवनात उपयोगाला येणारी महत्वपूर्ण माहिती सोप्या भाषेत सादर केली जाते.
Leave a Reply