भाजपने जे पेरले तेच उगवले

नमस्कार मित्रांनो,
२०१९ महाराष्ट्र विधानसभा निवडणुक, सत्तासंघर्ष आणि सत्ता नाट्य आपण सर्वांणी उघड्या डोळ्यांनी पाहिलं राजकरणात कोणी धुतल्या तांदळाचं नसतं हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं.
या निवडणुकीमध्ये ज्या सत्तासंघर्षाची सुरावत भारतीय जनता पक्षाने आपली तत्व सोडून ( राजकरणात तत्व नसतात, किंवा या तत्त्वांचा वापर हा सत्ता मिळवण्याचा हेतूनेच केला जातो.) एन निवडणुकीचा तोंडावर इतर पक्षांचे आमदार फोडून केली आणि इतर पक्ष कसे हतबल आहेत, शक्तिहीन आहेत, किंवा त्यांचा भाजपसमोर निभाव लागणार नाही. काँग्रेसमुक्त किंवा इतरही काही नारे दिले… पण म्हणतात जे पेरले तेच उगवते. याच्या परिणाम खातर शिवसेना आणि कॉंग्रेस, राष्ट्रवादी पक्षाने देखील काही प्रमाणात निवडणुका पूर्वी पक्षभरती केली.
२०१४ विधानसभेनंतर भाजप-शिवसेना मधील वाद उघड होता. याच्याच परिणाम स्वरूप २०१९ विधानसभा निकालात युतीला म्हणजे भाजप-शिवसेनेला जनतेने दिलेल्या स्पष्ट बहुमता नंतर देखील युती सरकार स्थापन करण्यात असमर्थ होते. याची बरेच करणे असू शकतात. यामध्ये मोठा भाऊ कोण आणि छोटा भाऊ कोण हा वाद असेल. त्याचप्रमाणे मा. देवेंद्र फडणवीस जाता जाता मी पुन्हा येणार असं म्हणत होते आणि दुसरीकडे मा. उद्धव ठाकरे देखील मा. बाळासाहेबांना दिलेले वचन मी पूर्ण करणार असं सांगत होते. एकूणच दोन्हीं मित्र पक्ष भाजप-शिवसेना मुख्यमंत्री पदासाठी चुकीच्या वेळी भांडत होते. कारण एन निवडणुकीत आणि नंतर ही पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते. शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने लवकरात लवकर सरकार स्थापन होऊन त्यांना काहीतरी सरकारने मदत करावी ही अपेक्षा होती. पण या अपेक्षेचा भंग करत सत्ता नाट्य सुरू झाले यात हळू हळू सर्व पक्ष मी नाही त्यातला अस म्हणत सामील झाले.
हे सर्व महाराष्ट्र उघड्या डोळ्याने पाहत होता. ज्या खुर्चीच्या रस्सी खेच मध्ये भाजपा विरोधकांना संपवण्याची भाषा करत होता, जे पेरत होता याचाच परिणाम स्वरूप भाजपा सोडून इतर सर्व पक्ष ऐकत्र आले. शिवसेनेने ज्याच्या विरुद्ध निवडणुक लढवली, टीका केली त्याच्याशी त्यांनी हात मिळवला. यात बाळासाहेबांनी जीला इटलीची म्हणून हिणवलं, तीच्याशी आज उध्दव जिने हात मिळवला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे स्वतः कधीच मंत्री झाले नाहीत आज उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सत्तेच्या रिंगणात उतरले आहेत. याचा अर्थ भाजपा धुतल्या तांदळासारखा आहे असे नाही. भाजपने देखील खुर्ची एन केन प्रकारे मिळवण्यासाठी राष्ट्रवादी पक्षातले मा. अजित दादा यांना फोडून राष्ट्रवादी पक्षा बरोबर सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला. यात त्यांना अपयश आले शिवसेना काँगेस राष्ट्रवादी या पक्ष्यांना यश आले किंवा मिळवले. म्हणून भाजपाने जे पेरले तेच उगवले. आणि विरोधी बाकावर बसण्याची त्यांच्यावर वेळ आली.
राजकरणात तत्व वगैरे नसतात किंबहुना सत्ता मिळवण्यासाठीच ही तत्व वापरली जातात. हे जनतेने लक्षात ठेवायला हवे. उद्या जेव्हा कधी निवडणुका येतील तेव्हा प्रत्येक मतदाराने २०१९ सत्ता नाटयाची आठवण काढूनच मतदान करावे.
विंदा करंदीकर म्हणाले होते सब घोडे बारा टक्के… हे पुन्हा एकदा आज अधोरेखित झालं. म्हणून हा सत्ता संघर्ष लांबला. कारण प्रत्येक जण मला कसं जास्त मिळेल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत होता. आम्हाला जनतेची किती काळजी आहे असं सांगून…
-अभिजीत हजारे.
मित्रांनो, तुम्हाला अशा पद्धतीची माहिती वाचायला आवडत असेल तर खालील सबस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुमचा इमेल भरून कॉलेज कट्टाला सबस्क्राईब करा आणि इमेल द्वारे आमच्या अपडेट मिळावा.
Leave a Reply