संत्री खाण्याचे फायदे आरोग्यदायी लाभ Information about Orange Fruit in Marathi language santra in marathi Orange Fruit information in Marathi संत्री मराठी माहिती
संत्री खाण्याचे फायदे आरोग्यदायी लाभ
महाराष्ट्रात नागपूर मध्ये संत्री हे पिक सर्वाधिक घेतले जाते. म्हणून आपण नागपूरची संत्री असं म्हणतो. संपूर्ण जगात संत्री हे पिक घेतलं जाते. संत्री हे फळ खाण्याबरोबरच त्याचापासून जूस तसेच पेय देखील बनवले जातात. तसेच त्यचा वापर औषधा मध्ये देखील केला जातो. त्यचा जूस वर वेगवेगळी प्रक्रिया करून वेगवेगळे उत्पादने बनवले जातात. छोट्या लेमन गोळ्या आजही बाजारात उपलब्ध आहेत. प्रवासात प्रवासी उलटी होऊ नये लेमन गोळ्या चाखतात.
दिवसभरात एक सफरचंद खा आणि डॉक्टरला दूर लावा या इंग्रजी वाक्याप्रमाणे म्हणजे सफरचंद जसे आरोग्यासाठी लाभदायक आहे त्याच प्रमाणे संत्री देखील आरोग्यासाठी लाभदायक आहे.
मित्रांनो आज आपण आपल्या आवडत्या कॉलेज कट्टा colleege Catta वर संत्रीचे खाण्याचे फायदे जाणुन घेऊयात.
संत्र्यामध्ये अ जीवनसत्व, फोलिक आम्ल, कॅल्शियम, लोह, प्रोटीन, कार्बोहायड्रेट तसेच गंधक आदींची भरपूर मात्रेत आढळतात.
संत्र्याचे काही औषधी उपयोग पाहूया.
संत्र्याच्या मोसमामध्ये याचे नियमित सेवन करीत राहण्याने लठ्ठपणा कमी होतो. डाएटिंग न करताही संत्र्याच्या मदतीने वजन कमी करता येणे शक्य आहे.
संत्र्याचे सेवन केल्याने त्वचा उजळते. चेहरयावर एक प्रकारची टवटवी वाढते. संत्र्याचे नियमित सेवन केल्यास मुळव्याधीच्या आजारात फायदा होतो. यामध्ये रक्तस्त्राव रोखण्याची कमालिची क्षमता असते.
हृदयरोग असल्यास संत्र्यांचा ज्यूस मधामध्ये मिसळून घेतल्यास कमालिचा फायदा होतो. संत्र्याचा एक ग्लास ज्यूस घेतल्याने तन-मन यास शीतलता मिळते.
संत्रीचा जूस पिल्याने ब्लड प्रेशर मेंटेन होण्यास मदत होते.
संत्राचा जूस बनवण्यासाठी संत्री चे साल काढून त्याचा जूस काढून घ्यावा. जूस मध्ये थोडी साखर आणि मीठ टाका.
उन्हाळ्यामध्ये थकवा आणि तणाव अधिक प्रमाणात जाणवतो, त्यासाठी संत्र्याचे सेवन केल्याने यावर गुणकारी ठरते. लघवीला जळजळ होत असल्यास संत्र्याचे सेवन केल्याने आराम मिळतो.
संत्र्याची साल चेहर्यावर रगडल्याने सौदर्यात वाढ होते. त्वचेमध्ये निखार येतो व मुरूम, पुटकुळ्या आणि सुरकुत्या दूर होतात.
संत्री मधील सायट्रस या घटकामुळे मेंदूला झटके बसण्याचे प्रमाण कमी होते म्हणजे संत्री खाण्याऱ्या व्यक्तीला मेंदूचे स्ट्रोक बसण्याचा धोका कमी असतो.
कॅन्सर
संत्री मध्ये विटामिन सी क जीवनसत्व असते ते अँन्टीआँक्सीडन्ट चे काम करते. संत्री मध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते जे कोलेस्ट्रोल मुळे होणार्या कॅन्सरचे प्रमाण कमी होते.
संत्री खाल्याने पोटाचे विकार खराब झालेले पोट, बिघडलेले पोट नित होऊन पोट साफ होण्यास मदत होते.
दैनंदिन जीवनात संत्र्यांचे ज्यूस घेतल्यास त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
ही संत्री खाण्याचे फायदे कसे वाटले हे आम्हाला नक्की प्रतिक्रियेद्वारे आवश्य कळवा.
-सागर गोरखे.
Leave a Reply