शंख वाजवण्याचे फायदे
हिंदू धर्मामध्ये पूजा अर्चनेला अनन्यसाधारण महत्व आहे. ही पूजा अर्चना करत असताना अनेक गोष्टींचे वेगवेगळे महत्व असते. आज आपण शंख बद्द्ल जाणून घेऊयात. पूजेच्या दरम्यान शंख का वाजवला जात असेल याबद्दल काही माहिती मिळूयात .शंख वाजवण्याचे फायदे.
असे म्हटले जाते की शंख वाजवल्यामुळे घरामध्ये Positive Energy ( सकारात्मक ऊर्जा ) पसरली जाते. त्याचबरोबर शंख वाजवणे आपल्या शरीराला देखील, आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असते. शंख वाजवल्यामुळे गॅस्ट्रिक आणि पोटाच्या अनेक समस्यांपासून सुटकारा मिळतो. त्याचबरोबर पोटाच्या विकारांना दूर ठेवण्यास मदत होते.
शंख वाजवल्यामुळे आपल्या शरीरातील छातीचे स्नायू बळकट होण्यास मदत होते. शंख वाजवल्यामुळे आपल्या गळ्याचे जे स्नायू आहेत, त्यांचादेखील व्यायाम होतो. विकल कॉर्ड आणि थायरॉईड शी संबंधित असणाऱ्या समस्या दूर होण्यास मदत होते. शंख वाजवत असताना शरीरात रक्तप्रवाह वेगाने होतो. त्याचबरोबर कैद गळण्याची समस्या असेल तर तीदेखील दूर होते.
शंख वाजवण्याचे आणखी फायदे आहेत, त्यामध्ये चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. तसेच चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या येणे थांबते.
उपाय :
शंखामध्ये एक रात्रभर पाणी भरून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी शंखामध्ये ठेवलेल्या पाण्याने त्वचेवर मसाज केल्यामुळे त्वचेसंबंधी असणारे रोग नाहिशे होन्यासाठी फायदा होतो. संपूर्ण रात्रभर शंखामध्ये ठेवलेल्या पाण्यामध्ये गुलसबजल मिसळून केसांना धुतल्यामुळे केस काळे होण्यास त्याचबरोबर केस मुलायम आणि दाट केस होण्यास मदत होते. रात्रभर शंखामध्ये ठेवलेल्या पाण्यामध्ये तेवढेच पाणी मिसळून डोळे धुतल्यास डोळे निरोगी होण्यास मदत होते.
शंखामध्ये रात्रभर ठेवलेले पाणी सकाळी तीन चमचे दररोज घेतल्यास बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून सुटकारा मिळण्यास मदत होते. त्याचबरोबर शंख वाजवल्याने प्रोस्टेट मसल्सचा व्यायाम होतो. शंख वाजवल्यामुळे उरिणारी ब्लॅडरचा व्यायाम होऊन त्यासंबंधित आजारांपासून संरक्षण होते. आंघोळीनंतर शंख त्वचेवर घसल्यामुळे त्वचा उजळते. त्वचा टवटवीत होते. अशा प्रकारे शंख वाजवण्याचे अनेक फायदे सांगता येतील. शंखामुळे मिळते दीर्घायुष्य आणि प्रसन्न होते लक्ष्मी, हे आहेत शखांचे विविध लाभ. शंख वाजवण्याचे फायदे, शंख वाजवण्याचे आरोग्यदायी लाभ कसे वाटले हे आह्माला प्रतिक्रिया मधून नक्की कळवा.
शंखाचे प्रकार दक्षिणावृत्ती शंख मध्यावृत्ती शंख वामावृत्ती शंख
जाणुन घ्या मोक्षदा एकादशीचे महत्व
-सागर गोरखे.
Leave a Reply