
शिशिर ऋतूमध्ये येणारी माघ शुद्ध पंचमी म्हणजेच वसंत पंचमी होय. मकर संक्रांतीनंतर सूर्याचे उत्तरायण सुरू होताना हा सण येतो. वसंत ऋतूच्या सुरवातीलाच हा सण साजरा करतात. इंग्रजी महिन्यानुसार फेब्रुवारी मध्ये हा सन येतो. प्रेम भावनेचे प्रतीक म्हणून मानल्या जाणार्या या दिवशी लोक गुलाबी किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालतात.
हा सण भारतात अनेक पद्धतीने साजरा केला जातो. दक्षिण भारतापेक्षा उत्तर भारतात या सणाला विशेष महत्व आहे. राजस्थानातील राजपुतांमध्ये हा उत्सव विविध प्रकारे साजरा केला जातो. राज्यातील सर्व उच्च-नीच लोक यात सहभागी होतात. रथसप्तमीच्या दिवशी (राजस्थानातील भानू सप्तमीच्या दिवशी) त्याची पूजा करून त्याच्या रथाची मिरवणूक काढली जाते. फाल्गुन महिन्यातील वसंतोत्सव ह्या ‘फाग’ नावानेही ओळखला जातो. कला संस्थांमध्ये सरस्वती व अर्धनारीनटेश्वर यांची पूजा करून हा सण साजरा करण्यात येतो.
हा दिवस सरस्वतीचा जन्मदिवसही मानला जातो. मध्ययुगात या दिवसाला ‘सुवसंतक’हे नाव होतं. सुफी परंपरेतील चिश्ती संप्रदायात हजरत निजामुद्दीन अवलियाचे शिष्य मोहरीच्या पिवळ्या फुलांचा रंगात बुडवलेली वस्त्रे या दिवशी सण साजरा करण्यासाठी नेसतात. बिहार राज्यातल्या औरंगाबाद जिल्ह्यातील देव नावाच्या गावांमधल्या सूर्य मंदिरात असलेली सूर्यदेवतेची मूर्ती ही वसंत पंचमीच्या दिवशी स्थापन झालेली आहे. त्यामुळे या दिवशी सूर्य देवतेला स्नान घालून तिला नवीन वस्त्रे परिधान केली जातात. वसंत पंचमीच्या दिवशी भरला जाणारा कुंभमेळा हे एक भाविकांचे आकर्षण असते. या कुंभमेळ्यातील शाहीस्नान पवित्र मानले जाते. वसंत ऋतु हा काम देवतेच्या पूजेसाठी योग्य मानला जातो. कृषी धर्मात या ऋतूला महत्त्वाचं स्थान आहे. या दिवशी नवान्न इष्टी असा एक छोटा यज्ञ करतात व शेतात तयार झालेल्या नवीन पिकाच्या लोंब्या घरात आणून त्या देवाला अर्पण करतात. वसंत पंचमीला मोहरीच्या फुलांना येणाऱ्या बहराचा शुभारंभ मानला जातो. वसंत पंचमी पासून फाल्गुन पौर्णिमेपर्यंत वसंतोत्सव साजरा करतात. असं म्हणतात की सृष्टीच्या प्रारंभिक काळात भगवान विष्णूंच्या आज्ञेनुसार ब्रम्हाने मनुष्य योनी निर्माण केली. परंतु ते आपल्या निर्मितीने संतुष्ट नव्हते. तेव्हा त्यांनी भगवान विष्णूंची आज्ञा घेऊन आपल्या कमंडलू मधले पाणी पृथ्वीवर शिंपडले, पृथ्वीमध्ये कंपने निर्माण होऊन एक अद्भुत, अलौकिक शक्तीचा रूपात सुंदर चतुर्भुज स्त्री प्रकट झाली. जिच्या एका हातात वीणा तर दुसरा हात आशीर्वाद मुद्रेने वर उचललेला होता. दुसऱ्या दोन्ही हातांमध्ये पुस्तक व माळ होती. तिने जेव्हा तिचा हातातील विनेचा मधुर संस्कार केल्यावर सृष्टीमधील सगळ्यांना वाणी प्राप्त झाली. ब्रम्ह देवाणे तिला वाणीची देवी सरस्वती म्हटले. पुराणांच्या अनुसार श्रीकृष्णाने सरस्वती वर खुश होऊन वसंतपंचमीला तुझी आराधना केली जाईल असं वरदान दिले. ज्याप्रमाणे वसंत पंचमीला बाहेर फुलांना बहर येतो त्याचप्रमाणे लोकांमध्ये उत्साह व आनंद आला बहर येतो. सृष्टी प्रमाणेच मानवी जीवनातही आनंद व उत्साह वृद्धिंगत यावा यासाठी हा उत्सव साजरा करतात.
-गौरी डांगे.
मित्रांनो, वसंत पंचमीबद्दल ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन आवश्य कळवा. आपल्या आवडत्या कॉलेज कट्टा या संकेतस्थळाला पुन्हा आवश्य भेट द्या. कॉलेज कट्टा म्हणजे माहितीचे व्यासपीठ!
रेफरंस- https://en.wikipedia.org/wiki/Vasant_Panchami
Leave a Reply