
राज्यस्तरीय मराठी एकांकिका लेखन स्पर्धा
‘अवतरण अकादमी’ ही अधिकृत संस्था महाराष्ट्रात गेली २१ वर्षे २७ मार्च हा युनेस्को संस्थापित ‘इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्युट’ आयोजित “जागतिक रंगभूमी दिवस” साजरा करीत आहे. त्यानिमित्त ‘अवतरण’च्या नाट्यविद्यार्थ्यांच्या नव्या नाट्यकृतीचे मंचन, ‘इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्युट’ प्रसारित जागतिक कीर्तीच्या नाट्यकर्मीच्या आंतरराष्ट्रीय संदेशाचे जाहीर वाचन, रंगभूमीवर अव्यावसायिक स्तरावर लोकोत्तर कार्य करणार्या रंगकर्मीला “अवतरण सन्मान” प्रदान, आणि जागतिक रंगभूमी दिवसानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित ‘अवतरण’च्या “राज्यस्तरीय मराठी एकांकिका लेखन स्पर्धा” पारितोषिक वितरण, असा कार्यक्रम असणार आहे.
“राज्यस्तरीय मराठी एकांकिका लेखन स्पर्धे”साठी इच्छुकानी आपल्या नवीन स्वतंत्र एकांकिकेची एक सुवाच्य प्रत, प्रवेश शुल्क रु. १००/- मात्र, आणि सोबत ‘सदर एकांकिका हे आपले स्वतःचे नवीन लेखन असून ह्या एकांकिकेचा कुठेही प्रयोग झालेला नाही,’ असे हमीपत्र लेखकाने सहीनिशी ५ मार्च २०२० पर्यंत पाठवायचे आहे. विजेत्याना ‘अवतरण’च्या “जागतिक रंगभूमी दिवस” सोहळ्यात रोख पारितोषिके, सन्मानचिन्हे व प्रशस्तिपत्रे देण्यात येतील.
पत्ता – सौ. भारती सावंत, ६ धन्वंतरी, प्लाॅट १३२, सेक्टर २, प्रबोधनकार ठाकरे नगर, चारकोप, कांदिवली पश्चिम, मुंबई ४०० ०६७.
अधिक माहितीसाठी ९५९४४१६७३५, ९६१९५६०९८९ ह्या नंबरवर संपर्क करणे.
लेखन वार्ता
प्रतिनिधी-रितेश साळुंके,
कॉलेज कट्टा
Leave a Reply