
कुणी कितीही दिखाऊ पणा केला तरी काम बोलता है ही उक्ती केजरीवाल यांनी सिद्ध करून दाखवली… त्याच बरोबर त्यांनी प्रचारभान देखील दाखवले… दिल्ली विधानसभा पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि दिल्ली विधानसभा यांच्या प्रचार मुद्द्यामधील फरक समजून घेण्याचा प्रयत्न…
नमस्कार मित्रांनो, नुकतीच दिल्ली विधानसभा पार पडली यात आम आदमी पार्टीला घवघवित यश मिळालं. मागच्याप्रमानेच कॉंग्रेसचा सुफडा साफ झाला. भाजपाला देखील. फक्त आठ जागा मिळाल्या. आपने ६२ जागा मिळवल्या. हे सर्वांना माहित आहेच.
पण मला ही निवडणूक महत्वाची वाटते. या निवडूकीत एक वेगळेपण आहे. तो म्हणजे या निवडणुकीतील प्रचार मुद्दे.
महाराष्ट्र आणि दिल्ली विधानसभा प्रचार मुद्यात एवढा फरक का ?
मी इथे मुद्दाम तुलना करतो. बघा. महाराष्ट्र विधानसभा २०१९ आणि दिल्ली विधानसभा २०२० या दोन्ही विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या मुद्द्यामध्ये जमीन आसमनचा फरक आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे.
महाराष्ट्र विधानसभा २०१९ मध्ये कलम ३७०, राष्ट्रवाद, देश सुरक्षा हे भाजपाचे ठळक प्रचार मुद्दे होते. भाजपा ने फोडा फोडी करून आम्ही कसे अजिंक्य आहोत आणि त्याचप्रमाणे एक जिंकल्याची भावना सर्वत्र प्रचारातून पसरवण्यात यश प्राप्त केले होते. निवडणुकीचे प्रचार मुद्दे ठरवण्यात, त्याचप्रमाणे विरोधकांना देखील याच मुद्यावर उत्तरे देण्यात भाग पाडण्यात भाजपाला यश आले होते. उदाहरादाखल फडणवीस म्हणाले आम्ही तेल लाऊन दंड थोपटून आखाड्यात उतरलोत पण कुस्ती खेळण्यासाठी समोर पैलवानच (विरोधकच) नाही… याला उत्तर म्हणून पवार साहेबांनी दिलेले उत्तर आपणा सर्वांना माहीत आहे. सांगायचं तात्पर्य असे प्रचार मुद्दे घेऊन निवडणूक लढवली गेली म्हणजे महाराष्ट्रात विकास कामे भरपूर झालेत असे आहे का? महाराष्ट्र विधानसभा विकासाच्या मुद्यावर का लढवली नाही?
याच्या विपरीत दिल्ली विधानसभेत भाजपने निवडणुकित त्याच्या सोयीचे म्हणजे caa, NRC, हे मुद्दे घेऊन प्रचार करण्याचा प्रयत्न केला. पण मित्रांनो यात गम्मत अशी आहे सत्ताधारी पक्षाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हिंदुत्व, त्याचप्रमाणे राष्ट्रवादाच्या एका ही मुद्याचे उत्तर त्यांनी दिलेले नाही. याच्या विपरीत केजरीवाल यांनी त्यांनी केलेल्या विकास कामांचा प्रचार करण्याचे ठरवले यात त्यांना यश आले. लक्षात घ्या माध्यमांचा वापर करून वातावरण निर्मिती भाजपने दिल्लीमध्ये देखील केली पण याला केजरीवाल यांनी उत्तर दिले नाही कारण त्यांनी त्यांचा विकासाचा अजेंडा पुढे ठेऊन प्रचार केला. उलट केलेल्या टीकेला उदा एवढ्या शाळा आप ने बांधल्याच नाहीत या टीकेला त्यांनी तुम्ही माझ्याबरोबर बघायला चला मी तुम्हाला दाखवतो अशा पद्धतीची उत्तरे दिली. हा फरक लक्षात घेतला पाहिजे. थोडक्यात निवडणुकीची प्रचार दिशा ठरवण्यात आपला यश आले.
मतदार हा वेळोवेळी वेगवेगळे कौल देत असतो… पण यात महत्वपूर्ण बाब म्हणजे केलेल्या विकास कामांचे प्रचार मुद्दे घेऊन केजरीवाल यांनी प्रचार केला आणि त्यात त्यांना यश आले.
-अभिजीत हजारे. कॉलेज कट्टा.
Leave a Reply