
मोबाईल फोनचा विकास कसा झाला इतिहास जाणून घ्या
आजच्या काळात मोबाईल फोन हे आपल्या दैनंदिन जीवनाचे एक मुख्य भाग बनले आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत आपण आपल्या मोबाईल मध्येच मग्न असतो. व्हाट्सअँप, फेसबुक, इंस्टाग्राम, इत्यादी. अँप्लिकेशनचा लाभ आपण मोबाईल फोन द्वारे घेऊ शकतो. मोबाईल बद्दल तर आपल्याला बहुतांश गोष्टी ठाऊक असतील परंतु, तुम्ही कधी असा विचार केला आहे का, की मोबाईल फोनचा उगम कसा झाला? मोबाईलचा शोध कोणी लावला? आणि मोबाईल मध्ये कसा-कसा विकास झाला?
तर, आज आम्ही आपल्याला या लेखाच्या माध्यमातून या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहोत. मग चला जाणून घेऊया मोबाईल फोनचा संपूर्ण इतिहास.
जगातील सर्वात पहिला मोबाईल फोन हा अमेरिकी इंजिनियर मार्टिन कूपर(Martin Cooper) यांनी ३ एप्रिल १९७३ साली लॉन्च केला होता. हा मोबाईल फोन ‘Motorola’ कंपनी मध्ये बनवला गेला होता. १९७० पासून मार्टिन कूपर हे या कंपनी मध्ये Wireless Communication चे उपकरणे बनवण्याचे प्रयत्न करत होते, यासोबतच जन्म झाला तो म्हणजे जगातील सर्वात पहिला मोबाईल फोनचा.
भारताबद्दल म्हणायचं म्हटलं तर देशात सर्वात पहिल्या मोबाईल फोन चे आगमन 31 जुलाई 1995 मध्ये झाले. अर्थातच, मोबाईल फोनच्या जन्मापासून तब्बल १२ वर्षांनंतर! यासोबतच २० फेब्रुवारी १९९७ मध्ये ट्राई(Telecom Authority of India) ची स्थापना झाली.
१९७३-१९७९
जगातील सर्वात पहिल्या मोबाईल फोनचा जन्म झाला जो डॉ.मार्टिन कूपर यांनी ‘Motorola’ कंपनी मध्ये १९७३ साली बनवला आणि सर्वात पहिला फोन कॉल मार्टिन यांनी AT&T मध्ये असलेले कर्मचारी त्यांच्या मित्राला केला.
१९७९ मध्ये जपान ने सर्वात पहिले cellular network ‘1G’ ची निर्मिती केली.
१९८१-१९८९
१९८१ मध्ये 1G नेटवर्क हे UK आणि उत्तर अमेरिका मध्ये लॉन्च केले गेले. साल १९८३ मध्ये मोटोरोला कंपनीचा DynaTAC 8000X हा फोन ग्राहकांसाठी मार्केट मध्ये उपलब्ध केला गेला. साल १९८५ मध्ये Michael Harrison यांनी UK मधील सर्वात पहिला फोन कॉल केला. साल १९८९ मध्ये मोटोरोला ने 9800X या नवीन मॉडेलची निर्मिती केली. या मोबाईल मध्ये एक खास वैशिष्ट्ये म्हणजे त्याचे कीपॅड flip down प्रकारचे होते.
१९९१-२०००
1991 साली 2g नेटवर्क लॉन्च केले गेले. यामुळे SMS व MMS ही सुविधा शक्य झाली. १९९२ मध्ये Neil Papworth यांनी जगातील सर्वात पहिला मेसेज वडाफोन कंपनीचे डायरेक्टर यांना केला होता. १९९४ साली IBM कंपनीने सर्वात पहिला टाचस्क्रीन मोबाईल लॉन्च केला. त्यासोबतच १९९६ मध्ये Nokia ने 8110 सिरीजचा स्लायडर फोन प्रकाशित केला. १९९७ मध्ये नोकियाच्या 6110 सिरीज ने सर्वात पहिला मोबाईल गेम ‘Snake’ हा लॉन्च केला.
१९९९ मध्ये नोकिया ने 7110 सिरीज चा फोन लॉन्च केला ज्यामुळे Web Browsing ची सुविधा शक्य झाली. २००० साली लॉन्च झालेला Sharp-J SH04 हा पहिला कॅमेरा फोन होता.
२००१-२०१०
२००१ मध्ये Sony Ericson ने पहिला कलर डिस्प्ले फोन प्रकाशित केला ज्याचे नाव T68i असे होते. २००२ मध्ये नोकियाने देखील आपला पहिला कॅमेरा फोन युरोप मध्ये लॉन्च केला. तसेच २००३ साली 3g नेटवर्क लॉन्च झाले जे 2g पेक्षा १०* फास्टर होते. २००५ साली मोबाईल ची नवीन ऑपरेटिंग सिस्टिम ‘Android’ हे लॉन्च झाले. २००६ मध्ये नोकियाने आपले पहिले स्मार्टफोन प्रकाशित केले ज्यात १६०mb रॅम होती.
२००७ मध्ये Apple कंपनीने आपला पहिला iPhone लॉन्च केला ज्यात अनेक वैशिष्ट्ये सामील होते. २००८ मध्ये सर्वात पहिला अँड्रॉइड मोबाइलला G1 लॉन्च झाला.
२०११-२०१९
२०११ मध्ये सॅमसंग ही सर्वात प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी बनली जिने सर्वात जास्त स्मार्टफोन विकले होते. २०१३ मध्ये सर्वात पहिले मोबाईल fingerprint scanner लॉन्च झाले जे iPhone 5s मध्ये उपलब्ध होते. २०१५ साली सर्वत्र 4g नेटवर्क प्रकाशित झाले. सोबतच Xiaomi कंपनीने आपले पहिले स्मार्टफोन लॉन्च केले. २०१९ मध्ये UK आणि US मध्ये 5g नेटवर्क लॉन्च केले गेले जे 4g पेक्षा १०* फास्टर होते.
तर, अश्या प्रकारे मोबाईल फोनचा ‘मोबाईल पासून स्मार्टफोन’ पर्यंतचा प्रवास राहिला.
नीरज भावास्कर. कॉलेज कट्टा
Leave a Reply