
Mahashivratri Information in Marathi language
माघ महिना सुरू झाला की वातावरणातूनच ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा नाद ऐकायला येऊ लागतो. घराघरातून शिवलिलामृत, काशीखंड या ग्रंथांचा जप सुरू होतो. बारा ज्योतिर्लिंगे, चारधाम यांच्या यात्रा सुरू होतात. असे म्हणतात की महाशिवरात्रि म्हणजे पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गातील एक दिवस. श्री शंकर ह्या प्रहराला विश्रांती घेतात. त्या विश्रांतीच्या काळाला महाशिवरात्री म्हणतात. शिवरात्रीच्या या काळामध्ये पृथ्वीवरील तमोगुणाची शक्ती वाढते व वाईट शक्तीचा दाब वाढतो. त्याचा निकृष्ट परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून महाशिवरात्रि पाळावी.
माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते भगवान श्री शंकराची आराधना करत उपवासाचे कडक व्रत फक्त फलाआहार घेऊन करतात.
ह्या दिवशी पिंडाला पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात. या पूजेत भस्म व तांदूळ वापरतात. पिंडीला या दिवशी अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालावी. ॐ नमः शिवाय या मंत्राचा महिनाभर जाप केल्याने निर्माण होणारी अघोरी शक्ती आपल्यापासून लांब राहते. त्याच प्रमाणे या दिवशी कडक उपवास धरल्यानेआपले मन शांत होते आणि काम, क्रोध, मद, मत्सर या सारख्या गुणांपासून लांब राहण्याची शक्ती मिळते.
शिवपुराण जरूर वाचा नक्की लाभ होईल
या दिवसामागे शिवाची दयाळूपणा ची एक सुंदर कथा आहे. असाच एक दिवस एक पारधी शिकार करायची म्हणून जंगलात तलावाच्या शेजारच्या वृक्षावर जाऊन बसला. पाणी पिण्यासाठी एखादे सावज आलं तर लगेच हाती शिकार लागेल ह्या हेतूने. तू पूर्ण तयारीत बसला खरा! पण एकही शिकार येईना. तिन्हीसांज होऊ लागली तरी एक सुद्धा प्राणी आला नाही. तेवढ्यात काही हरणं पाणी पिण्यासाठी तिथं आली.अर्धी सावध होऊन धनुष्याची दोरी खेचणार तोच हरिणांचा प्रमुख पुढे येऊन पारध्याला म्हणाला, तू तर शिकारी आहेस. शिकार करणे हा जरी तुझा धर्म असला तरी आमची एक विनंती ऐक, आम्ही एकदा शेवटचं कुटुंबियांना भेटून येतो. मग तू आम्हाला मार.हातातोंडाशी आलेली शिकार सोडण्याची पारध्याची इच्छा नव्हती. परंतु हरिणांच्या प्रमुखाने दिलेल्या वचनामुळे पारधी म्हणाला,”ठीक पण सकाळचा सूर्योदयापूर्वी मात्र तुम्ही आलं पाहिजे.”खरं आणि ते मान्य केलं आणि ती निघून गेली.आता नुसतं बसून करायचं काय यामुळे तो दूर वरच्या मंदिरातून येणाऱ्या ओम नमः शिवाय या मंत्राचा नकळत घोष करू लागला. व चाळा म्हणून तो ज्या झाडावर बसला होता, त्या झाडाची पाने तोडून खाली टाकू लागला.त्याच्या कमरेला बांधलेल्या भांड्यातील पाणी खाली पडत होते.व त्या वृक्षाखाली नेमकी शिवपिंड होती जिच्यावर त्याच्या हातून नकळत अभिषेक घडत होता.
तोच ते हरिण आले आणि म्हणाले,”पारध्या मी माझं कर्तव्य करून आलो आहे आता तू मला मारू शकतोस.”त्यात एक हरिणी पुढे येऊन म्हणाली,”पारध्या मला माझे पत्नी कर्तव्य निभावू दे तू मला आधी मार.” त्याच्यापुढे एक हरणाचे पिल्लू आले आणि ते पारध्याला म्हणाले,”नाही पारध या तू मला आधी मार.”असं करत करत प्रत्येकाचीच एकमेकांना वाचवण्यासाठी चढाओढ सुरू झाली. ती चढाओढ पाहून पारध्याच्या मनाला दयेचा पाझर फुटला. तो म्हणाला,”थांबा मला तुमची एक-मेकां बाबतीची कर्तव्यदक्षता पाहून खुप आनंद वाटत आहे तुम्ही जर प्राणी असून एवढी एवढी एकमेकां बाबतीत आपुलकी दाखवता तर मी माणूस असून तुमच्याबाबतीत दया दाखवू शकत नाही का?”असं म्हणून त्याने त्या सर्वच हरणांना जीवनदान दिले. यामुळे श्रीशंकर प्रसन्न झाले. व त्यांनी प्रत्येकाचाच उद्धार केला. हरिणांना मृग नक्षत्र आणि पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून आकाशात अबाधित स्थान दिले.
शिव पूजा केल्याने जसे पारध्यांचे तमोगुणापासून रक्षण होऊन त्याच्या मनात दयेची भावना निर्माण झाली ,त्याचप्रमाणे भक्तिभावाने पूजा केल्याने प्रत्येकाला शिवशक्ती लाभते.
-गौरी डांगे. अहमदनगर.
मित्रांनो, Mahashivratri Information in Marathi language महाशिवरात्रि का साजरी केली जाते माहिती मराठी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन आवश्य कळवा आणि आपल्या आवडत्या कॉलेज कट्टा या संकेतस्थळाला पुन्हा आवश्य भेट द्या.
“कॉलेज कट्टा” म्हणजे माहितीचे व्यासपीठ! जिथे दैनंदिन जीवनात उपयोगाला येणारी महत्वपूर्ण माहिती सोप्या भाषेत सादर केली जाते.
Leave a Reply