अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत! स्वराज्याचे मुकुटमनी, रयतेचे कैवारी, कुळवाडी भूषण! छत्रपती शिवाजी महाराज यांचाबद्दल माहिती निबंध भाषण लेख मराठी मध्ये

महाराष्ट्राचे आराध्य दैवत! छत्रपती शिवाजी महाराज यांचाबद्दल माहिती निबंध भाषण लेख मराठी मध्ये
महाराजांचा इतिहास कोणाला माहीत नाही महाराष्ट्रात असा माणूस शोधून सापडणार नाही महाराजांनी शाहिस्तेखाणाची बोटे कापली अफझल खानाचा कोथळा काढला. दिल्लीत जाऊन बादशाहाला घाम फोडायला लावला. ह्या आणि अश्या बऱ्याच गोष्टी सगळ्यांना तोंड पाठ आहेत पण महाराजांविषयी आणि त्यांच्या व्यक्तीमत्वाविषयी असलेला आदर यामुळे महाराजांविषयी लिहिण्याचा हा प्रयत्न.
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत! स्वराज्याचे मुकुटमनी, रयतेचे कैवारी, कुळवाडी भूषण!
350 वर्षांपूर्वी ज्यांनी अखंड हिंदुस्थानचे राजकारण हलवलं आणि महाराष्ट्राला त्यात मनाचे स्थान प्राप्त करून दिले.
जेव्हा उत्तरेत मुघलांनी आणि दक्षिणेत निजाम, कुतुबशहा आणि आदिलशाह यांनी धुमाकूळ घातला होता तेव्हा कोणी विचार पण करत नव्हते स्वराज्याचा! सर्व गुलामी करण्यात धन्यता मानत होते. तेव्हा शहाजी राजे आणि माँसाहेब जिजाऊ यांनी स्वराज्याच स्वप्न पाहिले आणि ते सत्यात उतरवलं ते शिवरायांनी!
350 वर्षांपूर्वी ज्यांनी हिंदुस्थानचे राजकारण हलवलं त्यांच्या नावाने आजही 350 वर्षानंतरही राजकारण चालते ही बाब काही साधी नाही. जगातील एकमेव राजा ज्याला देवाचा दर्जा दिलाय लोकांनी!
5 पातशाह्या ज्यांनी आपल्या तलवारीच्या पात्यावर आणि राजकारणाच्या जोरावर नाचवल्या ते म्हणजे महाराज!
पण अस काय कारण आणि अस काय रसायन आहे “छत्रपती शिवाजी महाराज” या नावात की 350 वर्षे उलटून गेली तरी या राजाच्या नावाने अजूनही महाराष्ट्र चालतो आणि चालतोच काय कधी कधी बंदही पडतो.
महाराज हे एक नाव ऐकलं तरी मराठी तरुणांच्या नसानसांत रक्त सळसळू लागते.
एका सरदाराचा मुलगा ज्यांनी आपल्या मांडीवर निजामाला बसवून निजामशाही चालवली आणि मुघलांना घाम फोडला.
अश्या पराक्रमी आणि मुत्सद्दी शहाजी राजे भोसले यांचे पुत्र म्हणजे शिवाजी महाराज!
Chhatrapati Shivaji Maharaj Information Biography in Marathi language
छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण
19 फेब्रुवारी 1630 शिवाई देवीची कृपा झाली आणि अखंड महाराष्ट्राचा उद्धार करणाऱ्यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला.
पराक्रमी आणि देवासमान पित्यापासून कायम लांब राहावे लागले पण तरीसुद्धा कणखर अश्या अखंड महाराष्ट्राच्या माँसाहेब जिजाबाईसाहेब यांनी शिवरायांवर संस्कार केले आणि लहानपणापासून स्वराज्याचे बीज त्यांच्या मनात रुजवले.
माँसाहेब आणि शहाजीराजे साहेबांनी सोबत दिलेल्या काही माणसांसोबत महाराजांचे शिक्षण चालू झाले.
गाढवाचा नांगर फिरवलेल्या पुण्यात माँसाहेब आणि शिवाजी राजे राहायला आले.
पुण्याचा उद्धार केला आणि ज्या पुण्यात कोणी राहायला तयार नव्हते ते पुणे परत लोकांनी गजबजून उठले लाल महालात बाल शिवाजी वाढत होते.
माँसाहेबांच्या छत्राखाली शिवराय वाढत होते आणि स्वराज्याचे स्वप्न पाहत होते आणि त्यासाठी सवंगडी जोडत होते. शिवरायांनी माणसे जोडली ती जीवाला जीव देणारी स्वराज्यासाठी मारणारी आणि प्रसंगी मरणारीही माणसे शिवरायांनी जोडली हेच शिवरायांचं यशाचं गुपित. मग ते जीवा महाला असो नाहीतर शिवा काशीद! लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असे बोलणारे आणि घोडखिंडीला आपल्या रक्ताने पावनखिंड करणारे बाजीप्रभू असो. नाहीतर पोटच्या पोराचे लग्न असून मी मोहिमेवर जातो आधी लग्न कोंढण्याचे मग रायबाचे असे बोलणारे नरवीर तानाजी मालुसरे असो या माणसांच्या जोरावर स्वराज्य उभे राहिले आणि फक्त उभेच नाही राहिले तर वाढले देखील.
स्वराज्य उभे राहिले ते येथील मावळ्यांच्या रक्तावर आणि येथील शेतकऱ्यांच्या घामावर असे महाराज बोलत असत.
अवघ्या 16 वर्षाच्या वयात रायरेश्वराच्या मंदिरात शिवपिंडीवर आपल्या रक्ताने अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेतली आणि तोरणा घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले.
ज्या काळात स्रियांना जहागिरी प्रमाणे वागवलं जात होतं. स्त्री, चिंधी आणि लख्तर हे एकाच दोरीला टांगायचे त्या काळात माँसाहेब जिजाऊ आणि शिवरायांनी आई बहिनेप्रमाणे स्रियांना वागवले. कोणी पळवापळवी करू नये म्हणूनच महाराजांचा जन्म झाला होता.
रंझ्याच्या पाटलाचा चौरंगा करून स्वराज्यात स्त्रीचे स्थान काय आहे हे सगळ्यांना दाखवून दिले पण त्याच शिवरायांच्या महाराष्ट्रात आज एकविसाव्या शतकात परिस्तिथी किती भयानक आहे, महाराजांच्या महाराष्ट्रात स्त्री सुरक्षित नाही स्रियांवर अन्याय अत्याचार दिवसेंदिवस वाढतायेत. महाराजांच्या विचारांची महाराष्ट्राला कायमस्वरूपी गरज आहे असं वाटतंय आता परत महाराजांच्या चौरंग्याची महाराष्ट्राला गरज आहे.
महाराष्ट्र हा फक्त दिल्लीला मुजरा करायला नाही तर वेळ प्रसंगी दिल्लीलाही मुजरा करायला लावणारा आहे हेच महाराजांनी दाखवून दिले.
ज्या सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांत फक्त वाघ, वारा आणि मावळे फिरू शकतात त्याच सह्याद्रीत शिवरायांनी गनिमी काव्याने गणिमांना सळो की पळो करून सोडले.
सह्याद्री, समुद्र आणि शिवराय या तिघांच्या संगमाणे विजापूरची आदिलशाही लोळवली आणि मोघलांना घाम फोडला.
भारताच्या राजकारणात दबदबा निर्माण करण्यासाठी औरंगजेबाला थेट दिल्लीत लाल किल्यात जाऊन औरंगजेबाला घाम फोडला. औरंगजेबाने कपटाने महाराजांना कैद केले पण जेथून मृत्यू पण नाही येऊ शकत आणि महाराज सम्पले असे ज्यांना ज्यांना वाटत होते त्या सगळ्यांना चुकीचे ठरवत आणि औरंगजेबाच्या हातावर तुरी देत महाराज मृत्यूच्या जबड्यातून सुटले आणि अखंड महाराष्ट्राने सुटकेचा निश्वास सोडला आपला राजा सुखरूप सुटावा यासाठी महाराष्ट्रातील 4 लाख लोकांनी आपले देव पाण्यात ठेवले होते.
शंभुराजांना दिल्लीची आणि औरंगजेबाची ओळख व्हावी म्हणून महाराज 8 वर्षांच्या शंभुराजांना सोबत घेऊन गेले होते महाराज हे दूरदृष्टी होते. आपला मुलगा जिवंत असताना आपल्या मुलाचे दिवस घातले अस कदाचित इतिहासात पहिल्यांदाच झालं असेल.
महाराजांच्या 50 वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील 4 लाख लोक कधी दुष्काळाच्या कारणाने मृत्युमुखी पडले नाही तेच महाराजांचं धोरण आज सगळ्या सोयी असताना आजच्या राजकारण्यांना का जमत नाही ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
महाराजांनी शेतकऱ्यांना सरकारी तिजोरीतून कर्ज आणि शेतीउपयोगी वस्तू देऊ केल्या.
महाराजांसाठी लोक मरायला तयार झाली याच सर्वात मोठं कारण म्हणजे त्यांना विश्वास होता मी गेल्यावर देखील माझ्याघरावर लक्ष ठेवायला हा देवमाणूस आहे आणि हाच विश्वास महाराजांनी सार्थ करून दाखवला जे जे मावळे स्वराज्याच्या कामी आले त्यांच्या घरच्यांची महाराजांनी काळजी घेतली त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार नाही याची देखील व्यवस्था महाराजांनी केली.
महाराजांचे व्यक्तीमत्वच असे होते की शत्रूला देखील त्यांच्या बद्दल आदर वाटत होता.
महाराजांनी जे स्वराज्य उभं केलं ते ह्या महाराष्ट्रातील 18 पगड जातीतील लोकांना एकत्र घेऊन. महाराजांनी कधीच जातीभेद आणि धर्मभेद केला नाही.
महाराजांच्या सैन्यात जसे हिंदू होते तसे अनेक मुस्लिम देखील होते महाराजांचे अंगरक्षक देखील मुस्लिम होते. अश्या या आदर्श राजाच्या महाराष्ट्रात आज जातीवरून अजून दंगली होतायत हा या जातीचा हा त्या जातीचा असच राजकारण चाललंय महाराष्ट्रात.
18 पगड जातीच्या लोकांना महाराजांनी एकच जात दिली आणि तीच नाव “मावळा” आपण सारे त्याच जातीचे महाराजांचे मावळे आहोत हेच लोक विसरले आहेत आणि तीच सर्वांत मोठी शोकांतिका आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचाबद्दल माहिती निबंध भाषण लेख मराठी मध्ये
महाराजांचे आदर्श असे चरित्र
कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा प्रसंग पण महाराजांच्या व्यक्तीमत्वचा एक पैलू फार प्रखरपणे जाणवतो इतकी सुंदर ती स्त्री! तिला पाहून कोणाचं पण मन जागेवर नसत राहिले तिला बघून महाराज बोलले आमची आई इतकी सुंदर असती तर आम्ही पण असेच झालो असतो बहिनेप्रमाणे ओटी भरून तिला परत तिच्या घरी पाठवले महाराजांनी. असं फक्त महाराजच करू शकतात. त्या काळात महाराजांनी काही वेगळं केलं असत तरी त्यांना कोणी चुकीचं नसत बोलले पण चुकीचा मार्ग स्वीकारतील ते sमहाराज कुठले! जिजाऊ मासाहेबांच्या संस्कारांच्या रूपाने तो निश्चयाचा महामेरू उभा होता.
विरोधकांचा मानातीन आदर
शाहिस्तेखाणाने पण लिहून ठेवलंय शिवाजी लाल महालातून गेल्या नंतर एक स्त्री सापडत नव्हती तेव्हा सगळ्यांना वाटत होते महाराजांनी नाहीतर महाराजांच्या मावळ्यांनी नेली असेल तेव्हा शाहिस्तेखान बोलला शिवाजी अस करूच शकत नाही आणि त्यांच्या मावळ्यांनी नेली असेल तर काळजी करण्याचं कारण नाही शिवाजीला कळल्यावर तो तिला मानाने परत आणून देणार काळजी नसावी.
इतका विश्वास माझ्या राज्याबद्दल त्यांच्या शत्रूंना पण होता इतिहासात अशी दुसरी गोष्ट सापडणे शक्य नाही.
शंभूराजेंची जडण-घडण
बाप कसा असावा हे महाराजांनी शंभुराजांना घडवून दाखवून दिले. त्याच शंभूराजांनी पुढे स्वराज्याची सूत्रे यशस्वीपणे सांभाळली आणि 8 वर्षे औरंगजेबाला या महाराष्ट्रात आणून झुंझवले एकही किल्ला औरंगजेबाच्या 5 लाखाच्या फौजेला घेऊ दिला नाही 120 लढाया लढल्या एकही लढाई हरले नाही की एकदाही तह नाही केला अश्या पराक्रमी पुत्राला महाराजांनी घडवले.
महाराजांची जयंती नेमकी कोणती साजरी करायची यावरून त्यांनीच घडवलेल्या महाराष्ट्रात आज वाद होतायत ही किती शरमेची गोष्ट आहे ना.
आम्ही दोन्ही पण जयंती साजरी करू पण एक समाज एका तारखेला करणार आणि दुसरा समाज तिथीला करणार अस झालंय आज महाराष्ट्रात.
म्हणजे महाराज नक्की कोणत्या समाजाचे अस घडतंय आज महाराष्ट्रात महाराज हे कोणत्या एका समाजाचे किंवा कोणत्या एका राजकीय पक्षाचे असूच शकत नाहीत हे लोक विसरलेत काय? महाराज हे महाराष्ट्रातील 11 कोटी जनतेचे आणि 18 पगड जातीच्या लोकांचे आराध्य दैवत आहेत.
Chhatrapati Shivaji Maharaj Essay Speech in Marathi language
शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक
एक असा राजा ज्याचा 6 जून 1674 रोजी रायगडावर राज्याभिषेक झाला. त्याकाळी प्रचलित असणारी सम्राट, बादशाह, महाराणा अशी विशेषणे नाही लावली आपल्या नावापुढे महाराजांनी स्वतःच्या नावापुढे “छत्रपती” अस विशेषण लावलं महाराष्ट्रातील जनतेच्या डोक्यावर छत्र धरणारा छत्रपती.
“शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे”. महाराजांच राज्य खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य होते.
350 किल्ले होते स्वराज्यात कित्येक लोकांना रोजगार मिळाला पण त्या एका पण किल्ल्याला महाराजांनी स्वतःचे नाव दिले नाही. नाहीतर आज आपल्याला रस्त्यांना नेत्यांचीच नावे दिसतायेत.
अश्या या युगपुरुषाचे 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर निधन झाले आपल्या अखंड महाराष्ट्राला पोरकं करून महाराज सोडून गेले अखंड महाराष्ट्र रडत होता. जेव्हा औरंगजेबाला ही बातमी समजली तेव्हा औरंगजेबानी खुदाला सांगितले तुझे दरवाजे उघडे ठेव एक नेक बंदा येत आहे.
सगळ्यात मोठ्या शत्रूच्या मनात देखील महाराजानविषयी किती आदर होता हे दिसत यावरून. आपल्या 50 वर्षांच्या कार्यकाळात महाराज जसे जगले जे राजकारण साधलं ती खरच आच्छर्याची गोष्ट आहे अनेक अशक्य गोष्टी महाराजांनी शक्य करून दाखवल्या. फक्त भगवा घेऊन फिरण्यापेक्षा, त्यांचे फक्त प्रतिमा पूजन करण्यापेक्षा, महाराजांच्या व्यक्तीमत्वातील थोडे जरी गुण तरुणांनी आत्मसात केले तरी हीच खरी महाराजांची भक्ती ठरेल असे मला वाटतय.
महाराजांनी त्यांचं सगळे आयुष्य ज्या गडकिल्ल्यांवर व्यतीत केले मावळ्यांनी ज्या किल्ल्यांवर पराक्रम गाजवला त्या किल्ल्यांची आज दुरावस्था झाली आहे आणि आपण भांडतोय तर कशावर महाराजांच्या स्मारकाची उंची किती ठेवायची ते.
महाराजांची खरी उंची आणि त्यांचा पराक्रम दाखवणारे किल्लेच जर नाही राहिले तर त्या स्मारकाचे काय करायचंय याचा विचार करायला पाहिजे आपण.
महाराजांसारखा आदर्श राजा या पृथ्वीतलावर शोधूनही सापडणार नाही याबद्दल काहीच शंका नाही. महाराजांविषयी लिहिण्यासारखा भरपूर आहे इतक्या कमी शब्दात समावणारे कर्तृत्व आणि व्यक्तीमत्व हे महाराजांचे नाही.
shivaji pratyek gharat jalma ve Read More
महाराजांविषयी आणि महाराष्ट्रविषयी बोलताना कवी प्रदीप लिहितात
“देखो मुल्क मराठोंका यहा शिवाजी डोला था
मुघलोंकी ताकद को जीसने तलवारों पे तोला था
हर पर्वत पर आग लगी थी हर पथ्थर पर शोला था
बोली हरहर महादेव की बच्चा बच्चा बोला था
शेर शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की
इस मिट्टी से तिलक करो ये धरती हे बलिदान की”
अश्या या रयतेच्या राज्याला आणि आमच्या देवाला मानाचा मुजरा!!!
महाराजांचा एक मावळा,
अक्षय जाधव
कडूस राजगुरूनगर.
मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांचाबद्दल माहिती निबंध भाषण लेख मराठी मध्ये Chhatrapati Shivaji Maharaj Information Biography in Marathi language Chhatrapati Shivaji Maharaj Essay Speech in Marathi language
ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन आवश्य कळवा.
या प्रकारची महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी कॉलेज कट्टा “college Catta” या आपल्या आवडत्या संकेतस्थळाला पुन्हा आवश्य भेट द्या. College Catta म्हणजे माहितीचे व्यासपीठ! जिथे दैनंदिन जीवनात उपयोगाला येणारी महत्वपूर्ण माहिती सोप्या भाषेत सादर केली जाते.
Leave a Reply