मराठी प्रेम कविता
मराठी प्रेम कविता आस…?
का मज ना उमगले
जरी तू यत्न केला येण्यास ,
मी ना समजलो परिसाशी…
चातकाप्रत आस लागली,
पण का न जाणीले जाणून मी,
मी न केला मनी विचार कधी प्रेमात
तुझ्या काही क्षणाचा आहे मी अपराधी
सोज्वळ भावना मी कमनशिबी न उमगलो…
आज हर दिन भासतो तपाप्रत,
जीवन जगतो अधांतरी तुजवीन,
एकदा भेट आयुष्याच्या पथावर,
एकटाच चालतो मी अन माझे विश्व,
घेऊनी अंधारल्या रात्रीसम एक काजवा होऊनी ये…
येता परतु…न तू परिसरच होऊन जा,
बदलून टाक गंजल्या लोहास …
मराठी प्रेम कविता
-सागर गोरखे.
Leave a Reply