
निळकंठ मास्तर येत्या २६ जानेवारीला फक्त मराठी वर
स्वातंत्र्यवीरांच्या कथा म्हटल्या की त्यात देशप्रेम, त्याग, बलिदान, वनवास, संघर्ष या सगळ्या गोष्टी आवर्जून येतात. मात्र त्यांच्या प्रेमभावनांबद्दल तितकसं बोलले जात नाही. माणूस म्हटलं की प्रेमभावना ह्या आल्याचं… मग ते स्वातंत्र्यवीरचं का असेनात… याचं स्वातंत्र्यवीरांच्या दुर्लक्षित प्रेमभावनांवर प्रकाशझोत टाकणारा सिनेमा म्हणजे निळकंठ मास्तर… असहकार चळवळीत भूमिगत झालेल्या स्वातंत्र्यसेनानींच्या भोवताली फिरणारी ही कथा… त्यांची आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची धडपड आणि त्याचबरोबरीनं मनात उमलू लागलेले प्रेमबंध यांचे संमिश्र चित्रण निळकंठ मास्तर या चित्रपटात करण्यात आले आहे. एका हळव्या नात्याचा हळूवार उमलत जाणारा प्रवास निळकंठ मास्तरच्या निमित्ताने आपल्यासमोर येणार आहे. 1942 ची प्रेमकथा यानिमित्ताने आजच्या तरूण पिढीला अनुभवता येईल.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाबरोबरचं चित्रपटाची कथा, पटकथा आणि गीते लिहिली आहेत. गजेंद्र अहिरेंनी शब्दांत मांडलेल्या स्वातंत्र्यवीरांच्या भावनांना अजय-अतुल या सुप्रसिध्द संगीतकारांनी संगीतबध्द केले आहे. निळकंठ मास्तर या चित्रपटाचं संकलन बल्लू सलूजा यांनी केले असून चित्रपटाचं छायाचित्र दिग्दर्शन कृष्णा सोरेन यांनी केले आहे. या चित्रपटात विक्रम गोखले, आदिनाथ कोठारे, किशोर कदम, ओंकार गोवर्धन,पूजा सावंत, नेहा महाजन, या कलाकारांनी काम केले आहे.
मेघमाला बलभिम पठारे निर्मित अक्षर फिल्म्स प्रायवेट लिमिटेड प्रस्तुत ‘निळकंठ मास्तर’ येत्या २६ जानेवारीला सकाळी ११.३० वाजता संध्याकाळी ७ वाजता फक्त मराठी या चॅनेलवर प्रदर्शित होत आहे. अशी माहिती रितेश साळुंके यांनी दिली.
सिनेवार्ता
रितेश साळुंके. कॉलेज कट्टा
Leave a Reply