
इस्रोच्या महत्वाच्या शास्त्रज्ञातील एक महत्वाचे नाव, मिसाईल मॅन म्हणजे डॉ.कलाम होत. कलाम यांनी भारतभरातील तरुणांना, शाळकरी मुलांना शास्त्रीय दृष्टीकोनाची जी प्रेरणा दिली ती प्रचंड होती. आजही त्यांचे विचार तरुणांना, शालेय विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञ बनण्यासाठी, काहीतरी वेगळ, देशहितात काहीतरी करून दाखवण्याची प्रेरणा देतात. कलाम हे स्वतः वक्तशीरपणा, साधेपणा, देशहितासाठी झपाटलेले व्यक्तिमत्व!
१९९८ साली त्यांनी एक स्वप्न पाहिलं ते म्हणजे इंडिया २०२०. ते नेहमी म्हणायचे आपण सर्वजन मिळून अश्या पद्धतीने काम करू कि दोन हजार वीस सालापर्यंत आपण भारताला महासात्तक बनऊ. भारत महासात्तक होणार म्हणजे नेमके काय होणार? यात त्यांचे काही महत्वाचे मुद्दे तपासले तर
१. भारतातील एकही मुल अशिक्षित राहणार नाही. म्हणजे सर्वाना शिक्षण मिळावे.
२. सर्व गावात वीज आणि इतर मुलभूत सुविधा पोहोचल्या पाहिजेत.
३. वाढत्या लोकसंख्येनुसार अन्नधान्याची उत्पादन क्षमता वाढवणे.
४. अनुउर्जा, माहिती तंत्रज्ञान, अवकाश आणि इतरही विज्ञान शाखेत भारताला स्वयंभू बनवणे.
अशा पद्धतीचे अनेक मुद्दे त्यांच्या इंडिया २०२० मध्ये होते. थोडक्यात भारताला २०२० साला पर्यंत महासत्ता बनवण्याचं त्याचं स्वप्न होत. पण २०२० का ? असा प्रश्न सर्वाना पडणे गरजेचे आहे. डॉ कलाम यांना गतीने विकास करायचा होता.
वरील मुद्यांवर नजर फिरवल्यानंतर इस्त्रोची मंगलयान MOM, चांद्रयान मोहीम असेल. इतरही मोहिमा असतील यात आपले शास्त्रज्ञ प्रगती करत आहेत. पण इतर महत्वाचे मुद्दे म्हणजे मुलभूत गरजा सुविधा यात भारत आजही पिछाडीवर आहे. आजही काही ठिकाणी वीज, पाणी, रस्ते. पोहचले नाहीत. या मुद्यांवर काम करण्याची गाती भारताला वाढवणे खूप गरजेचे आहे.
पंचवार्षिक निवडणुकीचे काही फायदे आहेत तसेच काही तोटे आहेत. प्रत्येक गोष्ट सरकारच्या माथी मारायची आणि फक्त चर्चा करायची एवढच कर्तव्य नागरिक पार पाडत आहेत. भारतात निवडणुका होत राहतात सरकार बदलतात पण निवडणुकींचे मुद्दे तेच असतात. अशा प्रकारचे राजकारण विकासाचा वेग वाढवेल का मंदावेल हे ज्याचे त्याने ठरवावे. पण नागरिकांनी देखील आपली जबाबदारी समजून घेणे खूप गरजेचे आहे. देशाच्या प्रगतीमध्ये सरकार बरोबर नागरिकांचाही तेवढाच मोठा हात असतो. हे या निमिताने समजून घ्यावे.
आज लोकसंख्येचा प्रश्न भारतासमोर आ वासून उभा आहे. जरी आपण स्वतःला खंडप्राय देश म्हणत असू तरी देखील वाढत्या लोकसंख्येसमोर रीसोर्र्सेस कमी पडत आहेत. यातून बेरोजगारी, वाढती स्पर्धा, अन्नधान्याचा, सुविधांचा तुटवडा वाढत आहे. लोकसंख्येला आळा घालण्यासाठी प्रयत्न हवेत.
कचरा, प्लास्टिक, प्रदूषण प्रश्नावर शिस्तबद्ध उपाय आणि जागरुकता करणे गरजेचे आहे. असे इतरही खूप सारे महत्वचे मुद्दे प्रश्न आजही म्हणजे २०२० सालामध्ये आपल्या समोर आ वासून आहेत.
१९९८ साला पासून त्यांच्या २००२ ते २००७ या राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळात असेल आणि मृत्युच्या शेवटच्या क्षणा पर्यंत डॉ. कलाम यांनी भारताला २०२० पर्यंत महासत्ता बनवण्याची प्रेरणा दिली. विज्ञान क्षेत्रात प्रगतीसाठी गती दिली. कार्य केले. पण त्यांनी पाहिलेले २०२० सालापर्यंत भारताला महासत्ता बनवण्याचे स्वप्न हे अपूर्णच राहिले. याची कारणे शोधण्याची गरज आहे. -अभिजीत हजारे.
Leave a Reply