
सदर-‘सकार ….’
बचेंगे-लडेँगे और जितेंगे भी…
“यशमार्ग” प्रेरणादायी संवाद ह्या व्याखानानिमित्त एका महाविद्यालयात गेलो होतो. सुमारे सव्वा तास तरुणाईला सकारात्मक, प्रेरणादायी व्याख्यान दिलं. मुलं,मुली प्रसन्न दिसू लागल्या. औटोग्राफ, सेल्फी एक वेगळाच माहोल तयार झाला. प्रचार्यांच्या केबीनमध्ये असताना 2 मुल मला भेटण्याकरता आली. दोघेही म्हणाले आम्ही दोघेही मोबाइल ऐडिक्ट झालो आहोत. पण आम्हाला घडायच आहे, चांगल वागायचं आहे. आम्ही काहीही करयला तयार आहोत. आम्हाला ह्यातून बाहेर काढा. तुमचं व्याख्यान ऐकल्यानंतर आमच्या लक्षात आलं की तुम्ही आम्हाला नक्किच चांगलं सांगाल. मी म्हणाले की तुम्हला मोबाइल पासुन सुट्का हवीय हाच सर्वात चांगला-सकारात्मक विचार तुमच्यामध्ये आहे इथच पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त जिंकलात. दोघंचाही चेहरा मला खुप काही सांगू लागला.
मी त्यांना म्हणाले की बचेंगे तो और भी लडेँगे हे तुम्ही ऐकलं असेलच. दोघांनीही होकारार्थी मान हलवली. मुलांनो, आता ह्यापुढचा विचार करायचा. दोघांचाही प्रश्नांकित चेहरा. मी म्हणाले बचेंगे तो और भी लडेँगे हा सकारात्मक विचार आहेच पण ह्यामधे जर तर आलं. असा विचार करायचा की बचेंगे, लडेँगे और जितेंगे भी. दोघेही अवाक होऊन माझ्याकडे पाहू लागली. येस मी वाचणारच, मी लढणारच आणि मी जिंकणारच हा झाला शंभर टक्के आशावाद.
मित्रांनो, आता मी एका मुलाच्या खांद्यावर हात ठेवला. मोबाइलमुळे जग जवळ आल हे खरं असेलही पण मोबाइल म्हणजेच सगळं जग नाही हे कायमचं लक्षात ठेवा. सोशल मिडियावरच तुम्ही वाचत असालच ना? दोघानीही होकारार्थी मान हलवली मी म्हणाले की आताही तुम्हाला वाचयच आहेच पण पुस्तक… सकारात्मक, प्रेरणादायी काही पुस्तकांची नावं मी त्यांना सांगीतली, ती त्यांनी वहीमध्ये लिहुन घेतली. ग्रंथ हे गुरू आहेत हे लक्षात असू द्या. सर्वात महत्वाच म्हणजे अधिन झालेल कुठ्लही व्यसन लगेच सुटू शकत नाही. ह्यावर ते म्हणाले की आता हेच वाक्य आम्ही खोटं ठरवु. म्हणजे? मी आश्चर्याने विचारलं. तेव्हा एकजण म्हणाला की आता मी मोबाइलशिवाय रहाणरच कारण बचेंगे, लडेंगे और जितेंगे भी. फक्त हेच तीन शब्द आजपासून, अगदी ह्या क्षणापासुन आमचं भविष्य उज्वल करणार अगदी शंभर टक्के. मित्रांनो, जी गोष्ट अथवा कृती करण्याची मनापासून तयारी असते तेव्हा शरीर सुद्धा साथ देत. अमिताभ बच्चन ह्यांच्या आयुष्यातील एक प्रसंग मी त्यांना सांगितला. ऐन उमेदीच्या काळात अमिताभ ह्यांना खुप संघर्ष करावा लागला त्या संघर्षाने ते थकायचे. अमिताभ ह्यांनी एकदा वडिलांना विचारल बाबुजी मुझे कब तक संघर्ष करना पडेगा? हरिवंशराय ह्यांनी उत्तर दिल जब तक जीवन हे तब तक संघर्ष है। ह्या क्षणापासुन तुमचाही संघर्ष सुरू झालाय. दोघांनीही होकारार्थी मान हलवली. ते दोघही निघाले तेव्हा मी म्हणालो की आता घरी गेल्यानंतर तुमच्या हातातला मोबाइल वडिलांकडे द्या आणि म्हणा तुमच्याशिवाय मी जगू शकणार नाही पण मोबाइल शिवाय मी जगणारच. कारण तुम्ही दोघेही तुमच्या आई वडिलांच जग जगत आहात. सर्वस्व आहात. आई वडिलांना आनंदात, सुखात ठेवंणारेच यशस्वी होतात हा स्वानुभव लक्षात घ्या. माझ्याशी हस्तांदोलन करुन ते निघाले तेव्हा मी स्वतःहून त्यांची गळाभेट घेतली.
-सुनिल राऊत,
अहमदनगर.
कॉलेज कट्टा.
Leave a Reply