
पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल PIFF मध्ये ‘वाय’ या चित्रपटाची निवड
अहमदनगर- येथील नाट्य व चित्रपट क्षेत्रात अग्रेसर असणारे विराज मुनोत यांनी कार्यकारी निर्मात म्हणून काम पाहिलेल्या ‘वाय’ या मराठी चित्रपटाची निवड पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल मध्ये निवडण्यात आली. सी.टि.आर.एल.एन.प्रोडक्शन प्रा.लि.या निर्मिती संस्थेच्या वतीने चित्रपटाची निर्मिती करण्यात आली.
वाय या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ.अजित वाडिकर यांनी केले. मराठी चित्रपट सृष्टीतील नामवंत कलावंतांनी चित्रपटात आपल्या भूमिकांचा ठसा उमटवला. अभिनेत्री मुक्ता बर्वे, अभिनेते संदीप पाठक, नंदू माधव, सुहास शिरसाट, रोहित कोकाटे, ओंकार गोवर्धन, अभिनेत्री प्राजक्ता माळी, रसिका चव्हाण यांच्यासह आपल्या अहमदनगरचे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते संदीप दंडवते यांनी वाय मध्ये आपल्या भुमिका साकार केल्या. विशेष बाब म्हणजे संदीप दंडवते यांनी या चित्रपटाचे संवाद लेखन केले आहे.
गुढ कथानकांच्या माध्यमातुन सामजिक आशयापर्यँत चित्रपटातील आशय चित्रपट रसिकांपर्यंत पोहोचवण्यात निर्मिती संस्था या निवडीने यशस्वीच झाली आहे. असे मत अ.भा.मराठी चित्रपट महामंडळाचे अहमदनगर जिल्हा भरारी पथक समन्वयक शशिकांत नजान यांनी आपले मत व्यक्त केले.
नगरचे कलावंत हे नाटक-मालिका आणि चित्रपटक्षेत्रात आपल्या कलेच्या माध्यमातून आपल्या नावाचा डंका महाराष्ट्रासह जगभरात करत आहेत. यांचा नगरकर म्हणून मनापासून अभिमान वाटतो. अशा भावना अक्षर विचार प्रतिष्ठानचे अध्यक्ष बलभीम पठारे यांनी व्यक्त केला.
अहमदनगरचीच नाट्य-चित्रपट अभिनेत्री साक्षी व्यवहारे हिचा चिवटी हा चित्रपट देखील पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी निवडण्यात आला. या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक राजकुमार तांगडे हे आहेत. अनेक चित्रपटातून नगरचे कलावंत असलेल्या या दोन चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. ‘वाय’ या चित्रपटाची यापूर्वी ‘मामी’ इंटरनॅशनल फेस्टीवल मध्ये ही निवड करण्यात आली होती अशी माहिती विराज मुनोत यांनी दिली.
मनोरंजन वार्तापत्र
कॉलेज कट्टा
Leave a Reply