पंढरपुरला आषाढी एकादशी निमित्त आळंदीमधून निघणारी ज्ञानेश्वर महाराज आणि देहुतून निघणारी तुकाराम महाराज यांच्या पालख्या म्हणजे वारकरी संप्रदायासाठी एक आनंदाची पर्वणीच असते… वारीत येणारा प्रत्येक माणुस हा घरदार, कुटुंब सगळं सोडून त्या सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी २०-२२ दिवस ऊन-वारा-पाऊस या कशाचीही तमा न करता चालत असतो. PandharpurWariArticles. तुकाराम महाराजांच्या दिंडीत जायची संधी भेटली पण ती फक्त एक दिवस… या “एका दिवसातील वारीचे” अनुभव मांडलेत टिव्ही नाईन मराठीचे पत्रकार प्रमोद जगताप यांनी… पंढरपूर वारी एक अनुभव पंढरपूर वारी लेख-वारी एका दिवसाची.
पंढरपूर वारी एक अनुभव पंढरपूर वारी लेख-वारी एका दिवसाची
माझा जन्मच मुळात वारकरी कुटुंबात झालेला. २५ मनसांच्या खटल्याच्या कुटुंबातच माझं बालपण गेलेल. माझे मोठे चुलते किर्तनकार… त्यामुळं पहिल्यापासूनच पंढरपूर, आळंदी, पैठण या वा-या पहात पहातच लहानाचा मोठा झालोय… पण चुलते दिंडीला मात्र आमच्या गावापासून जात… ज्ञानेश्वर महाराज किंवा तुकाराम महाराजांच्या पालखीत ते कधी जायचे नाही… पण त्या पालख्या किती मोठ्या असतात, त्यात किती नियम असतात याबद्दल फक्त ऐकायला मिळायच… त्यात महत्त्वाची माहिती असायची ती वाखडीच्या रिंगणाची… ते रिंगण टिव्हीत पाहीलेलं. त्यामुळं तिथली गर्दी पाहुन दिंड्या किती मोठाल्या असतील याचे आराखडे बांधलेले असयाचे… आपणही तीथ जाऊन हे रिंगण पहावं असं कायम वाटायचं… पण मोठं झाल्यावर हळूहळू त्याची तिव्रता कमी वाटायला लागली… मागच्या दोन वर्षांपासून न्युज चॅनलमधे काम करत असल्यामुळे मी वारीचं सगळं कव्हरेज जवळुन पहात आहे. आपणही वारीला जायला पाहिजे असं वाटायला लागलं… पण योग काय जुळुन येत नव्हता…
तुकाराम महाराजांच्या पालखीच कव्हरेज करायला आमचे पुण्याचे प्रतिनिधी सागर आव्हाड गेलेले… त्यांचा सहजच फोन आला आणि वारीतला आनंद सांगु लागले… मित्र असल्यामुळे पम्या तु पण यायला पाहिजेत असं ते हक्कानी म्हणाले… त्याच्यापुर्वीच २ दिवस अगोदर अभिजीत कांबळे सरांची भेट झाली होती आणि त्यांनीही वारीतली माणसं पाहुन ये असं सांगीतल होत… कारण सर पण नुकतेच २-३ दिवस वारीला जाऊन आले होते… पण यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी जाईल असं मी त्यांना बोललो होतो… तर माझीही दुस-या दिवशी सुट्टी होती त्यामुळे माझंही मन पघळल अन तेंव्हाच मनातुन ठरवल वारीला जायचं… एका दिवसाच्या सुट्टीत…
पालखी इंदापूर मधे होती… त्यामुळं तिथपर्यंत यायचं कस हे गाडीचे ड्रायव्हर राजु भाऊंनी समजुन सांगीतल… रात्री किती वाजता पोहचा स्टॅंडवर घ्यायला मी येत़ो असं राजु भाऊंनी सांगीतल… सकाळची शिफ्ट करून ४ वाजता वारीसाठी मुंबईतुन प्रस्थान केलं आणि रात्री १ वाजता इंदापूर मधे पोहचलो… सकाळी ७ वाजल्यापासून वारीसोबत चालायला सुरुवात केली… पहिली व्यक्ती भेटली ती माजलगावचे ९७ वर्षांचे बाबा… माजलगाव ते देहु आणि देहु ते पंढरपूर असा चालत प्रवास ते गेले ५७ वर्ष न चुकता करताहेत… तो जोपर्यंत बोलावतोय तोपर्यंत येत रहायच असं बाबा बोलत होते.
Pandharpur Wari Articles पंढरपूर वारी एक अनुभव पंढरपूर वारी लेख.
पुढे बोलत बोलत बरीच माणसं भेटत होती… त्यात लक्षात रहाणारी पुढची व्यक्ती होती पवार… बोलायला लागल्यावर त्यांनी पहील काय समजून सांगीतल असलं तर कल्याण बाजार अन् मुंबई बाजार… वारीला निघतानाच ३५६ चा आकडा लावला अन् संध्याकाळी आकड्यातुन मिळालेले ७५००० रुपये लगेच एका दिंडीला दिल्याचं बोलले… श्री दत्त गुरूंचे प्रचंड भक्त असलेल्या या माणसाला मी हसत सहजच म्हटलं, आता पुढचा आकडा कोणता अन कधी… तर त्यांचं उत्तर होत अजुन त्यान सांगितल नाही, सांगीतल्यावर बघू… आन हा माणुस खळखळून हासला… दिंडीत जायचं म्हटलं की तुम्हाला त्यांच्या नियमानुसार भिसी द्यावी लागते… पण भिसी न घेता २०० माणसांची भिसी चालवणारा एक माणूस पुढं भेटला त्यांचं नाव होतं सोमनाथ महाराज… दुपारची पंगत देणा-या माणसाची अचानक पंगत कॅन्सल झाली. मग दुपारी कोण पंगत देणार या विचारात महाराज होते पण म्हणायच तरी कसं अन कोणाला? ही गोष्ट माहीत झाल्यावर एका क्षणात तयार होणा-या व्यक्ती होत्या सागर भाऊ आणि राजु भाऊ. ती पंगत होती वडापुरी गावची अन तिथून पुढं ती कायमची पंगत या दोघांनी घेऊन ठेवलीय. पुढे दिवसभरात बरीच माणसं पाहीली, बोललो. फक्त एकाच अपेक्षेवर आणि मनात प्रचंड विश्वास घेऊन आषाढीच्या दिवशी तो कळसावर बसतो अन आम्ही त्याला पहायला चाललोय हीच भावना मनात घेऊन. रात्री अकलूजला मुक्काम होता. तीथ एक व्यक्ती भेटली ती खास होती. माझ्या लहान भावाचा शिरवळच्या कॉलेजमधला अकलूजचा मित्र… तो त्याच दिवशी संध्याकाळी अकलुजला आलेला आणि मी आलोय हे भावानं त्याला सांगीतल्यावर तो घरात बॅग ठेवल्या ठेवल्या माझ्याकड आला होता. तो होता अभिजीत माने… त्यामुळं खुद्द अकलुजचा एक वेगळा माणुसही मला अनुभवायला मिळाला. सुट्टी एकाच दिवसाची असल्यामुळे दुस-या दिवशी दुपारी ऑफिसला पोहचायच होत पण मनातुन मात्र उद्याही सुट्टी मिळावी असं वाटत होतं… बराच खटाटोप करूनही सुट्टी मिळाली नाही आणि इच्छा नसुनही मित्रवर्य सागर भाऊ, राजु भाऊ आणि आमचा कॅमेरामन तुषार यांचा सकाळी ६ वाजता निरोप घ्यावा लागला.
एकीकडे पालखी सकाळी सकाळी पुणे जिल्हा सोडुन निरा नदीच्या पुलावरून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करत होतं तर दुसरीकड त्याच पुलावरून मी सोलापूर जिल्ह्यातुन पुणे जिल्ह्यात प्रवेश करत होतो. वारीच्या एका दिवसातील ब-याच आठवणी घेऊन, पुढच्या वर्षी परत येऊ पण त्यावेळी मात्र मोठी सुट्टी घेऊन… मनाचा हा पक्का निर्णय घेऊनच…
-प्रमोद जगताप
पत्रकार टिव्ही नाईन मराठी
९५०३९५९४४६.
Pandharpur Wari Articles पंढरपूर वारी एक अनुभव पंढरपूर वारी लेख
अप्रतिम लेख प्रमोद सर
वारीची छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार.