
तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा | ही वाक्ये कानावर पडताच थोर स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस यांची आठवण होते. आज या अनोख्या व्यक्तित्वाची जीवनकथा आपण बघणार आहोत…! भारतामध्ये राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीस सुभाषचंद्र बोस हे नाव अपरिचित असेल, तर कदाचित तो व्यक्ती परग्रहावरून आलेला असेल…! असे म्हणण्यास कारण की त्यांच्या कार्याचा गंध आजही भारताच्या कानाकोपऱ्यात दरवळत आहे…! स्वातंत्र्यलढ्यातील ह्या अग्रेसर नेत्यास देश कधीही विसरू शकत नाही.
Subhas Chandra Bose Information Biography Essay Speech in Marathi Language नेताजी सुभाष चंद्र बोस माहिती निबंध भाषण मराठी
जन्म व बालपण:-
२३ जानेवारी १८९७ रोजी ओडिशातील कटक येथे जानकीनाथ व प्रभावती ह्या दांपत्याच्या पोटी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झाला. जानकीनाथ व प्रभावतीदेवी देवी ह्यांना एकुण १४ अपत्ये होती सुभाषचंद्र बोस हे त्यांचे ९ वे अपत्य होते. सुभाषबाबूंचे वडील जानकीनाथ हे पेशाने वकील होते. शहरातील एक नामवंत वकील म्हणुन त्यांची सर्वदूर ख्याती होती. त्यांच्या कार्याची सरहणा म्हणून इंग्रज सरकारने त्यांना रायबहादर हा किताब दिला होता.
सुभाष यांचे शिक्षण कटक शहरातील नामक हायस्कूल मध्ये झाले. लहानपणापासुन सुभाष हा इतर समवयीन बालकांपेक्षा पुर्णतः वेगळा होता. इतर मुले जशी खेळात व इतर व्यर्थ गोष्टींमध्ये मग्न व्हायची; याउलट बाल सुभाष पुस्तकांची पाने चाळत बसायचा. बालवयातच बाल सुभाषने खुप साऱ्या ग्रंथाचं वाचन केलं होत आणि जे ग्रंथ बालवयात समजणे अशक्य आहे… अश्या ग्रंथाचं वाचन सुभाषबाबू बालवयात आवडीने करत होते.
स्वामी विवेकानंदांचा विशेष प्रभाव:-
स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी बाल सुभाषच मन अगदी हरपून गेलं होत. एका पुस्तकात बाल सुभाषने स्वामीजींच्या हिमालय यात्रेविषयी वाचलं होत. बाल सुभाषच्या मनात अचानक वैराग्य जागृत झाले. सुभाषने हिमालय गाठला…! वयाच्या १५ व्या वर्षी सुभाषबाबु गुरूच्या शोधात हिमालयात पोहचले पण योग्य गुरु न मिळाल्याने त्यांनी परतीची वाट धरली.
उच्च शिक्षण:-
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माता व पित्याने सुभाषबाबूंना इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठात सिव्हिल सर्व्हिसच्या तयारीसाठी पाठवले. ब्रिटिशकालीन भारतात ती परीक्षा खुप अवघड होती असे म्हटले जाते, पण आपल्या अथक परिश्रमाने सुभाषबाबूंनी या परीक्षेत चौथे स्थान मिळवले. या अपूर्व यशानंतर आई वडील अत्यंत आनंदी झाले. ” ह्या यशानंतर सुभाषला चांगल्या पगाराची नोकरी मिळेल व तो आपले जीवन मस्त आरामात जगेल…! ” ही आई वडिलांची समजूत होती पण सुभाषबाबूंच्या मनात वेगळीच खळबळ चालू होती…!
बालपणी विवेकानंदांचे पुस्तके वाचल्याने
त्यांच्या मनाची घडणं वेगळीच घडली होती. स्वार्थाच तुच्छ जीवन जगणे त्यांना मान्य नव्हते. देशासाठी लढता लढता प्राण त्यागणे त्यांना अधिक श्रेयस्कर वाटले. भारत मातेवर अत्याचार करणाऱ्या ब्रिटिशांचे तळवे चाटत त्यांची नोकरी करणे हे सुभाषबाबूंना सर्वथा अमान्य होते. अश्या प्रकारे आपल्या निश्चयावर ठाम राहून त्यांनी चांगल्या पगाराच्या नोकरीला तिलांजली दिली व भारत मातेच्या चरणांशी आपले जीवन अर्पण केले.
काँग्रेस मध्ये प्रवेश:-
१९२१ साली सुभाषबाबू काँग्रेसच्या संपर्कात
आले. त्या वेळी अवघी काँग्रेस गांधींच्या
विचाधारेला समर्थन देत होती. “पण अहिंसक विचाराने ब्रिटिशांविरुद्ध लढणे म्हणजे
महामूर्खपणा आहे” असे सुभाषबाबूंचे मत होते.” तुम मुझे खुन दो…! मै तुम्हे आझादी
दूंगा…! हा त्यांचा नाराच होता. रक्त सांडल्याशिवाय आझाद भारताचे स्वप्न पाहणे
अशक्य आहे असे त्यांचे मत होते.
काँग्रेस मध्ये सुभाषबाबूंनी
आपले एक वेगळे स्थान निर्माण केले होते…! काँग्रेस मधील अनेक लोक त्यांच्या क्रांतिकारी विचारधारेला समर्थन देऊ
लागले होते. एक अग्रगण्य क्रांतिकारी नेता म्हणून त्यांची ख्याती पसरत होती.
सन १९३९ साली
सुभाषबाबू काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सुभाषबाबू उभे राहिले. त्यांच्या विरोधात
गांधीसमर्थक पट्टाभी सिताराम्या हे उभे होते पण अवघ्या काँग्रेस वर गांधींचे वर्चस्व असूनही त्यांच्या
समर्थकाला सुभाषबाबुंनी हरविले…! व सुभाषबाबू काँग्रेसच्या अध्यक्ष पदी रुजू झाले.
सुभाषबाबूंच्या विजयाने
गांधीजींना धक्का बसला. सुभाषबाबू
अध्यक्ष पदावर बसल्यास अवघ्या काँग्रेसचा चेहरा मोहरा बदलेल व त्यांच्या अहिंसक
विचाराला धक्का पोहचेल असे त्यांचे मत होते. ही बाब
सुभाषबाबूंना ज्ञात झाल्यानंतर त्यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. गांधीजी व सुभाष बाबू विरोधी मताचे
होते, असे म्हणण्यापेक्षा स्वातंत्र्य
प्राप्तीचे त्यांचे मार्ग भिन्न होते असे म्हणणे अधिक रास्त होय. अहिंसेच्या
मार्गाने सत्याची सीमा न ओलांडता ब्रिटिश सरकार विरोधात लढा देणे हे गांधीजींचे
तंत्र होते,
तर रक्त सांडल्याशिवाय भारत
दास्य मुक्त होणार नाही. हे सुभाष बाबुंचे मत होते.
ह्या दोघांत मतभिन्नता असली तरी
सामाजिक स्थरावर त्यांनी कधीही एकमेकाला कटुता पुर्ण शब्द उच्चारले नाही. उलट
गांधीजींनी सुभाषबाबूंना “देशभक्तांचा ही देशभक्त” असे संबोधले आहे….!

इंग्रज सरकार विरोधात रणनीती:-
१९३९ चे ते साल होते. दुसरे महायुध्द चालू
असताना नेताजींच्या मनात बाहेरील देशांकडून मदत घेण्याचे विचार चालू होते. इतर
देशांनी जर समर्थन दिले तर इंग्रजांवर दबाव टाकून त्यांना देशाबाहेर काढणे…! असा
त्यांचा मानस होता. दुर्देवाने त्यांचा हा मानस इंग्रजांना कळला. व त्यांनी सुभाष
बाबूंना जेलबंद केले. इंग्रज सरकारचा विरोध करण्यासाठी त्यांनी जेलमध्ये अन्न पाण्याचा त्याग केला…! परिणामी
त्यांची प्रकृती खालावली व इकडे समर्थकांचा वाढता दबाव लक्ष्यात घेता इंग्रजांनी
सुभाषबाबूंना जेल बाहेर काढले.
जर्मनी व इंग्लंड यांच्यातील संबंध
काही काळापासून बिघडले होते. ही बाब सुभाष बाबूंच्या नजरेतून सुटली नाही. इथे
त्यांना एक संधी दिसल्याने अडोल्फ हिटलर सोबत चर्चा करून सुभाषबाबूंनी इंग्रजांवर
दबाव टाकण्याचं प्रयत्न केला. याचदरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये असताना एमिली नामक
स्रिशी त्यांनी विवाह केला.
आझाद हिंद सेना :-
इंग्रजांना
देशाबाहेर काढायचे असेल तर एका सशक्त दलाचे गठण करावे लागेल. याची नेताजींना जाणीव होती. परिणामी “आझाद हिंद सेना
” त्यांनी साकारली.
“तुम मुझे खूण दो…! मैं तुम्हे
आझादी दुंगा ” हा नारा अवघ्या भारतवर्षात घनघनु लागला…! व भारतीय युवा
पेटून उठला.
मोहन सिंह व रासबिहारी बोस
यांच्या मदतीने सुभाष बाबूंनी आझाद हिंद सेना स्थापन केली. जपानी सेना व भारतीय
नवयुवकांना प्रशिक्षण देऊन आझाद हिंद सेना साकारली गेली.
हंगामी सरकार स्थापना :-
दि. २१ ऑक्टोबर १९४३ रोजी सिंगापुरात नेताजींनी आझाद हिंदच्या हंगामी सरकारची स्थापना केली. जवळजवळ एक हजार लोक त्या घटनेचे साक्षी बनले होते. सुभाषबाबूंनी अगदी स्पष्ट सांगितले की “हे सरकार म्हणजे कुणाच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी उभारलेली यंत्रणा नव्हे तर मायभूमीला अंधारातून बाहेर काढण्यास जमलेल्या देशभक्तांच्या संघ होय.” सुभाषबाबू स्वतः सरकारच्या प्रमुख पदी होते. पण ह्या गोष्टीचा त्यांनी कधी गर्व धरला नाही. ह्या पदाची शपथ घेताना त्यांनी शिवरायांचे स्वराज्य नजरेसमोर आणले; शिवरायांनी स्वतःचा राज्याभिषेक केला खरा. पण राजमुकुटाची त्यांना किंचितही आसक्ती नव्हती. आणि हाच हाच आदर्श समोर ठेऊन नेताजींनी ही जबाबदारी स्वीकारली.
आझाद हिंद सेना व आझाद हिंद सरकार यांच्या माध्यमातून नेताजींनी ब्रिटिश सरकार मध्ये प्रचंड खळबळ माजवली होती. आपली भूमी दास्य मुक्त व्हावी म्हणून अवघ्या जगाकडे मदतीची भीक मागणारे सुभाषचंद्र बोस आठवताच अक्षरशः रोमांच उभा राहतो. हिंदुस्तानच्या स्वातंत्र्य लढ्यातील निर्णायक पर्वामध्ये नेताजींनी केलेल्या कार्याने स्वातंत्र्य लढ्याला एक वेगळीच कलाटणी दिली.
रहस्यमयी मृत्यू :-
१८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजी विमानातून मंचुरियाला जाताना बेपत्ता झाले. ज्या स्वातंत्र्यासाठी नेताजींनी अवघ आयुष्य खपवल…! ते स्वप्न त्यांच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी साकार झालं पण उघड्या डोळ्यांनी देशबांधवांच हास्य बघण्याच सौभाग्य त्यांना प्राप्त झालं नाही. सुभाषबाबूंचा मृत्यू म्हणजे आजवर न उलगडलेलं रहस्य आहे. अस म्हटलं जात की नेताजींचा मृत्यू विमान दुर्घटनेत झाला पण त्यांच्या शरीराचे अवशेष न सापडल्याने, त्यावरही संदेह आहे.
-गौरव वर्पे
संगमनेर, अहमदनगर.
Reference :-
https://mr.m.wikipedia.org/wiki/सुभाषचंद्र_बोस
https://youtu.be/10BRoQhoi-Q
सुभाष चंद्र बोस यांच्यावरील वाचनीय पुस्तक
मित्रांनो, देशभक्त सुभाष चंद्र बोस यांच्याबद्दल या महत्वपूर्ण गोष्टी माहिती आहेत का? नेताजी सुभाष चंद्र बोस माहिती निबंध भाषण मराठी Subhas Chandra Bose Information Biography Essay Speech in Marathi Language
ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन आवश्य कळवा आणि आपल्या आवडत्या कॉलेज कट्टा या संकेतस्थळाला पुन्हा आवश्य भेट द्या.
कॉलेज कट्टा म्हणजे माहितीचे व्यासपीठ! जिथे दैनंदिन जीवनात उपयोगाला येणारी महत्वपूर्ण माहिती सोप्या भाषेत सादर केली जाते.
Leave a Reply