
जिप्सी आणि प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय अरुणोदय करंडक नृत्य स्पर्धेचे आयोजन
अहमदनगर- दिनांक- अहमदनगरच्या नाटय सांस्कृतिक आणि चित्रपट क्षेत्रातील संस्था आणि कलाकारांच्या पाठीशी उभे राहून कला आणि कलाकारांना सर्वोतोपरी सहकार्य करणारे आमदार मा.श्री.अरुण काका जगताप यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांच्या गौरवार्थ जिप्सी प्रतिष्ठान आणि प्रेरणा प्रतिष्ठान यांच्या वतीने अरुणोदय करंडक राज्यस्तरीय समूह आणि वैयक्तिक नृत्य स्पर्धेचे दिनांक २२ आणि २३ मार्च २०२० रोजी आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती जिप्सी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अहमदनगर जिल्हा समन्वयक शशिकांत नजान यांनी दिली.
राज्यस्तरीय अरुणोदय करंडक स्पर्धा समूह नृत्य खुला गट वैयक्तिक नृत्य लहान आणि मोठ्या गटात होणार असून
समूह नृत्य खुला गट प्रथम क्रमांक- २१००० रुपये रोख आणि ६ फुटी अरुणोदय करंडक
द्वितीय क्रमांक-१५००० रु ,तृतीय क्रमांक-१०,००० रु,चतुर्थ ३००१, उत्तेजनार्थ दोन पारितोषिक प्रत्येकी २००१
वैयक्तिक नृत्य मोठा गट- प्रथम क्रमांक -७०००,द्वितीय क्रमांक-,५०००, तृतीय क्रमांक -३००० आणि उत्तेजनार्थ तीन पारितोषिक , वैयक्तिक नृत्य लहान गट- प्रथम क्रमांक-५०००,द्वितीय क्रमांक -३०००,तृतीय क्रमांक-२०००, उत्तेजनार्थ तीन पारितोषिक
सर्व पारितोषिकां बरोबर स्मृती चिन्ह आणि प्रमाणपत्र असे स्वरूप असेल. महाराष्ट्रातील नृत्य क्षेत्रातील नावाजलेले आणि तज्ञ परीक्षक स्पर्धेचे परीक्षण करणार आहेत.असेही शशिकांत नजान यांनी सांगितले.
स्पर्धे साठी वैयक्तिक नृत्य:- लहान गट :- २०० रु.,वयक्तिक नृत्य मोठा गट ३०० रु.समूह गट १०००रु., प्रवेश फी असणार आहे.आहे. अधिक माहिती साठी
रितेश साळुंके- ९६२३४२०१२६
स्वप्नील नजान- ७०२०६९५०४१
यांच्याशी संपर्क साधावा
प्रवेशिका मिळण्याचे ठिकाण
कॅफे ब्ल्यूज,वाडिया पार्क टिळक रोड अहमदनगर
रंगकर्मी प्रतिष्ठान, अभिषेक लॉज ,समोर,ब्राम्हण गल्ली,माळीवाडा अहमदनगर
तरी महाराष्ट्रातील नृत्य संस्था आणि नृत्य कलाकार यांनी मोठ्या संख्येने अरुणोदय करंडक स्पर्धेस प्रतिसाद द्यावा असे जिप्सी आणि प्रेरणा प्रतिष्ठान यांच्या वतीने श्रेणीक शिंगवी ,अनंत रिसे, रितेश साळुंके,प्रशांत जठार, शेखर वाघ,नाना मोरे,श्रीकांत गरगडे,मनोज कांबळे यांनी आवाहन केले आहे.
-रितेश साळुंके,
मनोरंजन वार्ता,
-कॉलेज कट्टा.
Leave a Reply