गरोदरपणाचे पहिले तीन महिने फार महत्त्वाचे असतात. यादरम्यान स्त्री अनेक मानसिक व शाररिक बदलातून जात असते. गरोदरपणात बाळाची काळजी कशी घ्याल आहार माहिती मराठी
गरोदरपणात बाळाची काळजी कशी घ्याल आहार माहिती मराठी
गरोदरपणाचे पहिले तीन महिने फार महत्त्वाचे असतात. यादरम्यान स्त्री अनेक मानसिक व शाररिक बदलातून जात असते त्यामुळे अधिक काळजी घेणे हे फार महत्त्वाचे आहे. गर्भाच्या विविध अवयवांची वाढ देखील याच काळात होत असल्याने गरोदर स्त्रीने पहिल्या तीन महिन्यात कटाक्षाने स्वतःची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
पहिल्या तीन महिन्यात काय कराल ?
- सर्वसमावेशक आहार घ्या. ज्यामुळे तुम्हाला पुरेशा कॅलरिज मिळतील. डाळी, सुका मेवा, याचबरोबर अंडी, मासे अशा मांसाहारी पदार्थांपासून देखील शरीराला पूरक प्रोटीन्स (प्रथिने) मिळतात.
- आहारात कॅल्शियम पूरक घटकांचा समावेश असू द्या. रोज ६०० मिली दुध वा दुधजन्य पदार्थ नियमित घ्या.
- व्हिटामिन डी मिळवण्यासाठी अंड्यातील पिवळा भाग, फिश लिवर ऑईल याचा समावेश करा तसेच कोवळ्या सूर्यप्रकाशात फिरल्यानेदेखील पुरेसे व्हिटामिन डी मिळेल.
- ओमेगा ३ फॅटी ऍसिडसचा अन्नात पुरेसा वापर करा ज्यामुळे गर्भाच्या मेंदूचा, मज्जातंतूंचा व डोळ्यांचा विकास होण्यास मदत होइल.
- डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार अन्नात आयर्न (लोह) व फॉलीक ऍसिडचा वापर ठेवा. गर्भारपणाच्या सुरवातीच्या दिवसात त्याची तुम्हाला व वाढणाऱ्या गर्भाला गरज असते. त्यामुळे गर्भाच्या पाठीचा कणा व मज्जातंतूतील पेशींच्या निर्मीतीस मदत होते.
- दोन ते तीन तासांच्या फरकाने नियमित थोडा थोडा आहार घ्या.
- हळूहळू तुमचे वजन वाढवा. पहिल्या तीन महिन्यांच्या काळात बाळाच्या वाढीसाठी तुमचे वजन अंदाजे ०.५ ते २ किलोने वाढणे गरजेचे आहे.
- नियमित व्यायाम करा ज्यामुळे तुमची शारीरिक क्षमता वाढेल, पाठदुखीपासून आराम मिळेल तसेच तुम्ही शारीरिक बदलास सामोरे जाऊ शकाल.
गरोदरपणात बाळाची काळजी कशी घ्याल आहार माहिती मराठी गरोदर महिलांचा आहार
- पुरेशी झोप घ्या. गर्भारपणात होणाऱ्या हार्मोनल बदलामुळे थकवा जाणवतो त्यामुळे शक्य तेव्हा थोडासा आराम करावा.
- नियमित डॉक्टरकडे जा. प्रसूतीपूर्व नियमित चेकअप केल्याने गर्भाच्या वाढीवर लक्ष ठेवता येते व भविष्यातील धोके टाळण्यास मदत होते.
जाणून घ्या गर्भवती स्त्रीच्या आहारात आवश्यक असलेली दहा सुपरफूड्स
पहिल्या तीन महिन्यात कायम पाळाल. - डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधं घेणे टाळा. औषधांच्या अतिसेवनाचा गर्भावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.
- खाणं काबूत ठेवा. नवनवीन अन्नपदार्थ आजमावून पाहणे टाळा.
- अर्ध कच्च राहिलेले मांसाहारी पदार्थ, चीज, समुद्रातील मासे अशा पदार्थातून हानिकारक जीवाणूंचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
- धुम्रपान व मद्यपान टाळा. अल्कोहलच्या अतिसेवनामुळे बाळाच्या वाढीवर दुष्परिणाम होतो तसेच बाळाच्या अकाली जन्माची ( प्री मॅच्युअर ) शक्यता वाढते. तर धुम्रपानाच्या सवयीमुळे नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे आढळून येते.
- अति त्राण व निराशा टाळा. गरोदर स्त्रीच्या अतिरिक्त मानसिक तणावामुळे गर्भपात होण्याची शक्यता अधिक असते.
- गर्भारपणात डाएट करणे टाळा. यामुळे तुम्ही तसेच तुमचे बाळ व्हिटामिन, आयन (लोह) व फॉलीक ऍसिड ,खनिजे यासारख्या अत्यावश्यक पोषकद्रव्यापासून दूर राहील.
- अतिशय गरम पाण्याने स्नान करणे टाळा. यामुळे तुम्हाला डी हायडरेशनचा त्रास जाणवू शकतो परिणामी बाळाला त्रास होण्याची शक्यता अधिक आहे.
गर्भपनात बाळाची काळजी घेण्यासाठी या टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी ठरतील. महत्वाचे निर्णय डॉक्टरांचा सल्ल्याने घ्या.
-डॉ राहुल मुळे.
मित्रांनो, गरोदरपणात बाळाची काळजी कशी घ्याल आहार माहिती मराठी गरोदर महिलांचा आहार ही माहिती कशी वाटली हे खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन आवश्य कळवा. या प्रकारची महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आपल्या आवडत्या कॉलेज कट्टा या संकेतस्थळाला पुन्हा भेट द्या.
College Catta म्हणजे माहितीचे व्यासपीठ! जिथे दैनंदिन जीवनात उपयोगाला येणारी महत्वपूर्ण माहिती सोप्या भाषेत सादर केली जाते.
मनुस्मृति में नारी के सम्बन्ध में एक उक्ति मिलती है— ‘यत्र नार्यस्त पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता’ अर्थात् जहाँ नारियों की पूजा होती है, वहाँ देवताओं का निवास रहता है। इस कथन का मन्तव्य है समाज को नारी का आदर करने के लिए प्रेरणा प्रदान करना, क्योंकि जहाँ नारी को आदर-सम्मान दिया जाता है, वहीं सुख, समृद्धि एवं शान्ति रहती है। भारतीय समाज में नारी का स्थान।
Very nice