कंबर दुखी पाठ दुखी वर घरगुती आयुर्वेदिक उपाय करून बघा
कंबर दुखतेय, पाठ दुखतेय काळजी करू नका हे कंबर दुखीवरील घरगुती उपाय,आहारातील बदल, योगासने करून तुमची कंबर दुखीची समस्या नक्की दूर होईल.
कंबर दुखी पाठ दुखी वर घरगुती आयुर्वेदिक उपाय करून बघा
Kambar Dukhi var Gharguti Upay in Marathi
Back Pain Treatment at Home Remedies in Marathi
आज युवक, प्रौढ आणि वृद्धांमध्ये सर्वांनाच एका समस्येने ग्रासले आहे ती म्हणजे कंबरदुखी.
पाठ दुखण्याची कारणे कंबर का दुखते
एकाच ठिकाणी तासन तास बसणं, हायब्रीड पदार्थ खाणे, व्यायामाचा अभाव व आहारातील कमी प्रमाणात असलेले कॅल्शियम या साऱ्या कारणांमुळे कंबरदुखीचा त्रास वाढत आहे. त्यामुळे वेदनाशामक गोळ्यांचे वाढलेले डोस व त्यांचे होणारे साईड इफेक्ट यांकडे दुर्लक्ष केल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास वाढतो. डॉक्टरांकडे फेऱ्या वाढतात पण तरीही हवा तसा फयदा होत नाही अशा वेळी पुन्हा घरगुती व आयुर्वेदिक उपाय रामबाण इलाज ठरतात. वरील Path Dukhi Chi Karne सर्वसामान्यपणे आढळून येतात.
कंबरदुखी असताना काय करू नये-
- कंबर दुखत असतांना जड सामान उचलू नये किंवा उचलायचे असल्यास कंबरेत न वाकता पायांच्या पंजावर किंवा गुढग्यावर आपल्या शरीराचा भार द्यावा व गुढग्यातून वाकावे.
- कंबर दुखत असतांना व्यायाम करणे शक्यतो टाळावे.
- कंबर दुखत असल्यास जास्त वेळ ताठ बसू नये त्यामुळे पाठीच्या स्नायूंवर ताण येतो.
- मऊ गादीवर झोपणे टाळावे.
- वांगे, बटाटे, हरभऱ्याची डाळ, चवळी, वाल, अतितिखट पदार्थ खाणे टाळावे.
- मोटारसायकलचा प्रवास कमी करावा.
- फास्ट फूड खाणे टाळावे.
Kambar Dukhi Yoga for Back Pain in Marathi


- सकाळी झोपेतून उठल्यावर आहे त्या अवस्थेतच साधे आसन करावेत. हलासन, सर्वांगासन, शलभासन ई.
- आपले पाय सायकल चालवल्यासारखे हवेत फिरवावेत.
- आपण पोटावर झोपून खांदे व मान उचलून भुजंगासन करावे. त्याने पाठीला ताण पडून स्नायू मोकळे होतात.
- जमत असेल तर पाय व हात ताणून नौकासन करावे.
- जमत असल्यास धनुरासन करावे.
कंबर दुखी पाठ दुखी वर घरगुती आयुर्वेदिक उपाय
Kambar Dukhi Ayurvedic Upchar in Marathi
- खुर्चीवर बसतांना कुबड काढून न बसता आरामदायी बसावे.
- पूर्ण पालथे न झोपता एका कुशीवर झोपल्याने पाठीला आराम मिळतो.
- घरात लाकडी किंवा लोखंडी पलंग असल्यास त्यावर कापसाची गादी टाकून झोपावे. अन्यथा जमिनीवर चटई अंथरून झोपावे.
- रोजच्या आहारात दुध, तूप, डिंक, उडीद यांचा समावेश असावा.
- सकाळी मोहरी किंवा खोबरेल तेलं लसून घालून गरम करावे आणि त्याने मालिश करावी व दुखत असलेल्या जागेवर कापडाने शेक द्यावा.
- कंबर दुखीसाठी पोहणे, सायकल चालवणे, सकाळी फिरणे हे उत्तम व्यायाम प्रकार आहेत.
- कंबर दुखत असल्यास आराम करावा व मध्ये मध्ये अर्धवट उठून बसावे.
- जास्त वेळ एका ठिकाणी बसायचे असल्यास किमान १ तासाने थोडं फिरून यावं.
- आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा वापर करावा.
- ऑफिस मध्ये ताठ बसाव व मान आणि पाठ ताठ ठेवावी.
- मीठ चार ते पाच मिनिटे गरम करून ते स्वच्छ कापडात गुंडाळून त्याने पाठ शेकावी.
योग्य आहार, योग्य झोप, व्यायाम या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास कंबर दुखी नक्कीच गायब होईल.
हे ‘कंबर दुखी पाठ दुखी वर घरगुती आयुर्वेदिक उपाय’ Kambar Dukhi var Gharguti Upay in Marathi Back Pain Treatment at Home Remedies in Marathi तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा व हे उपाय शेअर करा.
-भरत दि. मोहळकर.
वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय करून बघा नक्की फायदा होईल
Kambar Dukhi Ayurvedic Upchar in Marathi Kambar Dukhi Yoga for Back Pain in Marathi Path Dukhi Chi Karne Path Dukhi Upay in Marathi पाठ दुखण्याची कारणे कंबर का दुखते.
कबंर दुखणे पाठ दुखणे याचांवर उपाय