
इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ अहमदनगर ( IFFA ) ला अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अधिकृत आणि सक्रिय पाठबळ देणार- मेघराज राजेभोसले
फेस्टिव्हलचा निकाल जाहिर
मेक्सिको देशाचा द अँली IFFA २०२० चा सर्वोत्कृष्ट चित्रपट
अहमदनगर दिनांक-
अहमनगर फिल्म फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ अहमदनगर चा समारोप आणि पारितोषिक वितरण समारंभ माऊली सभागृह अहमदनगर येथे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या अध्यक्षतेखाली उद्योजक, चित्रपट निर्माते गौतम मुनोत आणि चित्रपट अभिनेते प्रदीप पटवर्धन यांच्या हस्ते उपायुक्त सुनील पवार, महोत्सवाचे स्वागताध्यक्ष बलभीम पठारे, निमंत्रक तथा चित्रपट महामंडळ अहमदनगर जिल्हा मुख्य समन्वयक शशिकांत नजान, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे, चित्रपट महामंडळ तांत्रिक सल्लागार महेश मोटकर, निर्माते डॉ.संतोष पोटे, नाटय परीषद अध्यक्ष अमोल खोले, कला दिग्दर्शक गिरीश कोळपकर, रमेश शेट्टी, शिंगवी ज्वेलर्सचे श्रेणिक शिंगवी, जेष्ठ दिग्दर्शक किशोर साव, सुधीर थोरात यांच्या प्रमुख सन्माननीय उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी बोलताना मेघराज राजेभोसले म्हणाले की अहमदनगरच्या अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उच्च असा दर्जा प्राप्त झाला असून, उत्तम नियोजन, पारदर्शी निकाल, दूरदृष्टीकोण असलेले पदाधिकारी आणि सदस्य यामुळे IFFA हा भविष्यात जागतिक स्तरावरील नामांकित महोत्सव ठरणार आहे. आज अनेक ठिकाणी दर्जाहीन आणि आपमतलबी लोकांचे चित्रपट महोत्सव होतात यात पारदर्शकता नसते या फसवेगिरीला आळा बसविणे गरजेचे असून IFFA सारख्या दर्जेदार महोत्सवास समाजातून पाठबळ मिळणे गरजेचे आहे.अखिल भारतीय मराठी चित्रपट IFFA च्या पाठीशी उभे असून पुढील वर्षी अधिकृत पाठिंबा आणि आर्थिक मदत करणार आहे. गेल्या दोन वर्षाची कारकीर्द पाहता अहमदनगर फिल्म फाउंडेशन हे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या विश्वासास पात्र ठरले आहे. त्यामुळे पुढील वर्षापासून महामंडळातर्फे या महोत्सवास आणि विविध उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल तसेच दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने वर्षभर विविध उपक्रम जिल्ह्यातील कलाकारांसाठी आणि तंत्रज्ञानासाठी राबविण्यात येतील असेही मेघराज राजेभोसले यांनी सांगितले.
बलभीम पठारे म्हणाले की अहमदनगर ही कलाकारांची खान आहे तसेच संयोजन आणि नियोजनात कल्पकता राबवणारे तरुणांची फौज आहे. महानगरपालिका नगरची फिल्म सिटी उभारण्यास जागा द्यायला तयार आहे या साठी चित्रपट महामंडळाने तांत्रिक मदत करावी. अहमदनगर फिल्म फाउंडेशन हे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या विश्वासाला नक्कीच सार्थ ठरवेल अशी कामगिरी करू असे आश्वासन त्यांनी दिले.
चित्रपट निर्माते गौतम मुनोत यांनी सांगितले की भविष्यात अहमदनगर सांस्कृतिक राजधानी होणार आहे. नगरच्या कलाकारांना वैभवशाली अहमदनगर या विषयावर लघुपट, माहितीपट बनवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू या बाबतचे प्रस्ताव अहमदनगर फाउंडेशन कडे पाठवावे असे आवाहन केले. त्याचबरोबर हा महोत्सव अधिक व्यापक स्वरूपात करण्याची घोषणाही त्यांनी केली.
IFFA अंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात मोठा चित्रपट महोत्सव व्हावा यासाठी माझे सर्वोतोपरी सहकार्य असणार आहे. असे त्यांनी सांगितले महापौर बाबासाहेब वाकळे यांनी उद्घाटन प्रसंगी अहमदनगर चित्रनगरीसाठी जाहीर केलेल्या योजनांबाबत सर्व नगरकरांच्या वतीने श्री गौतम मुनोत यांनी महापौरांचे आभार व्यक्त केले.
निमंत्रक शशिकांत नजान यांनी चित्रपट महामंडळ यांच्यांकडे विविध मागण्या मांडल्या, ते म्हणाले की मेघराज राजेभोसले आणि त्यांच्या सहकारी पदाधिकारी आणि संचालक यांनी महामंडळ महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात तळागाळात पोहोचविले आहे.
या महोत्सवाच्या प्रास्ताविकात प्रोग्रामिंग डायरेक्टर श्री संतोष पठारे यांनी चित्रपट निवडीच्या मागे परीक्षकांची भूमिका आणि महोत्सवात दाखवण्यात आलेल्या चित्रपटांमधून विश्लेषणात्मक माहिती दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले आज या निमित्ताने वेगवेगळ्या धाटणीचे, विविध देशातील संस्कृतीचे दर्शन घडवणारे लघुपट, माहितीपट, चित्रपट यांची मेजवानी नगरकर रसिकांना मिळाली. परंतु नगरची संस्कृती आणि इतिहास विविध देशांना कळण्याच्या दृष्टीने त्या आशयावर लघुपट किंवा चित्रपटाची निर्मिती होणे देखील गरजेचे आहे. अहमदनगर फाउंडेशनने देखील या दृष्टीने प्रयत्न करावे.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तर निर्माता दिग्दर्शक श्रेयस जाधव यांना युवा प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. निकाल वाचन फेस्टिवल डायरेक्टर प्रशांत जठार यांनी केले यावेळी शैलेश थोरात यांच्या नावाची २०२१ चे फेस्टिवल डायरेक्टर म्हणून घोषणा करण्यात आली. सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले तर आभार विराज मुनोत यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी होण्यासाठी प्राध्यापक कौस्तुभ यादव, नाना मोरे, शैलेश देशमुख, शैलेश थोरात. राहुल उजागरे, आशितोष मेणसे, राज जोशी, रितेश साळुंके, तेजस अतितकर, सुदर्शन कुलकर्णी, क्षमा देशपांडे, आकाश शिंदे, सिद्धांत खंडागळे, सचिन नरवडे, गणेश लिमकर, मयुर गोडळकर, संजोग धोत्रे, सचिन शिंगटे, निखिल आढाव, संकेत शहा, सारंग देशपांडे, श्रीपाद कुलकर्णी, साक्षी व्यवहारे, खुशबू पायमोडे, सिद्धी कुलकर्णी, सानिका कुलांगे, स्नेहा पटेल मुनोत, मंगेश जोंधळे, केतन धस, ऋतूध्वज कुलकर्णी, तुषार देशमुख, उद्धव काळापहाड, पियुष कांबळे, प्रसाद बेडेकर, राहुल वाणी, सिद्धार्थ लोंढे, योगेश विलायते, आकाश शिंदे, अविनाश मकासरे, किरण गवते, वसी खान, स्वप्नील नजान, प्रीतम होनराव, तुषार चोरडिया, राज जोशी सचिन शिंगाडे चिन्मय कुलकर्णी अक्षय अ देशपांडे, अक्षय देशपांडे आदी सदस्यांनी परिश्रम घेतले.
अहमदनगर फिल्म फेस्टीवलचा निकाल पुढिलप्रमाणे-
1.सुब्रमनीयन के.वी. (फिल्म- अबोड, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत)
2.रशिन अहमद, निकोल डोनालडीयो (फिल्म- अक्रॉस द ओशन, सर्वोत्कृष्ट संकलन)
3.वोल्कर लन्घोफ्फ (फिल्म-द फेयरवेल रेस्टौरन्ट, सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार)
5.कारो डुआर्ते(फिल्म- द आल्यी,सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक)
6.अपुर्वा बोस (फिल्म-अक्रॉस द ओशन,सर्वोत्कृष्ट अभिनेत्री)
7.युन को (फिल्म- द फेयरवेल रेस्टौरन्ट,सर्वोत्कृष्ट अभिनेता)
8.द आल्यी ((सर्वोत्कृष्ट चित्रपट)
9.अबोड (सर्वोत्कृष्ट प्रेक्षक पसंती)
10.मन्ग्रोज-नेचरस हार्डी फूट सोल्जर सर्वोत्कृष्ट माहितीपट
11.दस्तक(सर्वोत्कृष्ट भारतीय आर्मी लघुपट )
12.इनर सिटी(3rd सर्वोत्कृष्ट लघुपट)
13.अरेबियन नाइट (2nd सर्वोत्कृष्ट लघुपट)
14. द स्ट्रॉबेरी मिल्कशेक(सर्वोत्कृष्ट लघुपट)
15.पेर्ला एन्सीनास(सर्वोत्कृष्ट कलाकर 2020).
रितेश साळुंके
फेस्टिवल वार्ता.
कॉलेज कट्टा.
Leave a Reply