
अहमदनगर दिनांक- नाटय क्षेत्रातील शिखर संस्था अखिल भारतीय मराठी नाटय परिषद अहमदनगर जिल्हा शाखेची सन २०२०- २०२५ निवडणूक बिनविरोध संपन्न झाली असून सतीश लोटके यांच्या नेतृत्वाखाली १९ सदस्यांचा नटराज पॅनल बिनविरोध निवडून आला अशी माहिती पॅनल प्रमुख शशिकांत नजान यांनी दिली
अखिल भारतीय मराठी नाटय परिषद अहमदनगर जिल्हा शाखेची कार्यकारी मंडळाची पंचवार्षिक निवडणूक दिनांक-८/०३/२०२० ला जाहीर झाली होती निवडणूक अधिकारी म्हणून श्री.शेखर रामचंद्र वाघ यांची नियुक्ती करण्यात आली होती
पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम खालीलप्रमाणे होता
दिनांक २१/०२/२०२० पासून प्रसिद्ध झालेली मतदार यादी अवलोकणार्थ ठेवण्यात येणार आहे.मतदार यादीत पुराव्यानिशी नाव समाविष्ट करण्याची अंतिम मुदत
२२ व २३/०२/२०२० आहे.अंतिम पात्र मतदारांची यादी कार्यालयातील फलकावर लावण्याचा दिवस २४/०२/२०२०
असून पात्र व इच्छुक उमेदवार यांनी आवेदन पत्र मिळण्याची व अनामत रकमेसह भरण्याची मुदत २४ ते २५/०२/२०२०
आहे. २८/०२/२०२० रोजी ऊमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. तर प्रत्यक्ष मतदान ८ मार्च २०२० रोजी व निकाल त्याच दिवशी जाहीर करण्यात येणार होती तत्पूर्वी १९ जागेसाठी दाखल झालेल्या २२ पैकी तीन उमेदवारांनी दिनांक २८ फेब्रुवारी ला अर्ज मागे घेतल्यानं निवडणूक बिनविरोध झाली अशी माहिती निवडणूक अधिकारी श्री.शेखर वाघ यांनी दिली आहे.
नटराज पॅनल चे विजयी उमेदवार खालील प्रमाणे.
१)सतीश लोटके २) शशिकांत नजन ३) सतीश शिगंटे ४) संजय घुगे ५) अमोल खोले ६) श्याम शिंदे ७) संजय लोळगे ८) तुषार चोरडिया ९) अभिजीत दरेकर १०)शिवाजी शिवचरण
११) पुरूषोत्तम तथा विलास कुलकर्णी ( राहुरी ) १२) अविनाश कराळे १३)प्रा.योगेश विलायते १४)श्रीमती शुभांगी कुंभार १५) सुनील राऊत १६) जालिंदर शिंदे १७) विशाल कडुसकर १८) राजेंद्र साबळे १९) सतीश काळे
दि.४ मार्च रोजी पदाधिकारी निवड होणार आहे.
प्रा. मधुसूदन मुळे, पी.डी.कुलकर्णी, मोहन सैद, सदानंद भणगे,प्रकाश धोत्रे, दिपक शर्मा, अनंत जोशी,क्षितिज झावरे ,रितेश साळुंके,सुनील लोटके, जयंत येलुलकर, सागर मेहेत्रे ,बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा ऊर्मिला लोटके,जेष्ठ रंगकर्मी बाळकृष्ण ओतारी,दीपक घारू,श्रेणिक शिंगवी, राजेंद्र क्षीरसागर यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.
-नाटय वार्ता
रितेश साळुंके
-कॉलेज कट्टा
Leave a Reply